OTW ला पैसे कोणत्या कारणास्तव लागतात, आणि ते कशावर खर्च होणार आहेत?

OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) वस्तू आणि सेवा विकत घेण्यासाठी निधी वापरते जे त्याच्या स्वयंसेवकांद्वारे प्रदान केले जाऊ शकत नाहीत, जसे कार्यक्रिया संबंधित खर्च आणि काही प्रशासकीय खर्च. अशा कार्यक्रिया संबंधित खर्चामध्ये संग्रह तयार करण्यासाठी व राखण्यासाठी सॉफ्टवेअर आणि सर्व्हर जागा खरेदी समाविष्ट आहे. प्रशासकीय खर्चांमध्ये ना-नफा ना-तोटा संस्थेशी निगडित खर्च, जसे की विमा, पेमेंट प्रोसेसर फी व कर तयार करणे, आणि ऑडिटिंग सेवा यासारख्या विविध गोष्टी समाविष्ट असतात.

Comments are closed.