Posts in Newsletter

ऑक्टोबर २०२१ बातमीपत्र, खंड १६२

I. LEGAL ADVOCACY (कायदेविषयक मदत) कायदेविषयक समिती ला ऑक्टोबर मध्ये खूप चांगली बातमी मिळाली: यु.एस. सरकारी स्वामित्व संस्थेने रसिकचित्रफीतकारांना DMCA वरचढपणा-विरोधी तुरतुदीला असलेल्या सुटीचे नूतनीकरण केले आहे. म्हणजे, रसिकचित्रफीतकारांना डिव्हीडीज, ब्ल्यू-रेज, व ऑनलाईन स्त्रोतांची अव्यावसायिक रसिकचित्रफीत बनवण्यासाठी परवानगी देणाऱ्या अस्तित्वात असलेल्या सुटेची आणखी तीन वर्षांची मुदतवाढ आपण जिंकली आहे. ह्या वर्षीच्या सुरुवातीला कायदेविषयक समितीने सरकारी स्वामित्व संस्थेला रसिकचित्रफीतकारांना मिळणाऱ्या सूटीच्या नूतनीकरणाचा वादविवाद आणि स्पष्टीकरण करणाऱ्या टिप्पण्या पाठवल्या होत्या.