Posts in Archive of Our Own

AO3 वर एआय आणि डेटा स्क्रेपिंग

गेल्या काही महिन्या मध्ये होत असलेल्या एआय साधनांच्या प्रसारामुळे, बऱ्याच रसिकांनी डेटा स्क्रेपिंग आणि ए आय द्वारे निर्माण केलेल्या कृतींबद्दल, आणि ह्या घडामोडींचा Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वर होणाऱ्या प्रभावाबद्दल, चिंता व्यक्त केली आहे. आम्ही ह्या चिंता आपल्याबरोबर वाटून घेतो. आम्हाला आपल्याला आम्ही डेटा स्क्रेपिंग थांबवण्यासाठी काय करत आहोत आणि आमच्या सध्याच्या एआय बद्दलच्या काय धोरणा आहेत हे सांगायचे आहे. डेटा स्क्रेपिंग आणि AO3 रसिककृती AO3 वर मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या डेटा स्क्रेपिंग मध्ये अडथळा आणण्यासाठी आम्ही काही तांत्रिक उपाय सुरु केले आहेत, जसे कि रेट लिमिटिंग, आणि अपमानकारक डेटा संकलनाच्या खुणा शोधायला आम्ही आमच्या ट्रॅफिक चा कायम सुगावा घेत आहोत…. Read more

समर्थन आणि धोरण आणि गैरवर्तन जबाबदाऱ्यांमध्ये आणखी बदल

आम्ही आमच्या समिती-संवाद आणि नियम आणि तक्रारनिवारण समित्यांच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे संतुलित करण्यावर काम करत असल्याने, आम्ही आणखी दोन प्रकारचे मुद्दे नियम आणि तक्रारनिवारण वरून समिती-संवादच्या आदेशाकडे हलवत आहोत: रसिकवारसदार अमच्या दिल्लेल्या हा एक पर्याय आहे की तुमचा मृत्यू झाल्यास किंवा अक्षम झाल्यास, तुमचा नियुक्त केलेल्या व्यक्तीस, तुमचे खाते व्यवस्थापित करण्यास अनुमती देतो. रसिकवारसदार प्रोग्रामबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, तुम्ही ह्या विषयावर आमचे नियम आणि ध्येयधोरणे वाविप्र वाचू शकता. कृपया लक्षात घ्या की तुमच्याकडे सध्या प्रक्रियेत असलेल्या रसिकवारसदार विनंती असल्यास, आमची धोरण आणि गैरवर्तन कार्यसंघ त्यांना आधीच प्राप्त झालेली विनंती पूर्ण करेल. पुढे जाऊन, तुम्हाला रसिकवारसदार सेट करायचा असल्यास, किंवा सध्या असलेल्या एखादे बदलणे किंवा सक्रिय… Read more

समिती-संवाद आणि नियम आणि तक्रारनिवारण च्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल

आमच्या समिती-संवाद आणि नियम आणि तक्रारनिवारण समित्यांचा कार्यभार आणखी नीट सांभाळण्यासाठी आम्ही कुठली समिती कुठल्या विनंत्यांची जबाबदारी घेईल ह्यात थोडे बदल करत आहोत. नेहमीप्रमाणे, नियम आणि द्येयधोरणे समिती ह्यांना नियम आणि तक्रारनिवारण समिती संबोधित करत राहील आणि समिती-संवाद साईट कशी वापरावी ह्यावरचे प्रश्न व दोष संबोधित करीत राहील. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या नियम आणि तक्रारनिवारण समिती आधी हाताळत होते व ज्या आता समिती-सन्वाद समिती हाताळणार आहे. ह्या पुढीलप्रमाणे आहेत: जर एका खात्याची सुलभता गेली असेल (उदाहरणार्थ, जर तुम्ही खाते उघडण्यासाठी वापरलेला ई-मेल, ज्यावरून तुम्ही पासवर्ड रीसेट करू शकता, विसरला असाल किंवा त्या ई-मेल ची सुलभता हरवली असेल) मुक्त कलाकृतींबद्दल प्रश्न आणि समस्या चुकीच्या… Read more

AO3 वर ४०,००० रसिकगट साजरे करणे

टाचणखूण समितीला घोषित करताना आनंद होत आहे की आम्ही Archive of our own- AO3(आमचा स्वत:चा संग्रह) वर ४०,००० रसिकगटांचा टप्पा गाठला आहे! गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही असे अनेक रसिकगट टप्पे गाठले आहेत: ५००० रसिकगट नवीन वर्षाच्या आदल्या दिवशी, २०१० १०,००० रसिकगट सप्टेंबर २०१२ मध्ये १५,००० रसिकगट एप्रिल २०१४ मध्ये २०,००० रसिकगट डिसेंबर २०१५ मध्ये २५,००० रसिकगट जून २०१७ मध्ये ३०,००० रसिकगट ऑक्टोबर २०१८ मध्ये ३५,००० रसिकगट डिसेंबर २०१९ मध्ये या वेळेस, आम्ही या पोस्ट ने साजरे करायचे ठरविले आहे, जी अधिक समजावेल की टाचणखूण समिती टाचणखूणा कशा पद्धतीने व्यवस्थापित करते ज्यामुळे AO3 वर मार्ग दाखविणे सोपे होते, त्याची वाढ होत असताना सुद्धा. आम्ही काही टिप्पण्या… Read more