Posts in Announcement
समर्थन आणि धोरण आणि गैरवर्तन जबाबदाऱ्यांमध्ये आणखी बदल
आम्ही आमच्या समिती-संवाद आणि नियम आणि तक्रारनिवारण समित्यांच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे संतुलित करण्यावर काम करत असल्याने, आम्ही आणखी दोन प्रकारचे मुद्दे नियम आणि तक्रारनिवारण वरून समिती-संवादच्या आदेशाकडे हलवत आहोत: रसिकवारसदार अमच्या दिल्लेल्या हा एक पर्याय आहे की तुमचा मृत्यू झाल्यास किंवा अक्षम झाल्यास, तुमचा नियुक्त केलेल्या व्यक्तीस, तुमचे खाते व्यवस्थापित करण्यास अनुमती देतो. रसिकवारसदार प्रोग्रामबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, तुम्ही ह्या विषयावर आमचे नियम आणि ध्येयधोरणे वाविप्र वाचू शकता. कृपया लक्षात घ्या की तुमच्याकडे सध्या प्रक्रियेत असलेल्या रसिकवारसदार विनंती असल्यास, आमची धोरण आणि गैरवर्तन कार्यसंघ त्यांना आधीच प्राप्त झालेली विनंती पूर्ण करेल. पुढे जाऊन, तुम्हाला रसिकवारसदार सेट करायचा असल्यास, किंवा सध्या असलेल्या एखादे बदलणे किंवा सक्रिय… Read more
OTW संचालकाचा राजीनामा
जेस व्हाईटने वैयक्तिक कारणांमुळे संचालक म्हणून तिच्या भूमिकेतून राजीनामा दिला आहे हे जाहीर करताना OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) संचालक मंडळाला दुःख होत आहे. जेस २०२० मध्ये तिच्या जागेवर निवडून आली होती आणि तिचा राजीनामा ५ नोव्हेंबर २०२२ पासून प्रभावी आहे. तिचा कार्यकाळ काही महिन्यांत संपणार असल्याने, तिची जागा पुढील वर्षीच्या OTW निवडणुकीपर्यंत उघडी ठेवली जाईल. संचालक मंडळाच्या सदस्य म्हणून आणि OTW स्वयंसेवक म्हणून अनेक वर्षे सेवा केल्याबद्दल आम्ही जेसचे आभार मानू इच्छितो. तिच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही तिला शुभेच्छा देतो. OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक… Read more
२०२२ OTWच्या (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळाच्या) निवडणुकीचा निकाल
यावर्षीच्या निवडणुकीत आमच्या सर्व उमेदवारांनी केलेल्या मेहनतीसाठी, निवडणूक समिती आपले आभार मानू इच्छित आहे. त्यासह, आम्ही २०२२ च्या निवडणुकीचा निकाल सादर करण्यास आनंदित आहोत. खालील उमेदवार (वर्णक्रमानुसार) अधिकृत-पणे संचालक मंडळावर निवडले गेले आहेत: हेदर मक्गवायर नतालिया ग्रुबेर आधी सांगितल्याप्रमाणे, संचालक मंडळाला हे जाहीर करताना खेद वाटतो की २०२१ मध्ये निवडून आलेले संचालक ए. अना सेगेदी यांनी २०२२ च्या निवडणुकीपूर्वी बोर्डावरील तिच्या पदावरून माघार घेतली आहे. ए. अना सेगेदी यांच्या सेवेबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत आणि त्यांच्या कार्य आणि समर्पणाबद्दल त्यांचे आभार मानतो. रिक्त जागा भरण्यासाठी, या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला उमेदवार, मिशेल श्रोडर, संचालक मंडळात सामील होणार आणि ते १ ऑक्टोबरपासून, ए. अना सेगेदीच्या उर्वरित कार्यकाळ… Read more
OTW उद्देश विधान २०२२-२०२५
आम्ही OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) आपल्याला आमचे उद्देश विधान सांगण्यास उत्साहित आहोत. पुढील कागदपत्र म्हणजे आमच्या नवीन धोरणात्मक योजनेची रचना दर्शवेल. ह्या गोष्टी घडवून आणण्या करीता येत्या साधारण १२ महिन्यांमध्ये आम्ही विशिष्ट उद्दिष्ट्ये आणि कृती योजना ठरवू. आमची अंतीम योजना परिवर्तनशील असली व आमच्या आस-पासचे बदल सामावून घेण्यास सक्षम असली तरी हे उद्देश विधान हा एक पाया असेल ज्यावर आम्ही OTW सुधारित करण्यासाठी आणि त्याला रसिकांना सेवा उपलब्ध करण्यास मदत करण्याचे कार्य करू. मिशन विधान OTW ही एक ना-नफा संघटना आहे जी रसिक-कार्यांचा इतिहास व रसिक-संस्कृती त्यांच्या विविध छटांमध्ये जतन करून व उपलब्ध करून रसिकांच्या आवडी जपण्यासाठी रसिकांनीच स्थापित केली. आमचे असे मत आहे की… Read more
रसिकमुक्तद्वार प्रकल्प १२ बाहेरच्या संग्रहांचं २०२१ मध्ये आयात होणं साजरा करत आहे!
Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प) ला जाहीर करण्यात आनंद होतं आहे की २०२१ मध्ये आम्ही १२ बाहेरून संग्रह आयात करण्याचे प्रकल्प पूर्ण केले आहेत, एकूण ४,००० पेक्षा जास्त कलाकृत्या! आम्हाला आशा आहे की तुम्हाला तुमचे जूने वं नवे आवडते कार्य खाली दिलेल्या संकलनाच्या यादी मध्ये मिळतील.