जवळजवळ ती वेळ आली आहे: आंतरराष्ट्रीय रसिक-कृती दिन (किंवा “IFD” स्वल्प रुपामध्ये, त्याचे इंग्रजीतील एक्रोनिम) हा लवकरच येत आहे! दर वर्षी १५ फेब्रुवारी ला असलेल्या या दिनी, आम्ही खूप काही नियोजित केले आहे आणि आपण हा साजरा करण्यास आम्हास सामिल व्हाल अशी आम्ही आशा करतो! Read More

अंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन २०२०
आज अंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन आहे, आणि आम्हाला आमच्या सर्व अप्रतिम स्वयंसेवकांचे आभार मानायचे आहेत जे OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) चालु ठेवतात. OTW कडे सद्ध्या ८९४ स्वयंसेवक आहेत, जे १८ समित्यांमध्ये काम करतात – व त्यापैकी असे अनेक स्वयंसेवक आहेत जे संघटने म्ध्ये एकाहून अधिक भूमिका निभावतात! त्याउपर, काही स्वयंसेवकांनी OTW साठी बराच काळ काम केले आहे! ६ स्वयंसेवक अगदी सुरुवातीपासून सोबत आहेत, आणि ३७ स्वयंसेवक १० वर्ष किंवा जास्त साठी बरोबर आहेत. त्यांच्या या दीर्घ काळाच्या सेवेसाठी त्यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. Read More

जुन्या सदस्यांसाठी नवीन OTW भेटींचे सादरीकरण
शेवटच्या ॲाक्टोबर सदस्यता ड्राईव्ह च्या वेळी, आम्ही घोषणा केली होती की आम्ही OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) च्या सर्वात निष्ठावंत समर्थकांना साजरे करण्यासाठी एका नवीन मार्गावर काम करित आहोत. आम्ही तीन, पाच व दहा वर्षांच्या सलग सदस्यतेच्या उत्सवासाठी रचना केलेल्या नवीन निवडक भेटी आपल्याला दाखवण्यास आनंद होत आहे! Read More