परिवर्तनात्मक कार्यांची निर्मिती उत्साहवर्धक करून व त्याचे जतन करून रसिकगटांची सेवा करण्याच्या मिशन सह, रसिकांनी रसिकांसाठी OTW(परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) २००७ साली स्थापित केली. चौदा वर्षांनंतरही, आमची वचनबद्धता अटळ आहे. जगभरातील रसिक-शत्रु कायद्यांच्या विरोधात केलेली कायदेशीर वकिली असो, धोक्यात असलेल्या रसिक-कार्यांचा बचाव, रसिक इतिहास मुद्रित करणे, रसिक-अभ्यासाच्या शिष्यवृत्तीसाठी स्थळ प्रदान करणे असो, व आपली जुनी वा नवीन रसिक-कार्य स्थपित करणे असो, रसिकांचा व त्यांनी निर्मित केलेल्या रसिक-कार्यांचा बचाव करण्यास OTW सतत कार्यरत आहे.
आपल्या मदतीशिवाय आम्हाला हे करणे शक्य नाही. जसे आम्ही दर एप्रिल व ऑक्टोबर मध्ये करतो, पुढच्या तीन दिवसांदरम्यान आम्ही आपणास OTW ला सामील होण्याचे आणि आमच्या कार्यास देणगी देऊन समर्थन देण्याचे आवाहन करीत आहोत. या वेळी देणगी देणे आपल्याला शक्य नसेल, तर आमच्या ड्राइव्ह ची बातमी आपल्या रसिकगट नेटवर्क मध्ये इतरांपर्यंत पोहचवणे कृपया विचारात घ्यावे, व कृपया हे जाणून घ्या कि आपण कोणत्याही पद्धतीने OTW साठी वचनबद्धता दाखवलीत तरी आपल्या सहभागाची व उत्साहाची आम्ही नेहमीच दाद देतो.