Posts in Volunteers & Recruiting

आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस २०२१ साजरा करणे

२००९ मध्ये आमच्या स्थापने पासून, OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) हे रसिकांनी घडविले व चालविले आहे. आज पर्यंत, हे खरे राहिले आहे: OTW संघटना हि रसिकांतर्फे रसिकांसाठी आहे, आणि तेच रसिक OTW ला प्रत्येक स्तरावर ताकदवान बनवितात. आमच्या प्रत्येक समितीमध्ये, स्वयंसेवक हे आमचे प्रकल्प नीट चालावेत व पुढे जावेत या साठी आवश्यक कार्य पार पाडतात. त्यांच्याशिवाय OTW अस्तित्वात नसली असती, आणि आम्ही त्यांच्या अत्यावश्यक कार्यासाठी अत्यंत कृतज्ञ आहोत.