Posts in Financial Support
ऑक्टोबर २०२५ सदस्यत्व मोहीम: आपल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद
OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) ची ऑक्टोबर सदस्यत्व मोहीम आता संपली आहे आणि आम्हाला हे सांगण्यात खूप आनंद होत आहे की आपल्याला एकूण US$२८८,६९२.२८ देणगी मिळाली आहे. आम्ही खास करून खुश आहोत की ७,३३९ दात्यांनी देणगी देऊन त्यांचे OTW सदस्यत्व चालू ठेवले किंवा नवीन सदस्य झाले, ज्यानेकरून आमचा ४,५०० सदस्यांचा ध्येय पूर्ण झाला. या देणग्या एकूण ७९ देशातल्या ८,७५३ लोकांनी दिल्या: त्या सर्वांना धन्यवाद आणि मोहिमेबद्दल प्रसार केलेल्या आपल्यापैकी सर्वांनाही धन्यवाद. OTW हे त्याच्या जगभरातल्या वापरकर्त्यांशिवाय शक्यच नसते, आणि की आपण सतत आमच्या पाठीशी आहात ही आमच्यासाठी एक गर्वाची व आनंदाची गोष्ट आहे! रसिककृती आणि रसिक संस्कृतीच्या इतिहासाला पाठिंबा आणि पोहच देणे व त्यांचे संरक्षण करणे… Read more
ऑक्टोबर २०२५ सदस्यता मोहीम: तांत्रिक व्यवस्था ज्याला आपण पाठिंबा देता
Archive of Our Own – AO3 (आपला स्वतःचा संग्रह) वाढत राहतोय व नवीन टप्पे गाठतोय. केवळ या एका वर्षात, आपण नव्वद लाख वापरकर्ते, दहा लाख मँडरीन चिनी रसिककृती, आणि १ करोड़ ५० लाख रसिककृती झाल्याचा आनंद साजरा केला—आपण कधी विचार केलाय का, की हे सगळं चालू ठेवण्यासाठी पडद्यामागे काय काम होत असे? आपली उदार देणगी ज्या ठिकाणांना पोचते, त्यापैकी एक आहे आमची तांत्रिक व्यवस्था समिती. ही समिती AO3चा माहितीसाठा व त्याच्या शोध प्रणालींना चलित ठेवणाऱ्या सर्व्हर्सना अपग्रेड करण्याचा कठीण कामात व्यस्त आहेत, जेणे करून या सतत वाढणाऱ्या वापरकर्ते व क्रियाकलापाला आम्ही सांभाळू शकू. तांत्रिक व्यवस्था समिती OTW’s (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ)च्या प्रकल्पांना चलित ठेवणारी पायाभूत सुविधा… Read more
एप्रिल २०२५ सदस्यता मोहीम: आपल्या आधाराबद्दल धन्यवाद
OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) ची एप्रिल सदस्यता मोहीम आता संपली आहे, आणि आम्हाला हे सांगायला खूप आनंद होत आहे कि हि मोहीम US$२६९,७६६.०१ उभारून संपत आहे, आमच्या US$७५,०००.०० ह्या ध्येयापेक्षा खूप जास्त. ह्या देणग्या ८,२१६ लोकांकडून आल्या आहेत जे ८२ देशात राहतात: देणगी देणाऱ्या प्रत्येकाला धन्यवाद, आणि त्यांना सुद्धा ज्यांनी ह्या मोहिमेबद्दल पोस्ट आणि शेयर केले! आम्हाला खास करून ह्याचा आनंद आहे कि ७,०६४ देणगीदारांनी OTW ची सदस्यता घेण्याचा किंवा नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला. OTW च्या वापरकर्त्यांशिवाय हि संस्था अस्तित्वातच नसती, आणि आमच्यासाठी आपला चालू आधार हा आमचा अभिमान आणि आनंद आहे! आम्हाला ह्याचा खूप आनंद आहे कि रसिककृतींच्या आणि रसिक संस्कृतींच्या इतिहासाला आधार देण्याचे,… Read more
एप्रिल २०२५ सदस्यता मोहीम: चाहत्यांसाठी, चाहत्यांद्वारे
२००७ मध्ये स्थापन झाल्यापासून, OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) चाहत्यांसाठी, चाहत्यांद्वारे चालवले जाते. जगभरातील विविध पिढ्यांमधील चाहत्यांकडून आमच्या प्रकल्पांमध्ये वाढती रस आणि पाठिंबा पाहून आम्ही आनंदाने भारावून गेलो आहोत, आणि OTW सदस्य आणि देणगीदारांकडून मिळालेल्या आर्थिक मदतीबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत, ज्यामुळे आमच्या प्रकल्पांच्या दैनंदिन खर्चाची पूर्तता करताना राखीव निधी उभारण्यास मदत झाली आहे. आमच्या कोणत्याही प्रकल्पात समस्या येतात तेव्हा हे निधी, तुमची दयाळूपणा आणि पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो, जसे की गेल्या काही महिन्यांत Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) ला आलेला डाउनटाइम आणि मंदावलेला अनुभव. या समस्या सोडवण्यासाठी आम्ही महत्त्वाची पावले उचलत आहोत आणि या काळात तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि संयमाबद्दल आम्ही… Read more
एप्रिल २०२४ सदस्यता मोहीम: आपल्या आधारासाठी धन्यवाद
OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) ची एप्रिल मधील सदस्यता मोहीम आता संपली आहे, आणि आम्हाला हे सांगायला खूप आनंद होत आहे कि हि मोहीम US$२०७,०८८.९१ उभारून संपत आहे, आमच्या US$५०,०००.०० ह्या ध्येयापेक्षा खूप जास्त. ह्या देणग्या ६,०७३ लोकांकडून आल्या आहेत जे ७० देशात राहतात: ह्या प्रत्येकाला धन्यवाद, आणि त्यांना सुद्धा ज्यांनी ह्या मोहिमेबद्दल पोस्ट आणि शेयर केले! आम्हाला खास करून ह्याचा आनंद आहे कि ५,२०६ इतक्या देणगीदारांनी OTW ची सदस्यता घेण्याचा किंवा नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला. OTW च्या वापरकर्त्यांशिवाय आणि सदस्यांशिवाय हि संस्था अस्तित्वातच नसती, आणि आमच्यासाठी आपला चालू आधार हा आमचा अभिमान आणि आनंद आहे! आम्हाला ह्याचा खूप आनंद आहे कि रसिककृतींच्या आणि रसिक संस्कृतींच्या… Read more