Posts in Finance Committee

OTW वित्त: २०१९ बजेट अद्यतन

वर्षाच्या सुरूवातीस, OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) ने त्याचे २०१९ बजेट प्रकाशित केले . वर्षाचा शेवट जवळ येत असताना, आम्ही उर्वरित वर्षासाठी आमच्या आर्थिक क्रियाकलाप आणि, आमच्या योजना कशा बदलल्या किंवा पुढे आल्या आहेत, याबद्दल एक अद्यतनित करू इच्छितो. आमची अर्थसमिती OTWच्या आर्थिक क्रियाकलापांचा मागोवा घेते, आर्थिक विधान आणि अहवाल तयार करते आणि लेखाच्या मानकांचे आणि नियमांचे पालन सुनिश्चित करते. आम्ही आमच्या प्रक्रियेत सुधारणा आणि दस्तऐवजीकरण करण्याचे काम केले आहे, OTWला त्याचे आर्थिक भवितव्य आखण्यास मदत केली आहे आणि आमच्या २०१८ च्या आर्थिक स्टेटमेन्टचे वार्षिक लेखापरीक्षण संपवण्याच्या जवळ आहोत.

OTW वित्त: २०१९ बजेट

२०१८ हे OTWच्या (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) वित्त संघासाठी एक व्यस्त आणि उत्पादनशील वर्ष होते. बिले भरली आहेत, रेकॉर्ड ठेवणे अचूक असते आणि मानक खातेबद्ध प्रक्रिया पूर्ण केली जातात, याची खात्री करण्यासाठी आम्ही पार्श्वभूमीत कार्य करणे सुरू ठेवतो. २०१८ च्या आर्थिक वक्तव्यासाठी आणि लेखापरीक्षणांची तयारी सुरू आहे! आणि आता आम्ही २०१९ साठी बजेट सादर करतो (अधिक तपशीलवार माहितीसाठी बजेट स्प्रेडशीट पहा):

OTW वित्त: 2018 बजेट

2017 हे OTWच्या (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) वित्त संघासाठी एक व्यस्त आणि उत्पादनशील वर्ष होते. आम्ही संस्थेच्या आर्थिक धोरणाची कार्यक्षमता आणि मानक लेखा पद्धतींचे अनुयायी सुधारणे चालू ठेवले आहे. आम्ही आमच्या वित्तीय स्टेटमेन्टची पहिली ऑडिट केली, जी 2018 च्या सुरुवातीस समाप्त झाली. आपण OTW फायनान्स पेजवर 2015 आणि 2016 साठी आमचे लेखापरिक्षित वित्तीय स्टेटमेन्ट पाहू शकता. आम्ही आता आमच्या 2017 वित्तीय स्टेटमेन्ट्सच्या ऑडिटची तयारी करत आहोत, जे काही आठवड्यांत सुरू व्हायला हवे. पुढील अडथळा न करता, आमचे 2018 चे बजेट आहे. अधिक तपशीलवार माहितीसाठी (बजेट स्प्रेडशीट डाउनलोड करा .)