Posts in Elections
२०२५ OTW निवडणुकीचे आकडेवारी
आता २०२५ ची निवडणूक संपली असल्यामुळे, आम्हाला आमची मतदानाची आकडेवारी आपल्याला सांगण्यास आनंद होत आहे! २०२५ च्या निवडणुकीसाठी आमच्याकडे १५,१३८ पात्र मतदार होते. त्यापैकी २,१९७ मतदारांनी मतदान केले, जे संभाव्य मतदारांच्या २२.८% आहे. मागील वर्षीच्या तुलनेत आमचे यावर्षीच्या मतदार कमी आहे, ज्यांचे मतदान २२.८% होते. आम्ही टाकलेल्या मतपत्रिकांच्या संख्येत घट देखील दिसून आली; ३,४१५ ते २,१९७ पर्यंत, जे ३५.६% घट दर्शवते.
२०२५ OTW बोर्डाचे मतदान आता खुले!
निवडणूक खुली आहे! प्रत्येक नवीन OTW (परिवर्तनात्मक रसिककला मंडळी) सदस्य जे जुलै १, २०२४ ते जून ३०, २०२५ मध्ये दाखल झाले आहेत त्यांना मतपत्रिका प्राप्त झाली असेल. जर तुम्हाला मिळाली नसेल तर तुमचे स्पॅम फोल्डर आधी तपासा, व नंतर आमच्याशी या तर्फे संपर्क करा संपर्क फाॅर्म. देणगी पावतीची तारीख यूटीसी वेळेप्रमाणे दिली जाते. कृपया आपल्या पावतीची तारीख तपासा. जर आपली देणगी पावती ३० जून नंतरची असेल, तर आपण मतदान करण्यास पात्र नसाल. जर आपल्याला खात्री नसेल कि आपली देणगी अंतिम मुदतीच्या आधी दिली गेली आहे कि नाही, तर कृपया आमच्या वेबसाईट वरील संपर्क फॉर्म वापरून व “Is my membership current/Am I eligible to vote?(माझे सभासदत्व… Read more
OTW सदस्य – मतदानाच्या सूचनांसाठी आपला ईमेल तपासा
यावेळी, मतदानास पात्र असलेल्या OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) च्या सर्व सदस्यांना २०२५ च्या मतदानाच्या सूचनांशी जोडलेला ईमेल मिळाला असेल. विषय “Voting Instructions for Organization for Transformative Works (OTW) Board Election” (OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) बोर्ड निवडणुकीसाठी मतदान सूचना) होता. कृपया लक्षात घ्या की ज्याला हा ईमेल प्राप्त झाला नाही तो यावर्षी मतदार यादी मध्ये नाही आणि त्यांना मतपत्रिका प्राप्त होणार नाही. मतदान सूचना ईमेलमध्ये मतपत्रिकेच्या चाचणी आवृत्तीचा दुवा आहे. कृपया पृष्ठ योग्य प्रकारे प्रदर्शित होईल आणि उमेदवार दृश्य आहेत याची खात्री करण्यासाठी त्या दुव्याचे अनुसरण करा. नसल्यास, कृपया खात्री करा की आपण ajax.googleapis.com आणि/किंवा bootstrapcdn.com वरून जावास्क्रिप्ट अवरोधित करत नाही आहात.
२०२५ OTW निवडणुकांचे उमेदवार घोषणा
उमेदवार घोषणा OTW (परिवर्तनात्मक रसिककला मंडळी) आनंदाने आमच्या २०२५ चे उमेदवारांची घोषणा खालील प्रमाणे करू इच्छितो (पहिल्या नावाच्या अक्षर क्रमानुसार): सी. रायन एस. एलिझाबेथ डब्ल्यू. हार्लन एल.बी. कारण आम्हाला २ जागा भरायच्या आहेत आणि 3 उमेदवार आहेत, २०२५ वर्षाची निवडणूक स्पर्धेची असेल– म्हणजे, OTW चे सदस्य, कुठले उमेदवार जागा भरतील, या साठी मतदान करतील.
२०२५ OTW निवडणुकीचे वेळापत्रक आणि सदस्यता अंतिम मुदत
संचालक मंडळाच्या नवीन सदस्यांसाठी २०२५ च्या निवडणुकांचे वेळापत्रक प्रदर्शित केल्याची घोषणा करताना OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी)च्या निवडणूक समितीला आनंद होत आहे! पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे, झिशिन झांगनी कार्यकाळ संपण्यापूर्वी संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. या वर्षी, खालील संचालक त्यांच्या पदाची अवधि संपल्यामुळे संचालक मंडळ सोडत आहेत: Jennifer Haynes OTW च्या संचालक मंडळावर ७ संचालक असतात आणि या वर्षी OTW सदस्य २ नवीन संचालक निवडतील, जे तीन वर्षांसाठी हे पद धरतील. या वर्षाची निवडणूक ऑगस्ट १५-१८ ला होणार आहे. याचा अर्थ असा की कर्मचार्यांना आपली उमेदवारी जाहीर करण्याची अंतिम मुदत जून २० आहे. नेहमीप्रमाणे, निवडणूक सदस्यतेची अंतिम मुदत जून ३० आहे. आपल्याला मतदान करण्याची इच्छा असल्यास, कृपया आपली… Read more