Posts in Development & Membership Committee

एप्रिल २०२१ ड्राईव्ह: आपल्यासाठी टाळ्या

परिवर्तनात्मक कार्यांची निर्मिती उत्साहवर्धक करून व त्याचे जतन करून रसिकगटांची सेवा करण्याच्या मिशन सह, रसिकांनी रसिकांसाठी OTW(परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) २००७ साली स्थापित केली. चौदा वर्षांनंतरही, आमची वचनबद्धता अटळ आहे. जगभरातील रसिक-शत्रु कायद्यांच्या विरोधात केलेली कायदेशीर वकिली असो, धोक्यात असलेल्या रसिक-कार्यांचा बचाव, रसिक इतिहास मुद्रित करणे, रसिक-अभ्यासाच्या शिष्यवृत्तीसाठी स्थळ प्रदान करणे असो, व आपली जुनी वा नवीन रसिक-कार्य स्थपित करणे असो, रसिकांचा व त्यांनी निर्मित केलेल्या रसिक-कार्यांचा बचाव करण्यास OTW सतत कार्यरत आहे. आपल्या मदतीशिवाय आम्हाला हे करणे शक्य नाही. जसे आम्ही दर एप्रिल व ऑक्टोबर मध्ये करतो, पुढच्या तीन दिवसांदरम्यान आम्ही आपणास OTW ला सामील होण्याचे आणि आमच्या कार्यास देणगी देऊन समर्थन देण्याचे आवाहन करीत… Read more

जुन्या सदस्यांसाठी नवीन OTW भेटींचे सादरीकरण

शेवटच्या ॲाक्टोबर सदस्यता ड्राईव्ह च्या वेळी, आम्ही घोषणा केली होती की आम्ही OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) च्या सर्वात निष्ठावंत समर्थकांना साजरे करण्यासाठी एका नवीन मार्गावर काम करित आहोत. आम्ही तीन, पाच व दहा वर्षांच्या सलग सदस्यतेच्या उत्सवासाठी रचना केलेल्या नवीन निवडक भेटी आपल्याला दाखवण्यास आनंद होत आहे!

ऑक्टोबर २०२० ड्राइव्ह: आपल्या समर्थनाबद्दल धन्यवाद

OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) ची द्वि-वार्षिक सदस्यता ड्राइव्ह संपली आहे आणि, आम्ही आनंदी आहोत की जरी आम्ही ५००० नवीन सदस्यांचे लक्ष्य गाठू शकलो नसू तरी आम्ही ६९ देशांमध्ये एकूण २५०० सदस्यता नोंदणीकृत केल्या आहेत, ज्या मुळे या कालावधीत एकूण US$८९,६८८.५१ निधी उभारली गेली आहे. आपल्या सर्वांचे शतश: धन्यवाद!

ॲाक्टोबर २०२० ड्राईव्ह: एक-साथ प्रगती

OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) ची कल्पना, जडण-घडण व रचना लोंकांतर्फे अशा लोकांसाठी झाली जे आमच्या सेवेचा वापर करतात. हे आम्हाला विलक्षण बनवते! आमचे वकील, व्यवस्था प्रशासक व प्रकल्प चालवणारे इतर स्वयंसेवक असोत; दाते ज्यांचे औदार्य आमचे आर्थिक स्वास्थ्य पक्के करते; किंवा लेखक, कलाकार आणि इतर योगदान-कर्ते ज्यांच्या मेहनतीच्या कार्यांचे वास्तव्य फॅनलोर, Transformative Works and Cultures – TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह) इथे आहे, पण, प्रत्येक रसिकाच्या वेळ, प्रेम व निष्ठे शिवाय, आम्ही करतो ते काहीही करणे शक्य झाले नसते. आपण वेगळे असण्यापेक्षा एक-साथ जास्त सामर्थ्यवान आहोत. म्हणूनच, आज आम्ही आपल्याला OTW चे सदस्य होण्याचे आवाहन… Read more