Posts in Development & Membership Committee
एप्रिल २०२२ सदस्यता ड्राईव्ह: आपल्या सहकार्यासाठी धन्यवाद
परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळाची (OTW) एप्रिल सदस्यता ड्राईव्ह संपली आहे आणि आम्हाला सांगायला खूप आनंद होत आहे की आम्ही आमचे US$40,000.00 चे निधी उभारण्याचे ध्येय पार केले आहे, आणि एकूण US$275,724.51 उभारले आहेत, 84 देशांमधील 7,528 लोकांच्या देणग्यांमुळे. आम्ही विशेषतः ह्या बातमीने खुश आहोत की 5,810 देणगीदारांनी त्यांची OTW ची सदस्यता पुन्हा चालू केली आहे किंवा नव्याने चालू केली आहे. आमच्या जागतिक समुदायातील सर्वांचे खूप खूप आभार ज्यांनी ड्राईव्ह दरम्यान शेयर आणि पोस्ट केले आणि देणग्या दिल्या. आपले सहकार्य आमच्या चालू मिशन ला महत्व देते: त्यांच्या असंख्य रूपांमध्ये, सर्व रसिक कृतींच्या आणि रसिकसंस्कृतींच्या इतिहासाला उपलब्ध करून देणे आणि जतन करणे रसिकांच्या रुचीची सेवा करण्यासाठी. आम्हाला ह्याचा… Read more
एप्रिल २०२२ सदस्यता मोहीमः आता पत्ते आपल्या हातात आहेत.
OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) हे रसिकांनी, आकारले, घडविले आणि रचले. आम्हाला स्वयंसेवक श्रमिकांचा पाठिंबा आहे जे आमचे कर्मचारी आहेत आणि त्याचबरोबर आमच्या सदस्यांच्या उदारपणाचे पाठबळ सुद्धा आमच्या जवळ आहे. येत्या एप्रिल मध्ये, जेव्हा आम्ही आमची द्वैवार्षिक सदस्यता मोहीम प्रारंभ करत आहोत त्याआधी आम्हाला परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळाच्या सदस्यतेचे फायदे स्पष्ट करावेसे वाटतात, जे अश्या लोकांना उपलब्ध आहेत जे US$१० किंवा जास्त देणगी देतात; व त्याच बरोबर आमच्या देणगीदारांची प्रशंसा इतर कोणत्या पद्धतीने आम्ही करतो ह्याचे सुद्धा वर्णन करायचे आहे. आम्ही हे जाणतो की आम्हाला भेट देणारे अनेक जण येत्या मोहीमेमध्ये देणगी देऊ शकणार नाहीत; व आमच्या समुदायाचा प्रत्येक सदस्य मग त्यांचे योगदान आर्थिक असो वा त्यांच्या… Read more
ऑक्टोबर २०२१ मोहीम: आपल्या समर्थनासाठी धन्यवाद
OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) ची ऑक्टोबर सदस्यता मोहीम पूर्ण झाली आहे, आणि आम्हाला हे सांगायला खूप आनंद होत आहे की आम्ही तब्बल US$195,009.65 उभारले आहेत, आमच्या US$४०,००० च्या ध्येयायहून खूप जास्त. आम्ही आमची सदस्यता सुद्धा 4,786 पर्यंत वाढवली आहे. हे शक्य झाले आहे 6,700 दात्यांच्या उदारतेमुळे, जे जगभरातील 77 देशातून आहेत. नेहमीप्रमाणेच, आम्ही आमच्या जागतिक समुदायासाठी खूप कृतज्ञ आहोत. धन्यवाद! तुमचे समर्थन आम्हाला आमच्या मिशन च्या सेवेत काम चालू ठेवायला देते ज आहे: रसिककृतींना आणि रसिकसंस्कृतींच्या सर्व रूपांना शिरकाव देऊन आणि जोपासून आम्ही प्रतिनिधित्व करीत असलेल्या रसिकांचे हितसंबंध पुढे करणे.
ऑक्टोबर २०२१ ड्राइव्ह: चाहत्यांद्वारे , चाहत्यांसाठी
OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) हे प्रेमाचे श्रम आहे. हे चाहत्यांद्वारे, चाहत्यांसाठी बनवलं गेलं आहे. आम्ही एक ना-नफा-ना-तोटा तत्त्वाधारित संस्था आहोत, आणि आम्ही १००% देणग्यान वर अवलंबून आहोत: आमच्या स्वयंसेवकांन कडून वेळेची देणगी आणि आम्ही सेवा देत असलेल्या समुदायाकडून निधीचे दान. आज आमच्या द्विवार्षिक सदस्यता मोहिमेची सुरवात आहे, जेव्हा आम्ही विचारतो की तुमच्यापैकी जे हे करण्यास सक्षम आहेत त्यांनी आमच्या कार्याला समर्थन देण्यासाठी आर्थिक योगदान देण्याचा विचार करावा. आम्ही तुमचे पैसे आमच्या बजेटमध्येकसे खर्च करतो याबद्दल वाचू शकता.
एप्रिल २०२१ ड्राईव्ह: आपल्या समर्थनासाठी धन्यवाद
OTW(परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) साठी असलेली एप्रिल सदस्यता ड्राईव्ह समाप्त झाली आहे, त्यामध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. आम्ही अचंबित व कृतज्ञ आहोत कि ड्राईव्ह च्या दरम्यान, आम्ही आमच्या US$५०,००० ध्येयाला मागे टाकून ८४ देशांमधील ९,११० देणगीदारांकडून US$२६४,९१८.८५ जमा केले. आम्ही आमची सदस्यताही १६,८४२ एवढी वाढवली. आपण सर्वजण अफाट आहात: धन्यवाद!