
यावेळी, मतदानास पात्र असलेल्या OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) च्या सर्व सदस्यांना २०२१ च्या मतदानाच्या सूचनांशी जोडलेला ईमेल मिळाला असेल. विषय “Voting Instructions for Organization for Transformative Works (OTW) Board Election” (OTW बोर्ड निवडणुकीसाठी मतदान सूचना) होता. कृपया लक्षात घ्या की ज्यांना हा ई-मेल मिळाला नाहीये ते ह्यावर्षी मतदार यादी मध्ये नाहीयेत आणि त्यांना मतपत्रिका मिळणार नाही.
मतदान सूचना ईमेलमध्ये मतपत्रिकेच्या चाचणी आवृत्तीचा दुवा आहे. कृपया पृष्ठ योग्य प्रकारे प्रदर्शित होत आहे आणि उमेदवार नीट दिसत आहेत याची खात्री करण्यासाठी त्या दुव्याचे अनुसरण करा. नसल्यास, कृपया खात्री करा की आपण ajax.googleapis.com, bootstrapcdn.com, आणि/किंवा opavote.com वरून जावास्क्रिप्ट अवरोधित करत नाही आहेत.
जर आपण OTW सदस्य आहेत आणि तरीही हा ईमेल तुम्हाला मिळाला नसेल तर कृपया पुढील गोष्टी करा:
- आपले स्पॅम फोल्डर तपासा.
- जर आपण Gmail वापरत वापरत असाल तर आपला सामाजिक टॅब तपासा.
- जर ईमेल स्पॅम म्हणून चिन्हांकित केला असेल तर ते चिन्हांकन काढा. अन्यथा, आपल्याला आपली मतपत्रिका प्राप्त होणार नाही, कारण ती देखील स्पॅममध्ये जाईल.
- जर कोणताही ईमेल नसेल तर आपली देणगी पावती उघडा आणि तारीख तपासा.
- या निवडणुकीत मतदान करण्यासाठी, आपली पावती दिनांक १ जुलै २०२० आणि ३० जून २०२१ दरम्यान असणे आवश्यक आहे.
- जर आपण चेकद्वारे पैसे दिले असतील तर आपली सदस्यता चेकच्या आगमनाच्या तारखेद्वारे मोजली जाते. कृपया नोंद असुद्या की आपल्या देणगी पावती वर US पूर्व वेळेप्रमाणे तारीख असेल, व जर आपली देणगी ३० जून २०२१ १९.५९ नंतर नोंदलेली असेल, तर आपण मतदान करण्यास पात्र नसाल. जर आपल्याला खात्री नसेल की आपण देणगी अंतिम मुदतीच्या आधी दिली आहे वा नाही, तर कृपया आमच्या वेबसाईटवरचा संपर्क फॉर्म वापरून व “माझे सदस्यत्व चालू आहे का/मी मतदान करण्यास पात्र आहे का?” हे निवडून आमच्या अर्थपुरवठा व सदस्यता समितीशी संपर्क करा.
- जर आपली देणगी पात्र कालावधी दरम्यान केली गेली असेल तर सदस्य होण्यासाठी आपण बॉक्स चेक केला असल्याची खात्री करा. जे कमीतकमी $१० देतात त्यांच्यासाठी सदस्यत्व ऐच्छिक असते; केवळ सदस्य मतदान करू शकतात.
- जर आपण सदस्य असाल, तर आपण OTW कडून कोणतेही ईमेल स्पॅम म्हणून चिन्हांकित केले नाहीयेत व OTW च्या इमेल्स ची किंवा मागच्या वर्षीच्या मतपत्रिकेची निवड रद्द केली नाहीयेत याची खात्री करा. जर आपण असे केले असेल आणि या वर्षी मतदान करू इच्छित असाल तर आपण खालील चरण ५ चे अनुसरण करणे आवश्यक आहे.
- जर आपण पात्र कालावधी दरम्यान कमीतकमी $१० दान केले असेल आणि सदस्य होण्यासाठी आपण बॉक्स चेक केला असेल तर कृपया निवडणूक संपर्क फॉर्म भरा आणि “Is my membership current/Am I eligible to vote?” (माझे सदस्यत्व चालू आहे का/मी मतदान करण्यास पात्र आहे का?) हा विषय निवडा. देणगी देताना आपण वापरलेला ईमेल निश्चितपणे समाविष्ट करा.
- सदस्यतेचा व Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) किंवा फॅनलोरचे वापरकते असण्याचा काहीही संबंध नाहीये. कृपया आम्हाला आपले AO3 किंवा फॅनलोर सदस्यनाम देऊ नका– हे नाव कोणाचे आहे हे जाणून घेण्याचा आमच्याकडे कोणताही मार्ग नाही आणि आम्हाला ते जाणून घ्यायचे नाही.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर आपल्या मतदानाच्या सूचनांचा ईमेल बाउन्स झाला, स्पॅम म्हणून चिन्हांकित झाला, किंवा आपण त्याची निवड रद्द केली असेल तर आपल्याला यावर्षीच्या निवडणुकीसाठी मतपत्रिका प्राप्त होणार नाही आणि पुढील वर्षाची मतपत्रिका कदाचित मिळणार नाही. तसेच, मागच्या वर्षी या पैकी काही घडले असेल तर तुम्हाला या वर्षी मतपत्रिका प्राप्त होणार नाही. म्हणून, आपण यापूर्वी OTW ईमेलची निवड रद्द केली असेल किंवा त्यांना स्पॅम म्हणून चिन्हांकित केले असेल आणि मतदान करू इच्छित असाल तर निवडणूक संपर्क फॉर्म भरा आणि “Is my membership current/Am I eligible to vote?” हा विषय निवडा.
OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.