
जेस व्हाईटने वैयक्तिक कारणांमुळे संचालक म्हणून तिच्या भूमिकेतून राजीनामा दिला आहे हे जाहीर करताना OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) संचालक मंडळाला दुःख होत आहे. जेस २०२० मध्ये तिच्या जागेवर निवडून आली होती आणि तिचा राजीनामा ५ नोव्हेंबर २०२२ पासून प्रभावी आहे. तिचा कार्यकाळ काही महिन्यांत संपणार असल्याने, तिची जागा पुढील वर्षीच्या OTW निवडणुकीपर्यंत उघडी ठेवली जाईल.
संचालक मंडळाच्या सदस्य म्हणून आणि OTW स्वयंसेवक म्हणून अनेक वर्षे सेवा केल्याबद्दल आम्ही जेसचे आभार मानू इच्छितो. तिच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही तिला शुभेच्छा देतो.
OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, <भाषांतर पृष्ठ पहा.