OTW चे सदस्य बना आणि २०२४ च्या निवडणुकीं मध्ये आपलं मत द्या!

निवडणुकीची वेळ जवळच आहे! OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळा) चे सदस्य असल्यास आपण संचालक मंडळासाठी आपलं मत देऊ शकाल. ह्या मुळे Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह), फॅनलोर, आणि Transformative Works and Cultures – TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) सारखे प्रकल्प अत्ता व ह्या पुढे कशे चालवले जातील ह्या वरती प्रभाव आणण्यास मदत होईल. ह्या वर्षी आमचे संचालक मंडळाची निवडणुक ऑगस्ट १६ ते ऑगस्ट १९ पर्यंत चालतील. (संपूर्ण निवडणुक वेळपत्र २०२४ मध्ये प्रवेश मिळवा.)

जून ३०, २०२४ च्या मध्यरात्री UTC (माझ्यासाठी ही कुठली वेळ आहे?) पर्यंत OTW चे सदस्य असल्यास आपण मत देऊ शकाल. कृपया हे ध्यानात घ्या की आपली देणगीची पावतीवरची तारीख आपल्या वेळ क्षेत्रा प्रमाणे असेल ना की UTC प्रमाणे. जर आपण ३० जून रोजी देणगी दिलीत, तर आपल्या पावतीवर आपण कुठल्या निवडणुकीमध्ये मतदान करण्यास पात्र आहात ह्याची एक नोंद असेल.

ह्याचा अर्थ आपण जुलै १, २०२३ ते जुलै ३०, २०२४ च्या मध्ये US$10 किंवा जास्तीची देणगी दिली पाहिजे, आणि देणगी देताना सदस्य व्हायचा पर्याय निवडायला पाहिजे. सदस्य बनण्यासाठी आपल्याला देणगी पत्रावर असलेल्या “Do you want to be an OTW member? ($10 minimum donation)” (आपल्याला OTWचं सदस्य बनायचं आहे का? (किमान $१०ची देणगी)), ह्या प्रश्नाच्या उत्तरात “Yes” (हो) निवडायला पाहिजे. जर आपल्याला खात्री नाही आहे की हे आपण केलेल्या देणगीसाठी लागू आहे की नाही, तर मग कृपया आमच्या अर्थपुरवठा आणि सदस्यता समितीशी संपर्क साधा.

जर आपण ह्या मतदार नोंदणी मोहीमेत भाग घेतला, तर आपल्याला एक खास रचलेली चित्रखूण मिळेल जी केवळ ह्या मोहीमेत उपलब्ध असेल. OTW ला समर्थित केल्याबद्दल धन्यवाद! मत देण्यासाठी आजचं आपलं नव नोंदवा व देणगी द्या!


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.

Event

Comments are closed.