OTW: चाहत्यांद्वारे, चाहत्यांसाठी, सर्वांसाठी खुला

आमचा विश्वास आहे की निर्मिती समाजात चांगली वाढते
आणि हे विशेषतः सेन्सॉरशिपशिवाय, सर्वांसाठी उघडे आणि अदृश्य होण्याच्या धोक्याशिवाय रिक्त स्थान असणे आवश्यक आहे. अशा जगात जेथे फॅन लेबरचे बरेचदा शोषण केले जाते, सेन्सॉरशिप अनिवार्य केले जाते आणि माहिती प्रवाहात राहते, OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) असे स्थान तयार करण्याचे उद्दीष्ट ठेवते जिथे तयार करणे, विश्लेषण करणे आणि जतन करणे या सर्वांचे स्वागत आहे. आणि ते करण्यासाठी आम्ही तुमच्या देणग्यांवर अवलंबून आहोत.

AO3 ने जिंकलेलाह्यूगो पुरस्कार उत्सव आणि रसिक-स्पेसच्या महत्त्वची आठवण म्हणून दोन्ही काम करते जिथे सर्व तयार करणे, पोस्ट करणे आणि सामायिक करण्यास मुक्त आहेत, आणि OTW कल्पित सेवा देत असलेल्या अनेक मार्गांपैकी हा एक आहे. आपण Transformative Works and Cultures – TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) चे नवीनतम खंड वाचत असलात किंवा रसिकाभ्यास मंडळांच्या रसिकाभ्यास ग्रंथसंग्रहद्वारे, शोधत असलात तरीही, आमचे संशोधन आणि संदर्भ खुले आहे आणि सर्वांसाठी उपलब्ध आहे. आम्ही Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प) आणि आमच्या Legal Advocacy (कायदेविषयक मदत) च्या माध्यमातून, आम्ही रसिककृती जतन करतो आणि आम्हाला जे आवडते ते तयार करण्याचा आणि सामायिक करण्याचा अधिकार संरक्षित करतो. आणि
फॅनलोरद्वारे
, आम्ही खात्री करुन घेतो की आपण त्याबद्दल लिहू शकता, जेणेकरून आजची रसिकगण उद्या लक्षात येईल.

आमच्या प्रकल्पांमध्ये प्रीमियम पातळी नाही आणि अनलॉक करण्यासाठी लवकर प्रवेश नाही. आम्ही जे काय करतो त्या प्रत्येकासाठी उपलब्ध आहे, ते कोण आहेत आणि काय करतात याकडे आम्ही दुर्लक्ष करतो.
परंतु हे शक्य करण्याचा एकमेव मार्ग फक्त आपल्या उदार देणग्यांद्वारेआहे.

AO3 च्या वतीने नाओमी नोव्हिकच्या ह्युगो अवॉर्ड स्वीकृती भाषणात, तिने आमचे कार्य शक्य करण्यात मदत करणार्‍या प्रत्येकाचे आभार मानले, संस्थापक आणि स्वयंसेवकांद्वारे जे दररोज आमच्या रसिककृतीवर टाळ्या देतात, प्रतिक्रिया देतात आणि सोडतात. तिने आमच्या देणगीदारांचे आभारही मानले आणि आम्हाला ते प्रतिध्वनी करायचा आहे. आम्ही आपल्यालासहयोग करण्यास आमंत्रित करतो, आणि आम्ही आपल्याला, जे रसिककृती बनवतात आणि जे सामायिक करतात, त्यांना सर्वांना मोकळी रसिक जागा प्रदान करण्यात मदत करण्यासाठी आमंत्रित करतो. जर तुम्ही US$१० किंवा त्याहून अधिक देणग्या दिले, तुम्हाला पुढील वर्षासाठी OTWचे सदस्य होण्याचा पर्याय देखील मिळतील जे आपल्याला आमच्या वार्षिक निवडणुकांच्या माध्यमातून आम्ही जे करतो त्या भविष्याचे आकार बदलण्यास मदत करते.

आमचे संकल्प आणि विजय साजरा करायचे आहेत? आमच्याकडे AO3 ची नवीनतम कृती साजरा करण्यासाठी काही नवीन धन्यवाद भेटवस्तू आहेत! त्याबद्दल आणि आमच्या इतर नवीन भेटवस्तूबद्दल, काही बातमी लवकरच येत आहेत.


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदेविषयक मदत सहित अनेक प्रकल्पांचे नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन चालवत, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दात्याने-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाइटवर. स्वयंसेवक अनुवादकांच्या टीमबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, ज्यांचेसाठी हे पोस्ट अनुवादित आहे, पहा.

Event

Comments are closed.