OTW उद्देश विधान २०२२-२०२५

आम्ही OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) आपल्याला आमचे उद्देश विधान सांगण्यास उत्साहित आहोत. पुढील कागदपत्र म्हणजे आमच्या नवीन धोरणात्मक योजनेची रचना दर्शवेल. ह्या गोष्टी घडवून आणण्या करीता येत्या साधारण १२ महिन्यांमध्ये आम्ही विशिष्ट उद्दिष्ट्ये आणि कृती योजना ठरवू. आमची अंतीम योजना परिवर्तनशील असली व आमच्या आस-पासचे बदल सामावून घेण्यास सक्षम असली तरी हे उद्देश विधान हा एक पाया असेल ज्यावर आम्ही OTW सुधारित करण्यासाठी आणि त्याला रसिकांना सेवा उपलब्ध करण्यास मदत करण्याचे कार्य करू.

मिशन विधान

OTW ही एक ना-नफा संघटना आहे जी रसिक-कार्यांचा इतिहास व रसिक-संस्कृती त्यांच्या विविध छटांमध्ये जतन करून व उपलब्ध करून रसिकांच्या आवडी जपण्यासाठी रसिकांनीच स्थापित केली. आमचे असे मत आहे की रसिक-कार्य परिवर्तनात्मक असतात आणि परिवर्तनात्मक कार्य ही कायद्याने योग्य मानलेली आहेत.

OTW हे अश्या परिवर्तनात्मक रसिक कार्यांचे प्रातिनिधित्व करतात जे ऐतिहासिकपणे मुख्यतः स्त्री-संस्कृत आहे. आमच्या मिशन कडे वाटचाल करताना OTW ह्या इतिहासाचे जतन करतीलच पण त्याचबरोबर रसिकगटातील नवीन व मुख्य प्रवाहात नसलेल्या सांस्कृतीक ओळखींच्या अभिव्यक्तींनाही प्रोत्साहन देऊ.

धोरणात्मक उद्देश्य

OTW करीता आजपासून तीन वर्षांनंतरचे आमचे उद्देश्य हे एक अशी संस्था होणे आहे जी स्थिर, सर्वत्र संलग्न, आणि सतत प्रगती करणारी असेल, रसिकगटांमधील भुमिकेसंदर्भात सक्रिय असेल, व जी रसिकाची सेवा चालु ठेवेल.

ह्या धोरणात्मक योजनेचा वापर करून OTW महत्त्वपूर्ण आंतर्गत सुधारणा करतील जे सद्या स्वंयसेवक टिकवून ठेवण्यास, नवीन आकर्षित करण्यास, आणि जगभरातील वैविध्यपूर्ण रसिकांच्या सेवेसाठी OTW ची क्षमता व पारदर्शकता प्रोत्साहित करण्यास मदत करतील.

प्राधान्य व आव्हाने

OTW मधील अंतर्गत चर्चेनंतर पुढील तीन वर्षांसाठी सहा मुख्य प्राधान्य आणि पाच प्रमुख आव्हाने निश्चित झाली आहेत.

प्राधान्य:

  • AO3 प्रगती
  • अंतर्गत टिकाव
  • शासन प्रगती
  • पगारदार कर्मचारी
  • बाह्य संपर्क
  • निधी उभारणी चे विविधीकरण

आव्हाने:

  • गटबाजी
  • धारणा आणि भरती
  • जागांचे विविधीकरण
  • कायदेशीर आव्हाने
  • सार्वजनिक बोध

ही प्राधान्य व आव्हाने पुढे विस्तारात मांडली आहेत, व यांचा वापर आमची धोरणात्मक योजना आकारण्याची होईल.

प्राधान्य:

OTW मधील अंतर्गत चर्चेनंतर पुढील तीन वर्षांसाठी सहा मुख्य प्राधान्य निश्चित झाली आहेत.

AO3 Development
आम्ही Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) च्या पायभूत घटकांची सुधारणा चालू ठेऊ. यामध्ये अश्या यंत्रणेचा समावेश असेल जी छळणूतिचा प्रतिबंध करेल व लढा देईल, वापरकर्त्यांना स्व-व्यवस्थापित अनुभव निर्माण करण्यास मदत करेल, इंटरफेस इंग्रजी-एतर वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देईल, आणि आमचा बहू-माध्यम आधाराचा विस्तार करेल. हि नवीन वैशिष्ट्ये AO3 च्या प्रगती-प्रवास योजनेशी एकजूट आहेत, आणि सध्याच्या कोडींग प्राधान्यांच्या आणि चालु देखभालीच्या मध्ये येणार नाही.

अंतर्गत टिकाव
आमच्या अंतर्गत समित्यांचा टिकाव सुधारण्यासाठी उत्तराधिकार नियोजन, वैविध्यपूर्ण भरती, प्रतिनिधीकरण, धारणा, दस्तऐवजीकरण, वाद-विवादांचे व्यवस्थापन, आणि अंतर्गत संपर्क यासर्वावर OTW लक्ष देईल.

शासन प्रगती
२०१७-२०२० मधल्या धोरणात्मक योजनांदरम्यान विकसित नेतृत्व नमुन्यांचे पुनःविचार करणारे प्रस्ताव आम्ही सुधारित करणे आणि पुढे नेण्याचे काम आम्ही चालू ठेऊ.

पगारदार कर्मचारी
आमच्या रचनेमध्ये मर्यादित पगारदार कर्मचारी अंतंर्भूत करण्याचे अन्वेषण आम्ही करीत आहोत जे स्वयंसेवकांची भूमिका घेणार नाहीत, पण त्याऐवजी गरजेच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देतील ज्यामुळे आमचे कार्य मुख्यत्वे स्वयंसेवी संस्थेमध्ये टिकून राहील. बोर्डाकडून एक पगारदार अधिकारी नियुक्त केला जाईल जो इतर पगारदार कर्मचाऱ्यांना अंतर्भूत करून घेण्यासाठी पुढील पावले उचलेल.

बाह्य संपर्क
आमच्या मिशन बद्दलची जागरूकता वाढवण्यासाठी, आमच्या सार्वजनिक निरोपांची पोच व सुसंगतेचा जम बसवण्यासाठी आणि OTW संबंधित आमच्या सदस्य आणि इतरांशी पारदर्शकता वाढवून सार्वजनिक संबंध सुधारण्यासाठी आम्ही आमचे बाह्य संपर्क नमुने सुधारित करू.

निधी उभारणीचे विविधीकरण
OTW ची आर्थिक स्थिरता सुधारण्यासाठी आम्ही अतिरिक्त न-व्यावसायिक/न-जाहिरात निधी उभारणी पद्धती आणि कमी धोक्याच्या गुंतवणूक संधींचा वापर करू. एका ना-नफा संस्थेच्या दृष्टीने आमच्या आर्थिक पद्धती योग्य असतील याची आम्ही खात्री करून कार्य चालू ठेऊ.

आव्हाने

आमच्या अधिकाऱ्यांनी व स्वयंसेवकांनी उद्देश्य प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेमधून जाऊन OTW सध्यस्थितीत किंवा पुढील तीन वर्षांमध्ये सामोरे जात असलेली आव्हाने स्पष्ट केली आहेत. आम्ही भविष्यात या आव्हानांना सामोरे जाण्यास आणि आमच्या भागधारकांबरोबर ती पारदर्शकपणे मांडण्यास वचनबद्ध आहोत.

गटबाजी
OTW ची रचना झुकणारी आहे, संस्थेच्या इतर विभागांना त्यांच्या सहज संबंधित कार्याबद्दल नियमित सूचित आणि व्यस्त ठेवले जात नाही.

ह्याचा परिणाम संपूर्ण-संस्था केंद्रित प्रकल्पांवर आणि पुढाकारा, अंतर्गत संपर्क, पारदर्शकता, स्वयंसेवक धारणा, आणि समिती टिकवावर होतो–एकत्र काम करणे अवघड होऊन जाते जेव्हा तसे करण्याची यंत्रणा अस्तित्वातच नसेल. जेव्हा आम्ही संसाधने व आधार संस्थेच्या विविध भागांमध्ये वाटू शकत नाही, तेव्हा नेतृत्व फेरबदल, प्रतिगामी कार्यभार इत्यादी आपत्कालीन काळामध्ये प्रत्येक समिती स्वतःचे व्यवस्थापन करण्यास सोडून दिली जाते.

  • स्थिरता आणि टिकाव कडे आगेकूच करण्याकरिता, आम्ही आमचे अंतर्गत संपर्क आणि संस्थेदरम्यान सुसंगत सुधारित करू.
  • भविष्यातील शासन व कर्मचारी रचना नमुने गटबाजीवर विचार व कार्य करतील..

धारणा आणि भरती
OTW च्या बऱ्याच समित्यांमध्ये उच्च स्तराची उलाढाल होत असते, आणि ते भरती, प्रशिक्षण, आणि नवीन सदस्यांचे गमन या दूष्ट-चक्रात अडकून राहतात, ज्याचा परिणाम असा की पुनःपुन्हा भरती च्या मागे त्यांना राहावे लागते. ह्याच्याशी संबंधित एक समस्या म्हणजे भरती मोहीम जी हवे तसे परिणाम देत नाही, किंवा समितीस अपेक्षित दर्जाचे कोणीच नवे सदस्य मिळत नाहीत.

ह्याचा प्रभाव दीर्घकालीन स्वयंसेवक आणि ज्ञान-धारकांच्या (“अत्यंत महत्त्वाचे स्वयंसेवक”) कार्यक्षमता व कार्यभारावर होतो कारण त्यांचा कार्यभार वाहून नेण्यास नवीन सदस्य क्वचितच मदत करतात. ह्यामुळे समितीच्या एकूण क्षमतेवर परिणाम होतो कारण इतर काम सोडून त्यांना भरती आणि प्रशिक्षणावर वेळ द्यावा लागतो.

  • टिकावाच्या प्रगतीसाठी, आम्ही चांगल्या दर्जाच्या सदस्यांची क्षमता वाढवू, ज्यामुळे समितीच्या गरजा पूर्ण होतील, नवीन सदस्यांचा धरणा वाढेल, आणि पूर्वी अत्यंत महत्वाची जागा असलेल्या सदस्यांच्या जागी नवीन सदस्य भरण्याची आमची क्षमता वाढेल.
  • जर पगारी कर्मचाऱ्यांची जागा निर्माण केली तर ते महत्त्वाच्या समस्यांच्या कार्यभारात मदत करतील.

जागांचे विविधीकरण
OTW वर योग्य टीका झाली आहे की त्यांना अश्या जागा निर्माण करण्यात अपयश आले आहे जिथे सर्व प्रकारच्या गटांना, मुख्यत्वे ब्लॅक व कलर्ड रसिकांना स्वागतार्ह वाटेल. ह्या निष्क्रियतेमुळे विविधतेला प्राधान्य देणारी साधने, ध्येय, आणि घोरणे OTW च्या सर्व विभागांमध्ये अंगभूत नाहीत व त्यामुळे खुपश्या रसिकांना आणि स्वयंसेवकांना AO3 आणि OTW वर अवांछित असल्यासारखे वाटते.

आम्ही OTW दरम्यान विविघता आणि समावेश वाढविण्यासाठीच्या पद्धतींची अंमलबजावणी करू, ज्यामुळे स्वयंसेवकांचे OTW मध्ये सक्रियपणे स्वागत करण्याच्या प्रणालीची घोरणे आत्मसात होतील, आणि कुठल्याही प्रकारचा भेदभाव झाल्यास आम्ही पूर्णपणे सक्षम असू.

आम्ही नवीन संसाधने विकसित करू जी OTW च्या कमतरता नमुद व मुल्यमापित करतील, आणि अश्या नवीन यंत्रणा विकसित करू ज्या सक्रियपणे आमच्याकडून दुर्लक्षित झालेल्या समस्या शोधतील. ह्या प्रयत्नांसाठी अमेरिकन नसलेल्या, व पश्चिमात्य पार्श्वभूमी नसलेल्या तसेच अमेरिकेत आणि इतर पाश्चिमात्य देशांमध्ये वांशिक अल्पसंख्यांक असलेल्या सर्व स्वयंसेवकांचा सर्व स्तरांवर समावेश व मार्गदर्शन असेल. विविधता आणि समावेशकता संबोधित करणाऱ्या योजनेचे मार्ग पुढील प्रमाणेः

  • OTW व त्यांच्या प्रकल्पांमधील असमानता आणि वांशिक पक्षपातांच्या समस्येकरीता एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेबरोबर करार करणे. संचालक मंडळातर्फे एक समर्पित विविधता सल्लागार संशोधक अधिकारी नियुक्त केला जाईल ह्याकरीता विविध पर्यायांचे संशोधन करेल.
  • स्वयंसेवक संसाधन गट चालु करून OTW ची सद्य संसाधने वापरून विविधतेला संबोधित करणे. स्वयंसेवक संसाधन गटांची अंमलबजावणी आमच्या सद्य कार्यप्रवाहात एकात्मिक केली जाईल, उदाहरणार्थ, विविध विभागातल्या स्वयंसेवकांचे संवाद चॅनल निर्माण करणे, जे OTW व प्रकल्पांमधील त्यांच्या अनुभवांवर प्रभाव घालणाऱ्या OTW धोरणांविषयी सूचना, सल्ला, मत, किंवा माहिती देतील.
  • विविध भुमिकांच्या जवाबदारीसाठी उमेदवारांच्या विविधीकरणाच्या दृष्टीने आमच्या भरती संसाधनांचा विस्तार करणे, जसेकी OTW शी संबंधित नसलेल्या नसलेल्या वेबसाईटस वर OTW स्वयंसेवन संधींची जाहीरात करणे.
  • प्रत्येक वापरकर्त्याला नावडीच्या गोष्टी अवरोधित करणे, कायमचे फिल्टरिंग, आणि इतर सानुकुलित वैशिष्ट्ये प्रदान करून त्यांना त्यांच्या अनुभवावर अधिक नियंत्रण देऊ व सतत अश्या वैशिष्टयांचा विकास करून एक अधिक स्वागतार्ह वातावरण निर्माण करू. ही वैशिष्ट्ये वापरकर्त्यांचे AO3 वरचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपतीलच पण त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीचा मजकुराबरोबर आणि इतर वापरकर्त्याबरोबरच्या परस्परसंवादाचे स्वयं-व्यवस्थापन उपलब्ध करून देतील.

कायदेशीर आव्हाने
OTW ने परिवर्तनात्मक कार्यांच्या क्षेत्रातील अनेक कायदेशीर आव्हाने अनुभवली आणि झेलली आहेत, मग ती नवीन कायद्यांच्या रूपात असो जे पायाखालची जमीन सरकवू बघत असतील वा सद्य कायद्यांच्या आधारावर केलेले आघात असोत. भविष्यात ही अशी कायदेशीर आव्हाने समोर येत राहतील असा आमचा अदमास आहे.

मुख्यत्वे आमची कायदेशीर समिती या या आव्हानांना तोंड देत असली तरी त्यांचा अख्ख्या समितीवर प्रभाव होतो कारण आमच्या प्रकल्पांच्या नियम आणि अटींमध्ये आम्हाला बदल करावे लागतात, एक ना-नफा संस्था म्हणून आमच्या आंतर्गत पद्धतींमध्ये बदल होतात किंवा इतर वरच्या स्तराच्या आव्हानांना सामोरे जावे लागते.

  • आमची टिकावाची धोरणे आमच्या मजबूत कायदेशीर समितीच्या क्षमता टिकवून ठेवतील.
  • आमचे शासन आणि कर्मचार्यांबाबद चे भविष्यातले नमुने खात्रीशीरपणे आमची संस्था चपळ व लवचिक ठेवतील आणि तीला अस्तित्वातील बदलत्या वातावरणाबरोबर जुळवून घेण्यास सक्षम करतील.

सार्वजनिक बोध
बऱ्याच रसिकगट समुदायांमध्ये AO3 नावाने ओळखले जाते, पण त्यामानाने खुद्द OTW आणि आमचा इतिहास, उद्देश आणि आमची रचना हे अप्रसिद्ध आणि कमी समजले जाणारे आहेत. आमच्या मुख्य निर्वाचनक्षेत्रासंबंधीच्या चुकीच्या माहितीमुळे आम्हाला सार्वजनिक संबंधांतील विविध आव्हानांना सामना द्यावा लागतो.

OTW नक्की काय आहे व करतात याविषयी सदस्य व सदस्येतरांशी रारदर्शकता वाढवून आम्ही सार्वजनिक संबंध अधिक चांगले करण्यासाठी कार्य करू. आमच्या मुख्य निर्वाचनक्षेत्रादरम्यान आमचा निरोप व मिशन पोहोचवण्यावर याचा चांगला प्रभाव पडेल, OTW च्या भुमिकेबद्दल लोकांच्या मनात स्पष्टता नसल्याने विधीसंकलनादरम्यान सामोरे जाव्या लागणाऱ्या अडचणी कमी होतील. आमचा सार्वजनिक बोध सुव्यवस्थित आणि विस्तारत करण्यासाठी आम्ही काही नारिंगांचा विचार करीत आहोत त पुढील प्रमाणेः

  • OTW ची ध्येय आणि मिशन निर्वाचित लोकांपर्यंत—रसिक-कार्य निर्माते, वाचक, देणगीदार, विद्वान, आणि सामान्य लोक— नवीन स्वरूपात पोहोचवणे. उदाहरणार्थ, माहितीचित्र वापरून OTW चा इतिहास, उद्देश, रचना आणि इतर संबंधित मजकूर मांडणे.
  • त्यांचे कार्य व ते अख्ख्या OTW मध्ये कसे बसते ते स्पष्ट करणारा लोकांना उद्देशून केलेल्या चित्रफिती बनविण्यासाठी विविध समित्यांना प्रोत्साहित करणे. ह्यामध्ये शिकवण्या, स्पष्टीकरणे, लघु बातम्या, आणि तत्सम मजकूर समाविष्ट असेल जो काही वाचकांसाठी आमच्या पारंपारिक लिखित संपर्क स्वरूपाऐवजी जास्त उपलब्ध असेल.
  • आमची संपर्क धोरणे पुनर्रचित करणे ज्यामुळे आमची पारदर्शकता व OTW ची दृष्यता सुधारेल आणि आमचे मिशन व बोध आम्ही प्रभावीपणे मांडत आहोत याची खात्री होईल.

OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.

Announcement

Comments are closed.