OTW अर्थसमिती: २०२३ अर्थसंकल्प

गेल्या वर्षाच्या दरम्यान, OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) अर्थ समितीने दृष्टीआड काम करून, मंडळाची बिल भरणे, कर भरणे, मानक अर्थलेखा प्रक्रिया पूर्ण करणे या सगळ्याची खबरदारी घेतली. OTW ची आर्थिक क्रियाकलाप अधिक चांगल्या प्रकारे परावर्तित करण्यासाठी संघाने खात्यांच्या लेखांकन चार्टमध्येही सुधारणा केली. सध्या, २०२२ च्या आर्थिक विधानांची तयारी व लेखापरीक्षा चालू आहे!

दरम्यान ही टीम २०२३ च्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा परिश्रमपूर्वक कार्यरत होती, व आम्ही अभिमानाने तुमच्या समोर या वर्षाचा अर्थसंकल्प मांडू इच्छितो(अजून तपशीलवार माहिती साठी २०२३ आर्थिक स्प्रेडशीट प्रवेश):

२०२३ खर्च

कार्यक्रमाप्रमाणे खर्च: AO3 (आमचा स्वत:चा संग्रह): ५९.४%. रसिक-मुक्तद्वार प्रकल्प: १.१%. परिवर्तनात्मक कलाकृती व संस्कृती: ०.७%. फॅनलोर: ३.३%. कायदेशीर मदत: १.१%. घोकणे पोहोच: 0.४%. प्रशासन: १८.०%. निधी उभारणे आणि विकास: १६.०%.

Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह)

US$९९,८५४.४८ खर्च; US$१,९५,४३१.२८ राहिले

  • एकूण US$२,९५,२८५.७६ पैकी या वर्षी फेब्रुवारी २८, २०२३ पर्यंत, US$९९,८५४.४८ खर्च केले गेले आहेत.
  • OTW च्या सर्व खर्चापैकी, ५९.४% AO3 च्या देखभाली मध्ये जातात. मुख्य-संगणक खर्चाच्या मोठ्या वाट्याचा यामध्ये समावेश आहे—नवीन खरेदी आणि चालू मुख्य-संगणक केंद्र व देखभाल हे दोन्ही—वेबसाईट कामगिरी देखरेखीची साधने, आणि तांत्रिक व्यवस्था समिती संदर्भातील कामगिरी परवाने, तसेच खाली ठळक केलेले खर्च(सर्व कार्यक्रमांचा खर्च प्रवेश).
  • या वर्षीच्या अंदाजित AO3 खर्चामध्ये नवीन मुख्य संगणक खरेदी करण्यासाठी US$७४,०००.००, तसेच मुख्य संगणकशी संबंधित उपकरणांमध्ये US$७७,०००.०० चा समावेश आहे ज्यामुळे वर्षभरात अपेक्षित साइट रहदारी वाढ हाताळण्यासाठी विद्यमान सर्व्हरची क्षमता वाढेल.

फॅनलोर

US$६,२२२.७९ खर्च; US$९,९७९.२० राहिले

  • US$१६,२०१.९९ यांमधून, या वर्षी २८ फेब्रुवारी, २०२३ पर्यंत, US$६,२२२.७९ खर्च झाला आहे.
  • फॅनलोर खर्चाचे वाटप हे, मुख्य संगणकाचे वाटप, देखभाल व मुख्य संगणक केंद्र खर्च, तसेच नवीन दत्तक घेतलेल्या OTW-व्यापी उत्पादकता साधनांचा त्याचा भाग, असे आहे (सर्व कार्यक्रम खर्च प्रवेश).

Transformative Works and Cultures – TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती)

US$८४७.७० खर्च; US$२,६६२.०० राहिले

  • US$३,५०९.७० यांमधून, US$८४७.७० हे या वर्षी २८ फेब्रुवारी, २०२३ पर्यंत खर्च झाले आहेत.
  • TWC चा खर्च ही जर्नलची वेबसाइट होस्टिंग, प्रकाशन आणि संचयन,तसेच नवीन दत्तक घेतलेल्या OTW-व्यापी उत्पादकता साधनांचा त्याचा भाग, शुल्क आहे (सर्व कार्यक्रम खर्च प्रवेश).

Open Doors (रसिक-मुक्तद्वार प्रकल्प)

US$२,२३२.८६ खर्च; US$३,२९३.३० राहिले

  • US$५,५२६.१६ यांमधून, या वर्षी २८ फेब्रुवारी, २०२३ पर्यंत, US$२,२३२.८६ खर्च झाले आहेत.
  • रसिक-मुक्तद्वार प्रकल्पच्या खर्चामध्ये आयातित रसीकृती संग्रहासाठी होस्टिंग, बॅकअप आणि डोमेन खर्च, तसेच नवीन दत्तक घेतलेल्या OTW-व्यापी उत्पादकता साधनांचा त्याचा भाग, हे समाविष्ट आहेत (सर्व कार्यक्रम खर्च प्रवेश).

Legal Advocacy (कायदेविषयक मदत)

US$०.०० खर्च; US$५,२५८.०० राहिले

  • US$५,२५८.०० यांमधून, या वर्षी २८ फेब्रुवारी, २०२३ पर्यंत, US$०.०० खर्च झाले आहेत.
  • कायदे-विषयक मदतीच्या खर्चामध्ये,परिषद आणि सुनावणी-साठी नोंदणी फी भरणे, आणि आवश्यक असल्यास कायदेशीर दाखल करण्यासाठी निधी बाजूला ठेवणे, तसेच नवीन दत्तक घेतलेल्या OTW-व्यापी उत्पादकता साधनांचा त्याचा भाग, हे समाविष्ट आहेत (सर्व कार्यक्रम खर्च प्रवेश).

घोकणे पोहोच

US$०.०० खर्च; US$२,०००.०० राहिले

  • US$२,०००.०० यांमधून, या वर्षी २८ फेब्रुवारी, २०२३ पर्यंत, US$०.०० खर्च झाले आहेत.
  • अर्थसंकल्पीय खर्चामध्ये OTW च्या वतीने घोकणे पोहोच क्रियाकलापांसाठी US$१,०००.०० यांचा समावेश आहे, ज्यामध्ये घोकणे टेबलिंग फी, स्वयंसेवक उपस्थिती आणि संबंधित सादरीकरण साहित्य तसेच घोकणेच्या भेटवस्तूंसाठी US$१,०००.०० यांचा समावेश आहे.(सर्व कार्यक्रम खर्च प्रवेश).

निधी उभारणी आणि विकास

US$९,२३५.९१  खर्च; US$७०,३८९.२० राहिले

  • US$७९,६२५.११ यांमधून, या वर्षी २८ फेब्रुवारी, २०२३ पर्यंत, US$९,२३५.९१ खर्च झाले आहेत.
  • आमच्या निधी उभारणी आणि विकासच्या खर्चांमध्ये, देणग्या आकारण्या करिता, तृतीय-पक्ष देयक प्रोसेसरद्वारे आकारले जाणारे व्यवहार शुल्क समाविष्ट आहेत; आभारदर्शक भेटवस्तूंची खरेदी आणि शिपिंग; आणि OTWचे सदस्यत्व डेटाबेस होस्ट करण्यासाठी आणि देणगीदार आणि संभाव्य देणगीदारांसह ट्रॅक संप्रेषणासाठी वापरली जाणारी साधने, तसेच नवीन दत्तक घेतलेल्या OTW-व्यापी उत्पादकता साधनांचा त्याचा भाग (निधी उभारणी खर्च प्रवेश).

प्रशासन

US$२१,०९३.२२ खर्च; US$६८,०७९.७४ राहिले

  • US$८९,१७२.९६ यांमधून, या वर्षी २८ फेब्रुवारी, २०२३ पर्यंत, US$२१,०९३.२२ खर्च झाले आहेत.
  • OTW च्या प्रशासकीय खर्चामध्ये आपल्या वेबसाइटसाठी होस्टिंग, ट्रेडमार्क, डोमेन, विमा, कर फाईलिंग, वार्षिक आर्थिक स्टेटमेंट लेखापरीक्षण आणि, संप्रेषण, व्यवस्थापन आणि लेखांकन साधने समाविष्ट आहेत(सर्व प्रशासक खर्च प्रवेश).

२०२३ महसूल

OTW महसूल: एप्रिल ड्राइवच्या देणग्या: १३.५%. ऑक्टोबर ड्राइवच्या देणग्या: १३.५%. गैर-ड्राइवच्या देणग्या: ५४.१%. जुळणारे कार्यक्रमांमधून देणगी: १८.९%. व्याज उत्पन्न: <०.१%. रॉयल्टी: <०.१%. इतर उत्पन्न: <०.१%

  • OTW संपूर्णपणे या द्वारा समर्थित आहेतुमची देणगी—आपल्या औदार्याबद्दल धन्यवाद!
  • आम्हाला दरवर्षी आमच्या बहुतेक देणग्या एप्रिल आणि ऑक्टोबरमधल्या निधी उभारणी दरम्यान मिळतात ज्या एकत्रितपणे २०२३ मध्ये आमच्या उत्पन्नाच्या सुमारे २७% आहेत. आम्हाला देणग्या ह्या नियोक्ता जुळवणे प्रकल्पातून ही मिळतात, रॉयल्टी, आणि PayPal Giving Fund यांद्वारे देणग्या प्राप्त करतो, जे Humble Bundle आणि eBay for Charity सारख्या कार्यक्रमांमधून देणगी मिळते. जर आपण अशा वेबसाइट्सवर खरेदी करतांना आमची मदत करण्यास इच्छुक असाल, तर कृपया आपल्या पसंतीचा धर्मादाय म्हणून “Organization for Transformative Works” ची निवड करा!
  • मागील वर्षात आपल्या उदारतेमुळे, आमच्याकडे भरपूर रक्कमेची साठवण आहे, जी आम्ही नेहमीपेक्षा मोठ्या खरेदी साठी आणि कायदेशीर आकस्मिकतेसाठी हाती ठेवू शकतो. पूर्वी उल्लेख केल्या प्रमाणे, AO3 च्या मुख्य संगणकांची क्षमता वाढवण्याची योजना आहे, ज्याच्यामुळे मुख्य संगणकात वापरल्या जाणाऱ्या उपकरण्यांचा आणि मुख्य संगणक ला होस्ट करण्याचा खर्च दोन्ही बऱ्यापैकी वाढतील. AO3 आणि OTW च्या इतर प्रकल्पांच्या वाढी मुळे, स्वयंसेवक आणि प्रशासकीय समर्थनाची गरज पडते, ज्यामुळे खर्च वाढतो. बजेट स्प्रेडशीट च्या अंदाजे साठयामधून US$१,३०,०००.०० काढले जाऊ शकतात, या वर्षीच्या महसुली पेक्षा जास्त खर्च कवर करण्यासाठी. ही रक्कम वर्षातून केव्हाही काढली जाऊ शकते.
  • आत्तापर्यंत (२८ फेब्रुवारी, २०२३ पर्यंत) US$६९,४७७.१२ मिळाले आहेत आणि US$३,७०,३२०.०० वर्षाच्या अखेरपर्यंत प्राप्त होण्याचा अंदाज आहे.

US$६९,४७७.१२ दान; US$३,००,८४२.८८ राहिले

काही प्रश्न आहेत का?

जर आपल्याकडे अर्थसंकल्प किंवा OTWच्या आर्थिक बाबींविषयी काही प्रश्न असतील तर कृपया अर्थसमितीशी संपर्क साधा. आम्ही शक्य तितक्या लवकर आपल्याला उत्तर देऊ!

२०२३ स्प्रेडशीट स्वरूपात OTW चे बजेट डाउनलोड करण्यासाठी, कृपया या दुव्याचे अनुसरण करा.


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक रसिक-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दात्यांनी-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईट. आमच्या स्वयंसेवक अनुवादकांच्या टीमबद्दल व ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, हे पहा भाषांतर पृष्ठ.

Report

Comments are closed.