
संपूर्ण २०१९ दरम्यान, OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) अर्थ समितीने दृष्टीआड काम करून, मंडळाची बिले भरणा, कर भरणा, मानक अर्थलेखा प्रक्रिया पूर्ण करणे यासर्वाची खबरदारी घेतली. सध्या, २०१९ च्या आर्थिक विधानांची तयारी व ऑडिट चालू आहे!
दरम्यान ही टीम २०२० च्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा परिश्रमपूर्वक कार्यरत होती, व आम्ही अभिमानाने तुमच्या समोर या वर्षाचा अर्थसंकल्प मांडू इच्छितो (अजून तपशीलवार माहिती साठी २०२० आर्थिक स्प्रेडशीट प्रवेश):
२०२० खर्च
Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह)
- एकूण US$५०३,४१४.१५ पैकी या वर्षी फेब्रुवारी २९, २०२० पर्यंत, US$११,३२६.९१ खर्च केले गेले आहेत.
- OTW च्या सर्व खर्चापैकी, ७९.७% AO3 च्या देखभाली मध्ये जातो. मुख्य-संगणक खर्चाच्या मोठ्या वाट्याचा यामध्ये समावेश आहे—नवीन खरेदी आणि चालू मुख्य-संगणक केंद्र व देखभाल हे दोन्ही—वेबसाईट कामगिरी देखरेखीची साधने, आणि तांत्रिक व्यवस्था समिती संदर्भातील कामगिरी परवाने, तसेच खाली ठळक केलेले खर्च (सर्व कार्यक्रमांचा खर्च प्रवेश).
- AO3 च्या यावर्षीच्या प्रक्षेपित खर्चामध्ये US$१००,००० हा AO3 संकलन शोधाचे स्थलांतर Elasticsearch ला व Rails6 ला श्रेणी-सुधार करण्याचा कंत्राटदार खर्चाचा समावेश आहे.
- याव्यतिरिक्त, AO3 च्या खर्चामध्ये साधारण: US$२५५,००० चा समावेश महत्त्वाचे मुख्य-संगणक श्रेणी-सुधार व विस्तार यांचेसाठी आहे. नवीन डेटाबेस मुख्य-संगणक, AO3 ला पृष्ठ सेवा व वापरकत्यांना कमीत-कमी संचार तृटींशिवाय शोध परिणाम मिळवून देण्याची विस्तार क्षमता देतील. नवीन मुख्य-संगणकांसाठी जुन्या मुख्य-संगणकांचा संग्रह म्हणून पुनर्संचय केला जाईल. विविध परिस्थितींवर अवलंबून अशी शक्यता आहे की हे कार्य पुढच्या वर्षीसाठी विस्थगीत करण्यात येईल; या बद्दल अधिक माहिती वर्षातील अद्यतनीत अर्थसंकल्पामध्ये देण्यात येईल.
- अर्थसंकल्पामधील इतर खर्चामध्ये तांत्रिक व्यवस्था कंत्राटदाराचे US$33,000.00 समाविष्ट आहेत, जो AO3 व OTW च्या इतर प्रकल्पांवर काम करेल.
फॅनलोर
- US$७०१८.२८ यांमधून, या वर्षी २९ फेब्रुवारी, २०२० पर्यंत, US$५३३.८३ खर्च झाला आहे.
- फॅनलोर खर्चाचे वाटप हे, संबंधित परवाने आणि फॅनलोर वेब डोमेन नूतनीकरण या व्यतिरिक्त मुख्यतः मुख्य-संगणक खरेदी, देखभाल व मुख्य संगणक केंद्र खर्च, असे आहे. ( सर्व कार्यक्रम खर्च प्रवेश).
Transformative Works and Cultures – TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती)
- US$१८३१.०० यांमधून, US$३३१.०० हे या वर्षी २९ फेब्रुवारी, २०२० पर्यंत खर्च झाले आहेत.
- TWC चा खर्च ही जर्नलची वेबसाइट होस्टिंग आणि, प्रकाशन आणि संचयन शुल्क आहे (सर्व कार्यक्रम खर्च प्रवेश).
Open Doors (रसिक-मुक्तद्वार प्रकल्प)
- US$८७१.८३ यांमधून, या वर्षी २९ फेब्रुवारी, २०२० पर्यंत, US$१३९.६६ खर्च झाले आहेत.
- रसिक-मुक्तद्वार प्रकल्प-च्या खर्चामध्ये आयातित रसीकृती आर्काइव्हसाठी होस्टिंग, बॅकअप आणि डोमेन खर्च हे समाविष्ट आहेत (सर्व कार्यक्रम खर्च प्रवेश).
Legal Advocacy (कायदेविषयक मदत)
- US$५०००.०० यांमधून, या वर्षी २९ फेब्रुवारी, २०२० पर्यंत, US$०.०० खर्च झाले आहेत.
- कायदे-विषयक मदतीच्या खर्चामध्ये, सुनावणी-साठी फी भरणे आणि परिषद प्रवास खर्च हे समाविष्ट आहेत (सर्व कार्यक्रम खर्च प्रवेश).
घोकणे पोहोच
निधी उभारणी
- US$५९,१८७.१८ यांमधून, या वर्षी २९ फेब्रुवारी, २०२० पर्यंत, US$२८९१.२८ खर्च झाले आहेत.
- आमच्या निधी उभारणीच्या खर्चांमध्ये, देणग्या आकारण्या करिता, तृतीय-पक्ष देयक प्रोसेसरद्वारे आकारले जाणारे व्यवहार शुल्क समाविष्ट आहेत; आभारदर्शक भेटवस्तूंची खरेदी आणि शिपिंग; आणि OTWचे सदस्यत्व डेटाबेस होस्ट करण्यासाठी आणि देणगीदार आणि संभाव्य देणगीदारांसह ट्रॅक संप्रेषणासाठी वापरली जाणारी साधने (निधी उभारणी खर्च प्रवेश).
प्रशासन
- US$५३,६५७.२५ यांमधून, या वर्षी २९ फेब्रुवारी, २०२० पर्यंत, US$६७७७.८७ खर्च झाले आहेत.
- OTWच्या प्रशासकीय खर्चामध्ये आपल्या वेबसाइटसाठी होस्टिंग, ट्रेडमार्क, डोमेन, विमा, कर फाईलिंग, वार्षिक आर्थिक स्टेटमेंट ऑडिट आणि, संप्रेषण आणि लेखांकन साधने समाविष्ट आहेत (सर्व प्रशासक खर्च प्रवेश).
२०२० महसूल
- OTW संपूर्णपणे या द्वारा समर्थित आहे तुमची देणगी—आपल्या औदार्याबद्दल धन्यवाद!
- आम्हाला दरवर्षी आमच्या बहुतेक देणग्या एप्रिल आणि ऑक्टोबरमधल्या निधी उभारणी दरम्यान मिळतात ज्या एकत्रितपणे २०२० मध्ये आमच्या उत्पन्नाच्या सुमारे ५८% आहेत. आम्हाला देणग्या ह्या नियोक्ता जुळवणे प्रकल्पातून ही मिळतात, रॉयल्टी, Amazon Smile, आणि PayPal Giving Fund यांद्वारे देणग्या प्राप्त करतो, जे Humble Bundle सारख्या कार्यक्रमांमधून देणगी मिळते. जर आपण अशा वेबसाइट्सवर खरेदी करतांना आमची मदत करण्यास इच्छुक असाल, तर कृपया आपल्या पसंतीचा धर्मादाय म्हणून “Organization for Transformative Works” ची निवड करा!
- मागील वर्षात आपल्या उदारतेमुळे, आमच्याकडे भरपूर रक्कमेची साठवण आहे, जी आम्ही कोणत्याही आणीबाणीसाठी जतन करून ठेवण्याची योजना करतो. या मुळे, आपल्या देणग्यांना पुरवणी म्हणून आम्ही पर्यायी महसूल स्रोत शोधू शकतो. आमच्या अर्थसमितीने OTWसारख्या लहान न-नफा संस्थेसाठी योग्य गुंतवणूकीची पद्धत शोधून काढली आहे आणि २०२० च्या अखेरीस कमी-जोखीम, रूपात्मक गुंतवणूकीचा पोर्टफोलिओ पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
- आम्ही जेव्हा नेहमीच्या खरेदीपेक्षा मोठ्या योजनेचे नियोजन करीत असतो तेव्हा बऱ्याच वर्षांपासून जतन केलेला साठा आम्हाला मदत करतो. पूर्वी नमूद केल्यानुसार, यावर्षी, AO3 च्या मुख्य-संगणकाच्या श्रेणी-सुधाराची आमची योजना आहे व त्यामुळे आमच्या खर्चामध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. या अंदाजपत्रकात नमूद केलेल्या अंदाजपत्रकातील काही खर्च विविध कारणांमुळे वर्ष संपण्यापूर्वी लागू होणार नाहीत. या अनिश्चिततेसाठी, जरीही आम्ही अपेक्षा करतो की सर्व खर्च अर्थसंकल्प स्प्रेडशीटमध्ये वर्णन केलेला असेल, आम्ही आमच्या साठ्यामधून खर्चाच्या रकमेची पूर्तता करण्यासाठी US$१११,०००.०० काढण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. वर्षादरम्यान ही अतिरिक्त रक्कम आवश्यकतेनुसार काढली जाऊ शकते. आमचा अद्यतनीत अर्थसंकल्प, जो ऑक्टोबरमध्ये प्रकाशित केला जाईल, त्यामध्ये २०२० मध्ये कोणते खर्च होतील याची अधिक अचूक माहिती असेल.
- आत्तापर्यंत (२९ फेब्रुवारी, २०२० पर्यंत) US$४९,०७९.७१ मिळाले आहेत आणि US$५२०,९००.०० वर्षाच्या अखेरपर्यंत प्राप्त होण्याचा अंदाज आहे.
काही प्रश्न आहेत का?
जर आपल्याकडे अर्थसंकल्प किंवा OTWच्या आर्थिक बाबींविषयी काही प्रश्न असतील तर कृपया अर्थसमितीशी संपर्क साधा. आम्ही आपल्याकडे असलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी खुल्या गप्पा आयोजित करणार आहोत. ही चर्चा, संपूर्ण इंग्रजीतच होईल. या बातमीच्या पोस्टच्या इंग्रजी आवृत्तीमध्ये चर्चेमध्ये कसे सामील व्हावे याबद्दल अधिक माहिती आहे.
2020 स्प्रेडशीट स्वरूपात OTW चे बजेट डाउनलोड करण्यासाठी, कृपया या दुव्याचे अनुसरण करा.
OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक रसिक-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दात्यांनी-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईट. आमच्या स्वयंसेवक अनुवादकांच्या टीमबद्दल व ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, हे पहा भाषांतर पृष्ठ.