OTW अर्थसमिती: २०२० अर्थसंकल्प अद्यतन

२०२० दरम्यान, OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) अर्थसमिती ने अचूकता आणि पूर्णतेसाठी संस्थेच्या आर्थिक व्यवहाराचा आढावा घेणे सुरू ठेवले आहे. अतिरिक्त कामांमध्ये बिले भरणे, २०१९ च्या वित्तियांचे ऑडिट पूर्ण करणे आणि लेखाची प्रक्रिया प्रमाणिकरित्या पूर्ण केली असल्याचे सुनिश्चित करणे समाविष्ट आहे.

दरम्यान, ही टीम २०२० च्या अर्थसंकल्पावरील अद्यतनावर परिश्रमपूर्वक काम करीत आहे, आणि येथे सादर करण्यात अभिमान आहे! (अजून तपशीलवार माहिती साठी २०२० आर्थिक स्प्रेडशीट प्रवेश):

२०२० खर्च

कार्यक्रमाप्रमाणे खर्च: AO3(आमचा स्वत:चा संग्रह): ६८.२%.रसिक-मुक्तद्वार प्रकल्प: ०.२%.परिवर्तनात्मक कलाकृती व संस्कृती: ०.३%. फॅनलोर: २.४%. कायदेशीर मदत: ०.४%. घोकणे पोहोच: ०.१%. प्रशासन: ९.३%. निधी उभारणे: १९.१%.

Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह)

US$७६,७०३.४६ खर्च; US$३०६,६२३.५५ राहिले

  • एकूण US$३८३,३२७.०० पैकी या वर्षी ३१ जुलै, २०२० पर्यंत, US$१७६,७०३.४६ खर्च केले गेले आहेत.
  • OTW च्या सर्व खर्चापैकी, ६८.२% AO3 च्या देखभाली मध्ये जातो. मुख्य-संगणक खर्चाच्या मोठ्या वाट्याचा यामध्ये समावेश आहे—नवीन खरेदी आणि चालू मुख्य-संगणक केंद्र व देखभाल हे दोन्ही—वेबसाईट कामगिरी देखरेखीची साधने, आणि तांत्रिक व्यवस्था समिती संदर्भातील कामगिरी परवाने, तसेच खाली ठळक केलेले खर्च ((सर्व कार्यक्रमांचा खर्च प्रवेश).
  • यावर्षी, स्वयंसेवकांचे कार्य अधिक कार्यक्षम करण्यासाठी, पार्श्वभूमीत AO3 प्रशासकीय भूमिका विभक्त करण्यासाठी, कंत्राटदारांच्या खर्चामध्ये US$१८,००० खर्च झाले आहेत. इतर बजेट केलेल्या AO3 खर्चामध्ये, US$१००,००० हा AO3 संकलन शोधाचे स्थलांतर Elasticsearch ला व Rails 6 ला श्रेणी-सुधार करण्याचा कंत्राटदार खर्चाचा समावेश आहे.
  • याव्यतिरिक्त, AO3 खर्चामध्ये अंदाजे ऊस$१,४७,०००.०० साठी फ्रंटएंड सर्व्हर, डेटाबेस सर्व्हर आणि व्हर्च्युअल मशीन सर्व्हरची खरेदी समाविष्ट आहे. नवीन डेटाबेस सर्व्हर AO3 साठी रसिक-कृती संचयित करण्यासाठी आमच्या पायाभूत सुविधांची क्षमता आणि वापरकर्त्यांसाठी दिल्या गेलेल्या पृष्ठांची संख्या वाढवतील.जुने सर्व्हर साइट पृष्ठ व्युत्पन्न करणारे अनुप्रयोग सर्व्हर म्हणून वापरण्यासाठी बदलले जातील.
  • आमची अशी योजना आहे की वर्षाच्या शेवटी तिसरा सर्व्हर रॅक स्थापित केला जाईल,
    AO3 (आणि OTWवेबसाइट) ला अधिक शक्ती क्षमता देण्यासाठी आणि सर्व्हर अपयशाचा प्रभाव कमी करण्यासाठी. हा रॅक जोडण्यासाठी अंदाजे US$८,०००.०० ची सेटअप खर्च समाविष्ट असेल आणि आमच्या मासिक सर्व्हरच्या किंमती US$२,२००.०० ने वाढवतील.
  • अर्थसंकल्पामधील इतर खर्चामध्ये तांत्रिक व्यवस्था कंत्राटदाराचे US$33,000.00 समाविष्ट आहेत, जो AO3 व OTW च्या इतर प्रकल्पांवर काम करेल.

फॅनलोर

US$२,५२७.९७ खर्च; US$११,१३१.६० राहिले

  • US$१३,६५९.५७ यांमधून, या वर्षी ३१ जुलै, २०२० पर्यंत, US$२,५२७.९७ खर्च झाला आहे.
  • फॅनलोर खर्चाचे वाटप हे, संबंधित परवाने आणि फॅनलोर वेब डोमेन नूतनीकरण या व्यतिरिक्त मुख्यतः मुख्य-संगणक खरेदी, देखभाल व मुख्य संगणक केंद्र खर्च, असे आहे. ( सर्व कार्यक्रम खर्च प्रवेश).

Transformative Works and Cultures – TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती)

US$३३१.००खर्च; US$१५००.०० राहिले

  • US$१८३१.०० यांमधून, US$३३१.०० हे या वर्षी ३१ जुलै, २०२० पर्यंत खर्च झाले आहेत.
  • TWC चा खर्च ही जर्नलची वेबसाइट होस्टिंग आणि, प्रकाशन आणि संचयन शुल्क आहे (सर्व कार्यक्रम खर्च प्रवेश).

Open Doors (रसिक-मुक्तद्वार प्रकल्प)

US$३६४.०१ खर्च; US$५६३.७७ राहिले

  • US$९२७.७८ यांमधून, या वर्षी ३१ जुलै, २०२० पर्यंत, US$३६४.०१ खर्च झाले आहेत.
  • रसिक-मुक्तद्वार प्रकल्प-च्या खर्चामध्ये आयातित रसीकृती आर्काइव्हसाठी होस्टिंग, बॅकअप आणि डोमेन खर्च हे समाविष्ट आहेत (सर्व कार्यक्रम खर्च प्रवेश).

Legal Advocacy (कायदेविषयक मदत)

US$०.०० खर्च; US$२,५००.०० राहिले

  • US$२,५००.०० यांमधून, या वर्षी ३१ जुलै, २०२० पर्यंत, US$०.०० खर्च झाले आहेत.
  • कायदे-विषयक मदतीच्या खर्चामध्ये फाईलिंग खर्च हे समाविष्ट आहेत (सर्व कार्यक्रम खर्च प्रवेश).

घोकणे पोहोच

US$०.०० खर्च; US$५००.०० राहिले

  • US$५००.०० यांमधून, या वर्षी ३१ जुलै, २०२० पर्यंत, US$०.०० खर्च झाले आहेत.
  • अर्थसंकल्पीय खर्चात मुद्रण फ्लायर्ससाठी US$१०० आणि OTW साठी अन्य अधिवेशन पोहोच क्रियाकलापांसाठी US$४०० समाविष्ट आहेत (सर्व कार्यक्रम खर्च प्रवेश).
  • निधी उभारणी

    US$४४,७७१.९२ खर्च; US$६२,४७६.२८ राहिले

    • US$१०७,२४८.२० यांमधून, या वर्षी ३१ जुलै, २०२० पर्यंत, US$४४,७७१.९२ खर्च झाले आहेत.
    • आमच्या निधी उभारणीच्या खर्चांमध्ये, देणग्या आकारण्या करिता, तृतीय-पक्ष देयक प्रोसेसरद्वारे आकारले जाणारे व्यवहार शुल्क समाविष्ट आहेत; आभारदर्शक भेटवस्तूंची खरेदी आणि शिपिंग; आणि OTWचे सदस्यत्व डेटाबेस होस्ट करण्यासाठी आणि देणगीदार आणि संभाव्य देणगीदारांसह ट्रॅक संप्रेषणासाठी वापरली जाणारी साधने, वर्तमान आणि संभाव्य देणगीदारांसह (निधी उभारणी खर्च प्रवेश).

    प्रशासन

    US$१०,४७५.३६ खर्च; US$४१,९२८.७८ राहिले

    • US$५२,४०४.१४ यांमधून, या वर्षी ३१ जुलै, २०२० पर्यंत, US$१०,४७५.३६ खर्च झाले आहेत.
    • OTWच्या प्रशासकीय खर्चामध्ये आपल्या वेबसाइटसाठी होस्टिंग, ट्रेडमार्क, डोमेन, विमा, कर फाईलिंग, वार्षिक आर्थिक स्टेटमेंट ऑडिट आणि, संप्रेषण आणि लेखांकन साधने समाविष्ट आहेत (सर्व प्रशासक खर्च प्रवेश).

    २०२० महसूल

    OTW महसूल: एप्रिल ड्रायव्हिंग देणग्या: ६०.८%. ऑक्टोबर ड्राइव्हचे देणग्या: ९.९%. ड्राईव्ह-एतर देणगी: २४.५%. समराशी-जोड कार्यक्रमांमधून देणगी: ४.०%. व्याज उत्पन्न: ०.१%. रॉयल्टी: ०.१%. इतर उत्पन्न: <०.१%. विशिष्ट देणगी: ०.७%.

    • OTW संपूर्णपणे या द्वारा समर्थित आहे तुमची देणगी—आपल्या औदार्याबद्दल धन्यवाद!
    • आम्हाला दरवर्षी आमच्या बहुतेक देणग्या एप्रिल आणि ऑक्टोबरमधल्या निधी उभारणी दरम्यान मिळतात ज्या एकत्रितपणे २०२० मध्ये आमच्या उत्पन्नाच्या सुमारे ७१% आहेत. आम्हाला देणग्या ह्या नियोक्ता जुळवणे प्रकल्पातून ही मिळतात, रॉयल्टी, Amazon Smile, आणि PayPal Giving Fund, यांद्वारे देणग्या प्राप्त करतो, जे Humble Bundle सारख्या कार्यक्रमांमधून देणगी मिळते. जर आपण अशा वेबसाइट्सवर खरेदी करतांना आमची मदत करण्यास इच्छुक असाल, तर कृपया आपल्या पसंतीचा धर्मादाय म्हणून “Organization for Transformative Works” ची निवड करा!
    • मागील अनेक ड्राईव्हमध्ये आपला उदारपणा पाहता, कोणत्याही आणीबाणीसाठी आम्ही आमच्या राखीव जागेमध्ये अतिरिक्त US$१,५०,००० हस्तांतरित करण्याचे ठरवित आहोत. यामुळे, आम्ही आपल्या देणग्यांना पूरक करण्यासाठी वैकल्पिक महसूल स्त्रोतांचा शोध घेत आहोत. आम्ही OTWसारख्या छोट्या न-नफा-न-तोटा संस्थेसाठी योग्य गुंतवणूक पद्धत आणि गुंतवणूक तज्ञासाठी शोधात प्रगती केली आहे; २०२१ अखेर कमी जोखमीचा, पुराणमतवादी गुंतवणूकीचा पोर्टफोलिओ सेट अप करण्याचे आमचे लक्ष्य आहे.
    • विशेषतः एप्रिल २०२० च्या ड्राइव्ह दरम्यान आपल्या औदार्यामुळे, ओटीडब्ल्यूने मोठ्या प्रमाणात प्रकल्पांच्या वित्तीय व्यवहार्यतेसाठी नियोजन सुरू करण्याची क्षमता दिली आहे. एकदा आम्ही कायदेशीर आणि व्यावहारिक रसद शोधून काढली की आम्ही आपल्याबरोबर हे सामायिक करण्यास उत्सुक आहोत!
    • आम्हाला आमची पहिलीविशिष्ट देणगी मिळाली. HP Education Fanon, Inc. कडून US$ ५,१६१.६२, एक समान्य 501(c)(3) न-नफा संस्था वाचनाच्या फायद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध, जे
      दुर्दैवाने २०१८ मध्ये ऑपरेशन थांबवले. ही देणगी सध्या तयार होणाऱ्या मिशिगन प्रेस युनिव्हर्सिटीच्या रसिक-चित्रफीतच्या इतिहासावरील फ्रान्सिस्का कोप्पांच्या पुस्तकाला पाठिंबा देण्याकडे जाईल. या पैशाचा उपयोग मिशिगन युनिव्हर्सिटीला पुस्तकात संदर्भित रसिकचित्रफीत होस्ट करण्यासाठी, आणि प्रत्येकजणाला वाचण्यासाठी आणि वापरण्यासाठी विनामूल्य करण्यास मदत करण्यासाठी केला जाईल.
    • आत्तापर्यंत (३१ जुलै, २०२० पर्यंत) US$६६५,९७५.०९ मिळाले आहेत आणि US$७,५४,३६२.६२ वर्षाच्या अखेरपर्यंत प्राप्त होण्याचा अंदाज आहे.

    US$६६५,९७५.०९ दान; US$८८,३८७.५३ राहिले

    काही प्रश्न आहेत का?

    जर आपल्याकडे अर्थसंकल्प किंवा OTWच्या आर्थिक बाबींविषयी काही प्रश्न असतील तर कृपया अर्थसमितीशी संपर्क साधा. आम्ही आपल्याकडे असलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी खुल्या गप्पा आयोजित करणार आहोत. ही चर्चा, संपूर्ण इंग्रजीतच होईल. या बातमीच्या पोस्टच्या इंग्रजी आवृत्तीमध्ये चर्चेमध्ये कसे सामील व्हावे याबद्दल अधिक माहिती आहे.

    2020 स्प्रेडशीट स्वरूपात OTW चे बजेट अद्यतन डाउनलोड करण्यासाठी, कृपया या दुव्याचे अनुसरण करा.


    OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक रसिक-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दात्यांनी-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईट. आमच्या स्वयंसेवक अनुवादकांच्या टीमबद्दल व ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, हे पहा भाषांतर पृष्ठ.

    Announcement

    Comments are closed.