ऑक्टोबर २०२५ सदस्यत्व मोहीम: आपल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद

OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) ची ऑक्टोबर सदस्यत्व मोहीम आता संपली आहे आणि आम्हाला हे सांगण्यात खूप आनंद होत आहे की आपल्याला एकूण US$२८८,६९२.२८ देणगी मिळाली आहे. आम्ही खास करून खुश आहोत की ७,३३९ दात्यांनी देणगी देऊन त्यांचे OTW सदस्यत्व चालू ठेवले किंवा नवीन सदस्य झाले, ज्यानेकरून आमचा ४,५०० सदस्यांचा ध्येय पूर्ण झाला. या देणग्या एकूण ७९ देशातल्या ८,७५३ लोकांनी दिल्या: त्या सर्वांना धन्यवाद आणि मोहिमेबद्दल प्रसार केलेल्या आपल्यापैकी सर्वांनाही धन्यवाद. OTW हे त्याच्या जगभरातल्या वापरकर्त्यांशिवाय शक्यच नसते, आणि की आपण सतत आमच्या पाठीशी आहात ही आमच्यासाठी एक गर्वाची व आनंदाची गोष्ट आहे! रसिककृती आणि रसिक संस्कृतीच्या इतिहासाला पाठिंबा आणि पोहच देणे व त्यांचे संरक्षण करणे… Read more

ऑक्टोबर २०२५ सदस्यता मोहीम: तांत्रिक व्यवस्था ज्याला आपण पाठिंबा देता

Archive of Our Own – AO3 (आपला स्वतःचा संग्रह) वाढत राहतोय व नवीन टप्पे गाठतोय. केवळ या एका वर्षात, आपण नव्वद लाख वापरकर्ते, दहा लाख मँडरीन चिनी रसिककृती, आणि १ करोड़ ५० लाख रसिककृती झाल्याचा आनंद साजरा केला—आपण कधी विचार केलाय का, की हे सगळं चालू ठेवण्यासाठी पडद्यामागे काय काम होत असे? आपली उदार देणगी ज्या ठिकाणांना पोचते, त्यापैकी एक आहे आमची तांत्रिक व्यवस्था समिती. ही समिती AO3चा माहितीसाठा व त्याच्या शोध प्रणालींना चलित ठेवणाऱ्या सर्व्हर्सना अपग्रेड करण्याचा कठीण कामात व्यस्त आहेत, जेणे करून या सतत वाढणाऱ्या वापरकर्ते व क्रियाकलापाला आम्ही सांभाळू शकू. तांत्रिक व्यवस्था समिती OTW’s (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ)च्या प्रकल्पांना चलित ठेवणारी पायाभूत सुविधा… Read more

२०२५ OTW निवडणुकीचे आकडेवारी

आता २०२५ ची निवडणूक संपली असल्यामुळे, आम्हाला आमची मतदानाची आकडेवारी आपल्याला सांगण्यास आनंद होत आहे! २०२५ च्या निवडणुकीसाठी आमच्याकडे १५,१३८ पात्र मतदार होते. त्यापैकी २,१९७ मतदारांनी मतदान केले, जे संभाव्य मतदारांच्या २२.८% आहे. मागील वर्षीच्या तुलनेत आमचे यावर्षीच्या मतदार कमी आहे, ज्यांचे मतदान २२.८% होते. आम्ही टाकलेल्या मतपत्रिकांच्या संख्येत घट देखील दिसून आली; ३,४१५ ते २,१९७ पर्यंत, जे ३५.६% घट दर्शवते.

२०२५ OTWच्या(परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळाच्या) निवडणुकीचा निकाल

यावर्षीच्या निवडणुकीत आमच्या सर्व उमेदवारांनी केलेल्या मेहनतीसाठी, निवडणूक समिती आपले आभार मानू इच्छित आहे. आम्ही आमच्या निर्गमित बोर्ड संचालक, जेनिफर हेन्स आणि झिशीन झांग, त्यांच्या कार्यकाळातील सर्व कामांसाठी आभार मानू इच्छितो. त्यासह, आम्ही २०२५ च्या निवडणुकीचा निकाल सादर करण्यास आनंदित आहोत. खालील उमेदवार (वर्णक्रमानुसार) अधिकृतपणे संचालक मंडळावर निवडले गेले आहेत: एलिझाबेथ विल्टशायर हार्लन लिबरमॅन-बर्ग औपचारिक-रित्या, बोर्डाची उलाढाल १ ऑक्टोबर पासून सुरू होणार. आम्ही मंडळाच्या नवीन सदस्यांना त्यांच्या सत्राबद्दल शुभेच्छा देतो. अशा पद्धतीने, निवडणुकीचा हंगाम संपुष्टात आला आहे. बातम्यांचा प्रसार करून, उमेदवारांना प्रश्न विचारून आणि मतदान करून सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आम्ही आभार मानतो! आम्ही पुढच्या वर्षी पुन्हा आपण सर्वांना भेटण्यास उत्सुक आहोत. OTW ही AO3, फॅनलोर,… Read more

२०२५ OTW बोर्डाचे मतदान आता खुले!

निवडणूक खुली आहे! प्रत्येक नवीन OTW (परिवर्तनात्मक रसिककला मंडळी) सदस्य जे जुलै १, २०२४ ते जून ३०, २०२५ मध्ये दाखल झाले आहेत त्यांना मतपत्रिका प्राप्त झाली असेल. जर तुम्हाला मिळाली नसेल तर तुमचे स्पॅम फोल्डर आधी तपासा, व नंतर आमच्याशी या तर्फे संपर्क करा संपर्क फाॅर्म. देणगी पावतीची तारीख यूटीसी वेळेप्रमाणे दिली जाते. कृपया आपल्या पावतीची तारीख तपासा. जर आपली देणगी पावती ३० जून नंतरची असेल, तर आपण मतदान करण्यास पात्र नसाल. जर आपल्याला खात्री नसेल कि आपली देणगी अंतिम मुदतीच्या आधी दिली गेली आहे कि नाही, तर कृपया आमच्या वेबसाईट वरील संपर्क फॉर्म वापरून व “Is my membership current/Am I eligible to vote?(माझे सभासदत्व… Read more