Blog archives

संग्रहाचे युरोपियन वापरकर्ते किती आहेत?

संग्रहाच्या संकल्पनेप्रमाणे, OTW सगळ्या वापरकर्त्यांचा सुगावा घेत नाही किंवा संग्रहाकडे प्रत्येक व्यक्तीसाठी ब्राउजिंग इतिहास बनवण्याची क्षमताही नाही. आमच्या अनुभवाप्रमाणे साधारण वापराच्या अंदाजा वर आधारित जे वाजवी आहे, त्याप्रमाणे आम्ही अंदाज लावला आहे कि एका महिन्यात सक्रिय युरोपियन वापरकर्ते साधारण ३.४८ दशलक्ष आहेत, पण आम्ही हे अंदाज भविष्यात बदलण्याचा हक्क राखून ठेवतो. तसच, डिजिटल सर्विसेस ऍक्ट च्या अंतर्गत काय “प्लॅटफॉर्म” आहे आणि काय “सेवासंस्था” आहे आणि आमचा स्वतःचा संग्रह आणि फॅलोरे ह्यासारखे प्रकल्प एकमेकांपासून विभिन्न “प्लॅटफॉर्म” आहेत कि “सेवासंस्था” ह्याबद्दल अनिश्चितता आहे. भविष्यात ह्या प्रश्नांची पुन्हा उजळणी करण्याचा हक्क आम्ही राखून ठेवतो, पण सध्यासाठी आमचा अंदाज आमच्या सगळ्या प्रकल्पांना लागू आहे.

OTW सेवा वापरण्यासाठी आणि वॉलंटीयर करण्यासाठी कोण स्वागत आहे?

सोर्स (शो, बँड, स्पोर्ट्स प्लेअर्स, ऍनीमे, इत्यादी) आणि फॅन्डमवर चर्चा करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकजणाला आम्ही स्वागत करतो; आम्ही कल्पनारम्य, पाश्चात्त्यरसिकचित्रफीत, रसिककला , आणि इतर प्रकारचे परिवर्तनकारी कामे तयार करण्यार्या किंवा त्यांचा आनंद घेत असलेल्या प्रत्येकाचे स्वागत करतो.

तुम्ही स्वयंसेवक होऊ शकता का? स्वयंसेवक होण्यासाठी तुमच सदस्य असण आवश्यक आहे का?

ज्या कोणाला मदत करायला आवडेल त्याला आम्ही स्वागत करतो! OTWच्या (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) प्रकल्पांमध्ये शेकडो स्वयंसेवक सहभागी आहेत — मोठ्या संख्येने आमच्या सार्वजनिक भरती पोस्ट प्रतिसादात स्वेच्छेने आहेत. OTWच्या स्वयंसेवकांमध्ये अनेक जाती, लिंग, संस्कृती, लैंगिक ओळख आणि क्षमता असलेल्या लोकांचा समावेश आहे. OTW उपरोक्तांपैकी कोणत्याही आधारावर भेदभाव करत नाही, आणि आम्ही आमच्या कर्मचारी मध्ये विविधता आदर करतो. कृपया आमच्या स्वयंसेवक समितीशी संपर्क साधा, जर तुम्हाला स्वयंसेवा कराय्च असेल.

या समिती कशे निवडल्या जातात?

बोर्ड कोणत्या समिती आयोजित केल्या पाहिजेत हे ठरवते, नंतर अशा समित्यांची अध्यक्षांची नेमणूक करते आणि अध्यक्षांने निवडलेल्या समिती सदस्यांना मान्यता देते. सुरुवातीच्या समितीचे सदस्य लोकांकडून निवडले गेले ज्यांनी प्रथम सार्वजनिक “सेवा देण्यास तयार” प्रतिसाद दिला त्यांना स्वयंसेवकांची मागणी.

संचालक बोर्डचा निवड कोण कर्त?

OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) कार्यरत होण्यासाठी 2007-2008 बोर्डची नेमणूक करण्यात आली. सर्व आगामी बोर्ड OTW सदस्य निवडून घेतात. समितीचे आयोजन करणे, अंतिम निर्णय घेणे, वित्तीय रेकॉर्ड ठेवणे, अनुपालनाचे पालन करणे बोर्डची जबाबदारी आहे. बोर्डच्या सदस्यांना तीन वर्षांची सेवा देण्यास सांगितले जाते. प्रत्येक वर्षाचा बोर्ड एक-तृतीयांश निवडला जातो. बोर्डला चांगल्या स्थितीतील सदस्यांमधून निवडून देण्यात येते ज्यांनी कमिटीवर कमीत कमी एक वर्ष सेवा केले आहे. OTWमधील प्रत्येक सदस्याला निवडणुकीत एक मत मिळते, ते किती योगदान देतात याची पर्वा न करता. आपल्याला बोर्डात भाग घ्याइची इच्छा असल्यास, कृपया निवडणूक कर्मचारींशी संपर्क साधा. आमच्या निवडणूक प्रक्रियेबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया OTW निवडणूक वेबसाइट येथे भेट द्या.