Blog archives

सदस्यांच्या गुंतवणुकीचे संरक्षण करण्यासाठी कोणते उपाय योजले जातात?

OTW (परिवर्तनात्मक रसिककला मंडळी) एक ना-नफा-ना-तोटा तत्त्वाधारित संस्था आहे, आणि सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था मान्य करते व अशा पद्धतीने कारवाई करण्यासाठी निष्ठादायी जबाबदाऱ्या सांगणाऱ्या कायदे व नियमांची संस्था आधीन आहे. OTWची फक्त संघटनेच्या सदस्यांनी व संघटने बाहेरील चाहत्यांनी छाननी केली नसून, IRS आणि आमचे निमंत्रण राज्य, डेलावेरने ही केली आहे. काही अतिरिक्त सुरक्षा उपाय ही आम्ही लागू केले आहेत. OTW निधीचा गैरवापर फेटाळते आणि त्यावर खटला चालविता येऊ शकतो. हे एक समस्या निवारक म्हणून काम करते. OTWच्या निधीचा वाटप, सामान्यत: स्वीकारलेले लेखाविषयक तत्वानुसार देखरेख व खर्चाच्या अधिकृत परवानगीचा विचार करून केले जाते. OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) च्या आर्थिक माहितीचे स्वतंत्र तृतीय पक्ष CPA संस्थेकडून प्रत्येक आर्थिक वर्षाचे… Read more

देणग्या घेणाऱ्या व्यक्तींकडून एकत्रित केलेल्या माहितीचे OTW संरक्षण कसे करते?

OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) ला, IRS नियमांचे पालन करण्यासाठी देणगीदारांकडून काही माहिती (जसे नाव, पत्ता, इत्यादी) गोळा करणे आवश्यक आहे. रसिकांनी त्यांच्या रसिक-जीवनात टोपणनाव वापरणे लोकप्रिय आहे, व म्हणून ही माहिती OTWद्वारे जप्त ठेवली जाईल आणि केवळ OTWच्या खजिनदारास आणि विकास व सदस्यता समितीच्या सदस्यांना उपलब्ध असेल. पूर्णपणे निनावी देणग्या केवळ नगदीत केल्या जाऊ शकतात.

OTWला देणगी वजावटी-कर लागू करण्यायोग्य आहे का?

होय, अमेरिकेत आहे. अमेरिकन IRS ने OTWस कर-सूट, गैर-लाभकारी दर्जाची मान्यता दिली आहे. आमच्या ना-नफा स्थितीचा एक फायदा असा आहे की आपण संस्थेला जी काही देणगी देता, आपल्या यूएस $ १० OTW सदस्यता शुल्कांसह, ती आता युनायटेड स्टेट्स मध्ये कर-वजावटी आहे! आणखी चांगले म्हणजे, आपल्या मागील देणग्या आमच्या कराराच्या तारखेपासून कर-वजावटी आहेत: ५ सप्टेंबर २००७. कृपया लक्षात घ्या की जर आपण यूएसच्या बाहेर असाल तर, आपले योगदान कर-वटण्यायोग्य असू शकते किंवा नसू शकते. आपण कर सल्लागाराचा सल्ला घ्यावा आणि US 501 (c) (3) ला आर्थिक-भेट देणे हे आपल्या स्थानिक कायद्यांनुसार कर कपातीसाठी पात्र ठरते किंवा नाही हे पहावे.

तुम्ही OTWला देणगी कशी देऊ शकता? मी युनायटेड स्टेट्सच्या बाहेर स्थायी असेन तर मी देणगी देऊ शकतो का?

OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) ओनलाईन देणग्यां मार्फत, किंवा आमच्या पोस्ट ऑफिस बॉक्समध्ये मेल करून चेकद्वारे जगभरातून देणग्या स्वीकारण्यास सक्षम आहे. कृपया तपशिलांसाठी OTW ला समर्थन द्या हे पहा. आमचे देयक प्रोसेसर OTWला क्रेडिट कार्ड किंवा बँक खाते क्रमांक उघड करणार नाही. मेलद्वारे मिळालेल्या वैयक्तिक धनादेशांवर खात्याची माहिती अपरिहार्यपणे असेलच, परंतु ती माहिती जतन करून ठेवली जाणार नाही.

OTW कोणत्या गोष्टीवर पैसे खर्च करते हे कोण ठरवते?

बोर्ड त्याच्या विश्वस्त कर्तव्यांचा भाग म्हणून मुख्यत्वे हे निर्णय घेण्यासाठी जबाबदार आहे. बोर्ड खजिनदार विशेषतः OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी)च्या अर्थसंकल्पाच्या निर्मिती आणि अंमलबजावणीसाठी जबाबदार असतात, परंतु बोर्डाने अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी, तसेच कोणत्याही अनियोजित खर्चासाठीच मतदान करणे आवश्यक आहे. कमीत कमी देवाणघेवाणीसाठी, कोणत्या वस्तू आणि सेवांची आवश्यकता असू शकते हे निर्धारित करण्यासाठी मंडळ OTWच्या इतर समित्यांना जबाबदारी देते.