Blog archives
जर काही लेख किंवा माहिती समाविष्ट नाही असे मला वाटत असेल तर मी काय करावे?
सर्व रसिक व आवड असलेले लोक फॅनलोर मध्ये विद्यमान पृष्ठांमध्ये लेख निर्माण करून व माहिती समाविष्ट करण्यास निमंत्रित आहेत. रसिक इतिहासाच्या जतनामध्ये कोणतेही योगदान स्वागतार्ह आहे.
मला फॅनलोर वरील एका पृष्ठामध्ये बदल करावयाचा आहे, पण मला कसे करू ते माहित नाही. कृपया मदत करा.
आम्ही नेहमीच नवीन संपादकांचे फॅनलोर मध्ये स्वागत करण्यास उत्सुक असतो, व आमच्याकडे आपली सुरुवात करून देण्यासाठी खूप संसाधने आहेत. ह्या पासून सुरुवात करा फॅनलोर मध्ये शोधासाठी आमच्या टिपा आणि मूलभूत संपादकीय शिकवणी, व नंतर आपण हे शोधलेले असल्याची खात्री करा आमची अधिक तपशीलवार माहिती पृष्ठ.आपण याचा सुद्धा अधिक परिचय करून घ्या- आमची धोरणे. आपण संपादन करण्यास सुरुवात केलीत कि, फॅनलोर बदल चीटशीट हे एक अमूल्य संसाधन आहे – त्याच बरोबर हि टेम्प्लेट्स ची यादी जी विकी बरोबर बहुतकरून वापरली जातात. जर आपल्याला अधिक मदतीची आवश्यकता असेल, तर आपण नेहमीच संपादकीय मदतीसाठी आमच्या गार्डनर्स ना संपर्क करू शकता. लहान आणि/किंवा प्रास्ताविक पृष्ठ नेहमीच स्वागतार्ह असतात!
विकी फक्त इंग्रजी मध्ये का आहे? मी दुसऱ्या भाषेतील संपादनामध्ये योगदान करू शकतो का?
रसिकगट आंतरराष्ट्रीय असतात, व आम्ही जगभरातील रसिकांच्या योगदानाचे स्वागत करतो. सध्य-वेळी, फॅनलोर हे इंग्रजी भाषेतील संसाधन आहे, पण संपादकांना असे रसिकगट, रसिक-कार्य, आणि रसिक समुदाय दस्तऐवज करण्यास प्रोत्साहित केले जाते जे मूलतः इंग्रजी सोडून इतर भाषांमध्ये आचारित होते. जर आपल्याला इंग्रजी भाषा-एतर रसिकगटांमधील दस्तऐवजीकरण पैलूंमध्ये सल्ला देण्यास किंवा मदत करण्यास आवडणार असेल, किंवा फॅनलोर बरोबर काम करून विकी ची आंतरराष्ट्रीय व्याप्ती वाढवण्यामध्ये आपल्याला रस असेल, तर कृपया आमच्याशी संपर्क साधा.
आपण फॅनलोर विकीवर चाहत्यांची ओळख आणि वास्तविक नावाची ओळख जोडता का?
फॅनलोर कडे एक ओळख संरक्षण धोरण आहे, जे खात्री करते कि, तशी इच्छा असल्यास, रसिक आपली स्युडो-नाम रसिक ओळख आपल्या खऱ्या नावापासून वेगळी ठेऊ शकतात. याव्यतिरिक्त, OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) हे रसिकांची गोपनीयता जपण्यास वचनबद्ध आहेत, ते आमच्या सेवांचे वापरकर्ते असोत व नसोत. जर विकी मध्ये काही बदल झाला आहे जो आपल्या परवानगी शिवाय आपली खरी-ओळख व रसिक-ओळख जोडत आहे, तर कृपया फॅनलोर शी संपर्क साधा आणि आम्ही आपल्या बरोबर काम करून प्रश्न सोडवू.
फॅनलोर विकीची व्याप्ती किती आहे?
फॅनलोर च्या व्याप्तीमध्ये सर्व प्रकारचे रसिकगट व परिवर्तनात्मक रसिककार्य सामील असतात. आम्ही भिन्न प्रकारच्या रसिकांकडून योगदान शोधत आहोत जिथे ते त्यांच्या रसिक-समुदायाच्या इतिहासाबद्दल अनुभव सांगतील.