Blog archives
संग्रहाचे युरोपियन वापरकर्ते किती आहेत?
संग्रहाच्या संकल्पनेप्रमाणे, OTW सगळ्या वापरकर्त्यांचा सुगावा घेत नाही किंवा संग्रहाकडे प्रत्येक व्यक्तीसाठी ब्राउजिंग इतिहास बनवण्याची क्षमताही नाही. आमच्या अनुभवाप्रमाणे साधारण वापराच्या अंदाजा वर आधारित जे वाजवी आहे, त्याप्रमाणे आम्ही अंदाज लावला आहे कि एका महिन्यात सक्रिय युरोपियन वापरकर्ते साधारण ३.४८ दशलक्ष आहेत, पण आम्ही हे अंदाज भविष्यात बदलण्याचा हक्क राखून ठेवतो. तसच, डिजिटल सर्विसेस ऍक्ट च्या अंतर्गत काय “प्लॅटफॉर्म” आहे आणि काय “सेवासंस्था” आहे आणि आमचा स्वतःचा संग्रह आणि फॅलोरे ह्यासारखे प्रकल्प एकमेकांपासून विभिन्न “प्लॅटफॉर्म” आहेत कि “सेवासंस्था” ह्याबद्दल अनिश्चितता आहे. भविष्यात ह्या प्रश्नांची पुन्हा उजळणी करण्याचा हक्क आम्ही राखून ठेवतो, पण सध्यासाठी आमचा अंदाज आमच्या सगळ्या प्रकल्पांना लागू आहे.
मी AO3 कडे स्वतःचे चालत असलेले संग्रह आयात करू इच्छितो. मला काय करावं लागेल ?
आयात करणारे उपकरण मिळवण्यासाठी Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प) समितीशी संपर्क साधा. कृपया आपल्या विशेष गरजा आम्हाला प्रारंभपासून कळवा – उदाहरणार्थ, जर आपण आपली जुन्या डोमेनची देखरेख करणे आमच्यावर सोपवू इच्छित असाल, किंवा जर तुमच्या संग्रहात मल्टीमीडिया सामग्री असेल तर.
मला AO3 वर अकाउंट कसे मिळू शकते?
AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) नी नोव्हेंबर २००९ मध्ये खुल्या बीटामध्ये प्रवेश केला. अकाउंट तयार करण्यासाठी, आपल्याला आवश्यकता आहे एका आमंत्रणाची. आम्ही आमंत्रण कोड प्रणालीचा वापर करतो म्हणजे AO3 नियंत्रितपणे वाढू शकेल. आम्हाला हळूहळू नवीन वापरकर्ते जोडण्याची आवश्यकता आहे जेणेकरून आमचे अकाउंट क्रमांक आमचे हार्डवेअर, बँडविड्थ, मदत आणि समर्थन जेवढे सामोरे जाऊ शकतात, त्यापेक्षा जास्त होणार नाहीत. ह्यामुळे AO3चा वापर करणाऱ्या प्रत्येकाने शक्य असेल तेवढा सर्वोत्तम अनुभव घेतला आहे, हे सुनिश्चित करण्यास आम्हाला मदत होते. एकदा आपण आमंत्रण ईमेल प्राप्त केल्यानंतर, अकाउंट निर्मिती पृष्ठावर जाण्यासाठी ईमेलमध्ये प्रदान केलेल्या दूव्यावर क्लिक करा. जर आपल्याला दुसऱ्या वापरकर्त्याद्वारे आमंत्रण दूवा प्राप्त झाली असेल, या दूव्यावर क्लिक केल्यावर आपल्याला योग्य… Read more
OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) इतर संग्रहणे पुनर्स्थित करण्याचे प्रयत्न करीत आहे का?
नाही. खरं-तर आम्ही आशा करतो की इतर चाहते आमच्या संग्रहांचे सॉफ्टवेअर – जे ओपन-सोर्स असेल आणि वापरण्यासाठी आणि सुधारण्यासाठी मुक्त असेल – वापरून स्वतःचे संग्रह तयार करतील. Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) मध्ये, आम्ही उत्तम वैशिष्ट्य आणि फॅन-मैत्रीपूर्ण धोरणांसह बहु-रसिकगट संग्रह तयार करण्याची आशा करतो, जे सानुकूलन आणि मोजमापासाठी सज्ज आहे, आणि खूप काळ टिकेल. आम्ही रसिकगटाचे ठेव ग्रंथालय होऊ इच्छितो, फक्त असे स्थान नाही जिथे कोणीही कधी आपले कार्य पोस्ट करतो, पण एक जागा जेथे लोक विद्यमान कार्य किंवा प्रकल्प यांचे स्थिर दुवे आहेत आणि बॅकअप करू शकतात. आम्ही एकतर हे किंवा ते असे नसून; अधिकाधिकाच्या मागे आहोत!
संग्रहाचे सॉफ्टवेअर बनवायला इतका वेळ का लागत आहे?
OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) ज्या स्तराचा संग्रह तयार करू इच्छिते, ही एक सोपी प्रक्रिया नाही. आम्ही फक्त विद्यमान सॉफ्टवेअर वापरून संग्रहण नाही तयार करीत अहोत, परंतु चाहत्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नवीन ओपन-सोर्स संग्रह सॉफ्टवेअर तयार करत आहोत, जे सहजपणे व्यवस्थापित करता येऊ शकेल आणि सहजपणे पुन: पुन्हा वापरले जाऊ शकेल, आणि जे एकाच वेळी शेकडो वापरकर्त्यांकडून संभाव्यता लक्षावधी कथा हाताळू शकते. हे काम स्वयंसेवकांच्या एका गटाकडून केले जात आहे, ज्यामध्ये प्रशिक्षणार्थींचा एक गट आहे ज़ो कोड कसा लिहावा आणि कसा व्यवस्थापित करावा हे शिकत आहेत, जे कॉडर्सचे रसिक समुदाय तयार करण्यासाठी मदत करतात. हा असा समूह आहे ज़ो भविष्यातील संग्रहाचे सॉफ्टवेअर व्यवस्थापनासाठी मदत करू शकेल. दुसऱ्या… Read more