TWC कोणते कॉपीराइट वापरत आहे?

Transformative Works and Cultures – TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) क्र. २५ पासून, निबंधांना Creative Commons विशेषता 4.0 आंतरराष्ट्रीय परवाना च्या अंतर्गत परवाना दिलेला आहे. नियतकालिकेच्या तर्काबद्दल स्पष्टीकरण हवं असल्यास, १५ सप्टेंबर २०१७ चे संपादकीय पाहावे, कॉपीराइट आणि ओपन ऍक्सेस.

हा परवाना विशेषता देऊन अव्यावसायिक व व्यावसायिक ह्या दोन्ही प्रकारच्या उपयोगासाठी परवानगी देतो. म्हणून, अश्या संस्था, जसे की प्रेस, ज्यांना लेखांचे पुनर्मुद्रण करण्याची इच्छा आहे (व्यावसायिक कारणांसाठी सुद्धा), त्यांना कॉपीराइट मुक्ततेसाठी कागदपत्री प्राप्त करण्याची गरज नाहीये.

TWC क्र. १ ते २४ साठी Creative Commons विशेषता-अव्यावसायिक 3.0 सर्वसामान्य परवाना च्या अंतर्गत परवाना दिलेला आहे. क्रमांक १ ते २४ साठी, TWC कॉपीराइट राखून ठेवतं, लेखक नाही. ज्यांना नफ्यासाठी पुनरुत्पादन करायचे असेल, लेखकांना सुद्धा, त्यांना TWC ची परवानगी घ्यावी लागेल. अशी परवानगी नियमितपणे फुकट दिली जाते.

कोणत्याही प्रश्नांसाठी संपादकाशी संपर्क साधा.

Comments are closed.