OTW कोणत्या गोष्टीवर पैसे खर्च करते हे कोण ठरवते?

बोर्ड त्याच्या विश्वस्त कर्तव्यांचा भाग म्हणून मुख्यत्वे हे निर्णय घेण्यासाठी जबाबदार आहे. बोर्ड खजिनदार विशेषतः OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी)च्या अर्थसंकल्पाच्या निर्मिती आणि अंमलबजावणीसाठी जबाबदार असतात, परंतु बोर्डाने अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी, तसेच कोणत्याही अनियोजित खर्चासाठीच मतदान करणे आवश्यक आहे. कमीत कमी देवाणघेवाणीसाठी, कोणत्या वस्तू आणि सेवांची आवश्यकता असू शकते हे निर्धारित करण्यासाठी मंडळ OTWच्या इतर समित्यांना जबाबदारी देते.

Comments are closed.