मला AO3 वर अकाउंट कसे मिळू शकते?

AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) नी नोव्हेंबर २००९ मध्ये खुल्या बीटामध्ये प्रवेश केला. अकाउंट तयार करण्यासाठी, आपल्याला आवश्यकता आहे एका आमंत्रणाची. आम्ही आमंत्रण कोड प्रणालीचा वापर करतो म्हणजे AO3 नियंत्रितपणे वाढू शकेल. आम्हाला हळूहळू नवीन वापरकर्ते जोडण्याची आवश्यकता आहे जेणेकरून आमचे अकाउंट क्रमांक आमचे हार्डवेअर, बँडविड्थ, मदत आणि समर्थन जेवढे सामोरे जाऊ शकतात, त्यापेक्षा जास्त होणार नाहीत. ह्यामुळे AO3चा वापर करणाऱ्या प्रत्येकाने शक्य असेल तेवढा सर्वोत्तम अनुभव घेतला आहे, हे सुनिश्चित करण्यास आम्हाला मदत होते. एकदा आपण आमंत्रण ईमेल प्राप्त केल्यानंतर, अकाउंट निर्मिती पृष्ठावर जाण्यासाठी ईमेलमध्ये प्रदान केलेल्या दूव्यावर क्लिक करा. जर आपल्याला दुसऱ्या वापरकर्त्याद्वारे आमंत्रण दूवा प्राप्त झाली असेल, या दूव्यावर क्लिक केल्यावर आपल्याला योग्य स्थानावर पोहोचविले जाईल.

Comments are closed.