कोणालाही नाही, AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) किव्हा त्याच्या मजकूरा मधून, OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) सहित कोणीही पैसा कमवत नाही. खरेतर, ह्याचे उलट खरे आहे कारण OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी), AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) होस्ट करण्यासाठी पैसे खर्च करते.
जाहिरात दर्शविली जात नाही. त्याऐवजी, आम्ही आमच्या वापरकर्त्यांच्या समर्थनासाठी सार्वजनिक रेडिओ-शैलीतील प्लेज ड्राइव ठेवतो. AO3 किंवा त्याच्या कोणत्याही साधनांचा वापर करण्यासाठी कधीच कोणत्याही देणगीची आवश्यकता नसेल.