सदस्यांच्या गुंतवणुकीचे संरक्षण करण्यासाठी कोणते उपाय योजले जातात?

OTW (परिवर्तनात्मक रसिककला मंडळी) एक ना-नफा-ना-तोटा तत्त्वाधारित संस्था आहे, आणि सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था मान्य करते व अशा पद्धतीने कारवाई करण्यासाठी निष्ठादायी जबाबदाऱ्या सांगणाऱ्या कायदे व नियमांची संस्था आधीन आहे. OTWची फक्त संघटनेच्या सदस्यांनी व संघटने बाहेरील चाहत्यांनी छाननी केली नसून, IRS आणि आमचे निमंत्रण राज्य, डेलावेरने ही केली आहे.

काही अतिरिक्त सुरक्षा उपाय ही आम्ही लागू केले आहेत. OTW निधीचा गैरवापर फेटाळते आणि त्यावर खटला चालविता येऊ शकतो. हे एक समस्या निवारक म्हणून काम करते. OTWच्या निधीचा वाटप, सामान्यत: स्वीकारलेले लेखाविषयक तत्वानुसार देखरेख व खर्चाच्या अधिकृत परवानगीचा विचार करून केले जाते. OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) च्या आर्थिक माहितीचे स्वतंत्र तृतीय पक्ष CPA संस्थेकडून प्रत्येक आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण केले जाते. अखेरीस, OTWने संस्थेच्या आर्थिक व्यवहारांचे अहवाल देण्यासाठी दरवर्षी IRSसह Form 990 भरणे आवश्यक आहे.

वार्षिक लेखापरीक्षण अहवाल आणि फॉर्म ९९० हे OTWच्या वेबसाइट वर जाहीरपणे उपलब्ध आहेत अहवाल आणि प्रशासकीय दस्तऐवज पृष्ठावर तसेच अर्थसमिती पृष्ठावर.

Comments are closed.