संग्रहाचे सॉफ्टवेअर बनवायला इतका वेळ का लागत आहे?

OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) ज्या स्तराचा संग्रह तयार करू इच्छिते, ही एक सोपी प्रक्रिया नाही. आम्ही फक्त विद्यमान सॉफ्टवेअर वापरून संग्रहण नाही तयार करीत अहोत, परंतु चाहत्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नवीन ओपन-सोर्स संग्रह सॉफ्टवेअर तयार करत आहोत, जे सहजपणे व्यवस्थापित करता येऊ शकेल आणि सहजपणे पुन: पुन्हा वापरले जाऊ शकेल, आणि जे एकाच वेळी शेकडो वापरकर्त्यांकडून संभाव्यता लक्षावधी कथा हाताळू शकते.

हे काम स्वयंसेवकांच्या एका गटाकडून केले जात आहे, ज्यामध्ये प्रशिक्षणार्थींचा एक गट आहे ज़ो कोड कसा लिहावा आणि कसा व्यवस्थापित करावा हे शिकत आहेत, जे कॉडर्सचे रसिक समुदाय तयार करण्यासाठी मदत करतात. हा असा समूह आहे ज़ो भविष्यातील संग्रहाचे सॉफ्टवेअर व्यवस्थापनासाठी मदत करू शकेल. दुसऱ्या शब्दांत, आम्ही फक्त संग्रहाचे सॉफ्टवेअर तयार नाही करत आहोत, आम्ही बिल्डर्स तयार करत आहोत.

आम्ही शक्य तितके चाहत्यांकडून आलेले अभिप्राय वापरून, सर्वसमावेशक आणि चाहते-अनुकूल धोरण विकसित करण्यासाठी सुद्धा वेळ खर्च केला आहे; AO3 वर, आपण आमच्या परिणामि सेवा अटी पाहू शकता.

हे करण्यास काही वेळ लागत आहे परंतु आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की तो वेळ वाया जात नाही.
आपण आमच्या बातमीपत्रकांमध्ये आणि ब्लॉगमध्ये AO3 चा विकास बघू शकता.
आपण समाविष्ट होऊ इच्छित असल्यास, स्वयंसेवक आणि भर्ती समितीशी संपर्क साधा.

Comments are closed.