OTWची (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) मूलतत्त्वे स्त्रियांची बनलेली समुदाय म्हणून दशकभराच्या इतिहासासह एका चाहत्याच्या समुदायात आहे. आज, इंटरनेट आणि नवीन तंत्रज्ञानांमुळे, ते समुदाय आणि त्याची रुची वेगाने विविध मार्गांनी वाढत आहे आणि इतर इतिहास असलेल्या पंथ समुदायांसह आंतरछेद करीत आहे. आमच्या समुदायांचा विस्तार होत आहे आणि रीमिक्स संस्कृतीच्या इतर जातींची माहिती मिळवण्या बद्दल आम्ही उत्सुक आणि आशावादी आहोत, आणि आपण जे काही करतो ते ज्यांना करायच असेल, आम्ही त्यांचे स्वागत करतो. त्याचवेळी, हे विशेषतः सृजनशील समाज हे एक असे स्थान आहे जे स्त्रियांच्या आवडीनिवडींनी बनवलेले आणि आकाराने बनवलेल आहे, कारण ऐतिहासिक दृष्टीत एक अतिशय दुर्मिळ आणि आश्चर्यकारक गोष्ट आहे.
OTW सर्व चाहत्यांना आणि सर्व सदस्यांच्या चाहत्यांच्या योगदानाची प्रशंसा करते. OTW ऐतिहासिक दृष्टीत मुख्यतः स्त्री संस्कृतीत पुनरुत्थान करण्यायोग्य परिवर्तनाच्या प्रथेतून बाहेर पडली म्हणून, आम्ही विशेषतः स्त्रियांच्या सहभागाचा इतिहास आणि स्त्रियांच्या कामामुळे घडवून आणलेल्या रसिकगणच्या पद्धतीचा आदर करतो.
अनेक संस्था, जसे Comic Book Legal Defense Fund, Academy of Machinima Arts & Sciences, आणि Electronic Frontier Foundation, प्रश्नांवर आणि रसिकगणशी संबंधित स्वारस्यांवर लक्ष केंद्रित करते; OTW विशेषत: रसिककथा , पाश्चात्त्यरसिकचित्रफीत आणि रसिककलाच्या परिवर्तनात्मक कार्यांशी संबंधित विषयांवर लक्ष केंद्रित करत आहे.