अजून एक संग्रह का?

एक नवीन, विनामूल्य, ओपन-सोर्स सॉफ्टवेअर पॅकेज तयार करणे, जे चाहत्यांना त्यांच्या स्वत: च्या मजबूत, संपूर्ण-वैशिष्ट्यीकृत संग्रहांचे होस्ट करण्याची अनुमती देईल, जे शेकडो कथांचे समर्थन करू शकेल आणि ज्यात सोशल नेटवर्किंग ची वैशिष्ट्ये असतील जी चाहत्यांना एकमेकांना जुडण्यासाठी सहाय्य करतील हे आमचे पहिले ध्येय आहे.

आमचे दुसरे ध्येय म्हणजे हे सॉफ्टवेअर वापरून रसिक-कथा आणि इतर परिवर्तनाच्या रसिक-कार्यांसाठी एक अव्यावसायिक आणि ना-नफा केंद्रीय होस्टिंग स्थळ प्रदान करणे,
जिथे यांना OTWच्या (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी च्या) समर्थनामुळे आश्रय दिला जाऊ शकतो आणि या कार्यांच्या कायदेशीरपणा आणि सामाजिक मूल्यासाठी न्यायालयीन खटला तयार करण्यास, याचा लाभ घेता येऊ शकतो.
AO3 अन्य संग्रहांप्रमाणे नसून, Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) ही अश्या व्यक्तींनी चालवलेली संस्था नाही ज्यांचा रसिकगटांमधला रस कमी-जास्त होत राहतो, ही एक ना-नफा संस्था आहे जी एक वचनबद्ध चाहत्यांनी निवडलेल्या रोटेटिंग बोर्ड द्वारे चालवली जाते. आम्ही आशा करतो की यामुळे इतर काही संग्रह किव्हा सेवांपेक्षा जास्त टिकाऊपणा आणि स्थिरता असण्याकडे आमची वाटचाल असेल.

Comments are closed.