Posts by Retired Personnel

ऑक्टोबर २०२१ मोहीम: आपल्या समर्थनासाठी धन्यवाद

OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) ची ऑक्टोबर सदस्यता मोहीम पूर्ण झाली आहे, आणि आम्हाला हे सांगायला खूप आनंद होत आहे की आम्ही तब्बल US$195,009.65 उभारले आहेत, आमच्या US$४०,००० च्या ध्येयायहून खूप जास्त. आम्ही आमची सदस्यता सुद्धा 4,786 पर्यंत वाढवली आहे. हे शक्य झाले आहे 6,700 दात्यांच्या उदारतेमुळे, जे जगभरातील 77 देशातून आहेत. नेहमीप्रमाणेच, आम्ही आमच्या जागतिक समुदायासाठी खूप कृतज्ञ आहोत. धन्यवाद! तुमचे समर्थन आम्हाला आमच्या मिशन च्या सेवेत काम चालू ठेवायला देते ज आहे: रसिककृतींना आणि रसिकसंस्कृतींच्या सर्व रूपांना शिरकाव देऊन आणि जोपासून आम्ही प्रतिनिधित्व करीत असलेल्या रसिकांचे हितसंबंध पुढे करणे.

ऑक्टोबर २०२१ ड्राइव्ह: चाहत्यांद्वारे , चाहत्यांसाठी

OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) हे प्रेमाचे श्रम आहे. हे चाहत्यांद्वारे, चाहत्यांसाठी बनवलं गेलं आहे. आम्ही एक ना-नफा-ना-तोटा तत्त्वाधारित संस्था आहोत, आणि आम्ही १००% देणग्यान वर अवलंबून आहोत: आमच्या स्वयंसेवकांन कडून वेळेची देणगी आणि आम्ही सेवा देत असलेल्या समुदायाकडून निधीचे दान. आज आमच्या द्विवार्षिक सदस्यता मोहिमेची सुरवात आहे, जेव्हा आम्ही विचारतो की तुमच्यापैकी जे हे करण्यास सक्षम आहेत त्यांनी आमच्या कार्याला समर्थन देण्यासाठी आर्थिक योगदान देण्याचा विचार करावा. आम्ही तुमचे पैसे आमच्या बजेटमध्येकसे खर्च करतो याबद्दल वाचू शकता.

OTW अर्थसमिती: २०२१ अर्थसंकल्प अद्यतन

२०२१ दरम्यान, OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) अर्थ समितीने दृष्टीआड काम करून, मंडळाची बिल भरणे, कर भरणे, मानक अर्थलेखा प्रक्रिया पूर्ण करणे या सगळ्याची खबरदारी घेतली. सध्या, २०२० च्या आर्थिक विधानांची तयारी व लेखापरीक्षा चालू आहे! दरम्यान ही टीम २०२१ च्या अर्थसंकल्पीय अद्यतनावरही संघ परिश्रमपूर्वक काम करत आहे, व आम्ही अभिमानाने तुमच्या समोर या वर्षाचा अर्थसंकल्प मांडू इच्छितो (अजून तपशीलवार माहिती साठी २०२१ आर्थिक स्प्रेडशीट प्रवेश):

आपल्या समर्थनाबद्दल धन्यवाद !

चांगली बातमी मिळालं : आम्ही सफल झाले ! एप्रिल सदस्यता ड्राइव्ह संपले आहे आणि एकत्रितपणे आम्ही आमच्या US$ 130,000 च्या निधी उभारण्याचे उद्दिष्ट ओलांडले आहे. प्रत्यक्षात, 86 देशांमधील 9,966 दात्यांनी आम्हाला US$ 245,655 च्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यास मदत केली आहे. हे आमचे सर्वात यशस्वी सदस्यता ड्राइव्ह आहे आणि आम्ही आपल्या सर्व समर्थनाबद्दल चकित आणि कृतज्ञ आहोत, धन्यवाद! OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) आणि त्याच्या सर्व प्रकल्पांना समर्थन देण्यासाठी ही निधी महत्त्वपूर्ण भूमिका निभावतील – फॅनलोर, Legal Advocacy (कायदेविषयक मदत), Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), Transformative Works and Cultures – TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती), and Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) – जे आम्हाला रसिककृती… Read more

आपले समर्थन OTWला रसिककृती संरक्षित करण्यास मदत करते

सर्व प्रकारच्या रसिककृती आणि रसिक-इतिहास वाचवणे आणि प्रसारित करणे, OTWचा (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) मुख्य उद्दीष्ट आहे. अशा वेळी जेव्हा इतर प्लॅटफॉर्म प्रतिबंधित आणि वापरकर्ता-व्युत्पन्न सामग्री लपवत असतात, आमची ही मोहिम नेहमीपेक्षा अधिक महत्वाची आहे. आम्ही हे कार्य आपल्या सशक्त स्वयंसेवक शक्तीच्या कार्याद्वारे आणि आपल्या उदार देणग्यांच्या समर्थनाद्वारे जिवंत ठेवतो. OTW रसिककृती आणि रसिक-इतिहास संरक्षण कसे करते? येथे काही उदाहरणे आहेत: