समिती-संवाद समिती वर प्रकाशझोत

समिती-संवाद आणि नियम आणि तक्रारनिवारण च्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल

आमच्या समिती-संवाद आणि नियम आणि तक्रारनिवारण समित्यांचा कार्यभार आणखी नीट सांभाळण्यासाठी आम्ही कुठली समिती कुठल्या विनंत्यांची जबाबदारी घेईल ह्यात थोडे बदल करत आहोत.

नेहमीप्रमाणे, नियम आणि द्येयधोरणे समिती ह्यांना नियम आणि तक्रारनिवारण समिती संबोधित करत राहील आणि समिती-संवाद साईट कशी वापरावी ह्यावरचे प्रश्न व दोष संबोधित करीत राहील. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या नियम आणि तक्रारनिवारण समिती आधी हाताळत होते व ज्या आता समिती-सन्वाद समिती हाताळणार आहे. ह्या पुढीलप्रमाणे आहेत:

  • जर एका खात्याची सुलभता गेली असेल (उदाहरणार्थ, जर तुम्ही खाते उघडण्यासाठी वापरलेला ई-मेल, ज्यावरून तुम्ही पासवर्ड रीसेट करू शकता, विसरला असाल किंवा त्या ई-मेल ची सुलभता हरवली असेल)
  • मुक्त कलाकृतींबद्दल प्रश्न आणि समस्या
  • चुकीच्या भाषेच्या वर्गात घातलेली कलाकृती

ह्यातल्या कोणत्याही मुद्द्याबद्दल जर तुम्हाला नोंद करायची असेल तर कृपया समिती-संवाद समिती ला संपर्क करा . जर तुमचा अहवाल चुकीच्या विभागाला पोहोचला तरीही काही हरकत नाही! आम्ही तोच अहवाल थेट बरोबर विभागात स्थानांतर करू किंवा तुम्हाला पुन्हा तो प्रस्तुत करायला सांगू.

आम्हाला आशा आहे कि हे बदल आमच्या नियम आणि तक्रारनिवारण समितीच्या सदस्यांना मदत करतील कारण ते त्यांना इतर मुद्द्यांना त्यांचा वेळ आणि शक्ती देण्याची मुभा देतील!

एप्रिल २०२१ ड्राईव्ह: आपल्या समर्थनासाठी धन्यवाद

OTW(परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) साठी असलेली एप्रिल सदस्यता ड्राईव्ह समाप्त झाली आहे, त्यामध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. आम्ही अचंबित व कृतज्ञ आहोत कि ड्राईव्ह च्या दरम्यान, आम्ही आमच्या US$५०,००० ध्येयाला मागे टाकून ८४ देशांमधील ९,११० देणगीदारांकडून US$२६४,९१८.८५ जमा केले. आम्ही आमची सदस्यताही १६,८४२ एवढी वाढवली. आपण सर्वजण अफाट आहात: धन्यवाद! Read More

एप्रिल २०२१ ड्राईव्ह: आपल्यासाठी टाळ्या

परिवर्तनात्मक कार्यांची निर्मिती उत्साहवर्धक करून व त्याचे जतन करून रसिकगटांची सेवा करण्याच्या मिशन सह, रसिकांनी रसिकांसाठी OTW(परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) २००७ साली स्थापित केली. चौदा वर्षांनंतरही, आमची वचनबद्धता अटळ आहे. जगभरातील रसिक-शत्रु कायद्यांच्या विरोधात केलेली कायदेशीर वकिली असो, धोक्यात असलेल्या रसिक-कार्यांचा बचाव, रसिक इतिहास मुद्रित करणे, रसिक-अभ्यासाच्या शिष्यवृत्तीसाठी स्थळ प्रदान करणे असो, व आपली जुनी वा नवीन रसिक-कार्य स्थपित करणे असो, रसिकांचा व त्यांनी निर्मित केलेल्या रसिक-कार्यांचा बचाव करण्यास OTW सतत कार्यरत आहे.

आपल्या मदतीशिवाय आम्हाला हे करणे शक्य नाही. जसे आम्ही दर एप्रिल व ऑक्टोबर मध्ये करतो, पुढच्या तीन दिवसांदरम्यान आम्ही आपणास OTW ला सामील होण्याचे आणि आमच्या कार्यास देणगी देऊन समर्थन देण्याचे आवाहन करीत आहोत. या वेळी देणगी देणे आपल्याला शक्य नसेल, तर आमच्या ड्राइव्ह ची बातमी आपल्या रसिकगट नेटवर्क मध्ये इतरांपर्यंत पोहचवणे कृपया विचारात घ्यावे, व कृपया हे जाणून घ्या कि आपण कोणत्याही पद्धतीने OTW साठी वचनबद्धता दाखवलीत तरी आपल्या सहभागाची व उत्साहाची आम्ही नेहमीच दाद देतो.

Read More