Posts by mango mochi
ऑक्टोबर २०२५ सदस्यता मोहीम: तांत्रिक व्यवस्था ज्याला आपण पाठिंबा देता
Archive of Our Own – AO3 (आपला स्वतःचा संग्रह) वाढत राहतोय व नवीन टप्पे गाठतोय. केवळ या एका वर्षात, आपण नव्वद लाख वापरकर्ते, दहा लाख मँडरीन चिनी रसिककृती, आणि १ करोड़ ५० लाख रसिककृती झाल्याचा आनंद साजरा केला—आपण कधी विचार केलाय का, की हे सगळं चालू ठेवण्यासाठी पडद्यामागे काय काम होत असे? आपली उदार देणगी ज्या ठिकाणांना पोचते, त्यापैकी एक आहे आमची तांत्रिक व्यवस्था समिती. ही समिती AO3चा माहितीसाठा व त्याच्या शोध प्रणालींना चलित ठेवणाऱ्या सर्व्हर्सना अपग्रेड करण्याचा कठीण कामात व्यस्त आहेत, जेणे करून या सतत वाढणाऱ्या वापरकर्ते व क्रियाकलापाला आम्ही सांभाळू शकू. तांत्रिक व्यवस्था समिती OTW’s (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ)च्या प्रकल्पांना चलित ठेवणारी पायाभूत सुविधा… Read more
२०२५ OTW निवडणुकीचे आकडेवारी
आता २०२५ ची निवडणूक संपली असल्यामुळे, आम्हाला आमची मतदानाची आकडेवारी आपल्याला सांगण्यास आनंद होत आहे! २०२५ च्या निवडणुकीसाठी आमच्याकडे १५,१३८ पात्र मतदार होते. त्यापैकी २,१९७ मतदारांनी मतदान केले, जे संभाव्य मतदारांच्या २२.८% आहे. मागील वर्षीच्या तुलनेत आमचे यावर्षीच्या मतदार कमी आहे, ज्यांचे मतदान २२.८% होते. आम्ही टाकलेल्या मतपत्रिकांच्या संख्येत घट देखील दिसून आली; ३,४१५ ते २,१९७ पर्यंत, जे ३५.६% घट दर्शवते.
२०२५ OTWच्या(परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळाच्या) निवडणुकीचा निकाल
यावर्षीच्या निवडणुकीत आमच्या सर्व उमेदवारांनी केलेल्या मेहनतीसाठी, निवडणूक समिती आपले आभार मानू इच्छित आहे. आम्ही आमच्या निर्गमित बोर्ड संचालक, जेनिफर हेन्स आणि झिशीन झांग, त्यांच्या कार्यकाळातील सर्व कामांसाठी आभार मानू इच्छितो. त्यासह, आम्ही २०२५ च्या निवडणुकीचा निकाल सादर करण्यास आनंदित आहोत. खालील उमेदवार (वर्णक्रमानुसार) अधिकृतपणे संचालक मंडळावर निवडले गेले आहेत: एलिझाबेथ विल्टशायर हार्लन लिबरमॅन-बर्ग औपचारिक-रित्या, बोर्डाची उलाढाल १ ऑक्टोबर पासून सुरू होणार. आम्ही मंडळाच्या नवीन सदस्यांना त्यांच्या सत्राबद्दल शुभेच्छा देतो. अशा पद्धतीने, निवडणुकीचा हंगाम संपुष्टात आला आहे. बातम्यांचा प्रसार करून, उमेदवारांना प्रश्न विचारून आणि मतदान करून सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आम्ही आभार मानतो! आम्ही पुढच्या वर्षी पुन्हा आपण सर्वांना भेटण्यास उत्सुक आहोत. OTW ही AO3, फॅनलोर,… Read more
एप्रिल २०२५ सदस्यता मोहीम: आपल्या आधाराबद्दल धन्यवाद
OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) ची एप्रिल सदस्यता मोहीम आता संपली आहे, आणि आम्हाला हे सांगायला खूप आनंद होत आहे कि हि मोहीम US$२६९,७६६.०१ उभारून संपत आहे, आमच्या US$७५,०००.०० ह्या ध्येयापेक्षा खूप जास्त. ह्या देणग्या ८,२१६ लोकांकडून आल्या आहेत जे ८२ देशात राहतात: देणगी देणाऱ्या प्रत्येकाला धन्यवाद, आणि त्यांना सुद्धा ज्यांनी ह्या मोहिमेबद्दल पोस्ट आणि शेयर केले! आम्हाला खास करून ह्याचा आनंद आहे कि ७,०६४ देणगीदारांनी OTW ची सदस्यता घेण्याचा किंवा नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला. OTW च्या वापरकर्त्यांशिवाय हि संस्था अस्तित्वातच नसती, आणि आमच्यासाठी आपला चालू आधार हा आमचा अभिमान आणि आनंद आहे! आम्हाला ह्याचा खूप आनंद आहे कि रसिककृतींच्या आणि रसिक संस्कृतींच्या इतिहासाला आधार देण्याचे,… Read more
OTW अर्थसमिती: २०२४ अर्थसंकल्प अद्यतन
गेल्या वर्षाच्या दरम्यान, OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) अर्थ समितीने मंडळाची बिल भरणे, कर भरणे, मानक अर्थलेखा प्रक्रिया पूर्ण करणे आणि आर्थिक नियमांचे पालन करणे या सगळ्याची खबरदारी घेतली. सध्या, २०२३ च्या आर्थिक विधानांची तयारी व लेखापरीक्षा चालू आहे! दरम्यान टीम २०२४ च्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा परिश्रमपूर्वक कार्यरत होती, व आम्ही अभिमानाने तुमच्या समोर या वर्षाचा अर्थसंकल्प मांडू इच्छितो (अजून तपशीलवार माहितीसाठी २०२४ आर्थिक स्प्रेडशीट बघा ): २०२४ खर्च Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह) एकूण US$४,१६,४४१.०१ पैकी या वर्षी सप्टेंबर ३०, २०२४ पर्यंत US$२,५०,३८१.०२ खर्च केले गेले आहेत. OTW च्या सर्व खर्चापैकी, ५५.०% AO3 च्या देखभाली मध्ये जातात. मुख्य-संगणक खर्चाचा मोठा… Read more