Posts by Cyn

हॅरी पॅाटर फॅनफिक्शन.कॅाम AO3 मध्ये स्थलांतरण करीत आहे

हॅरी पॅाटर फॅनफिक्शन.कॅाम, एक हॅरी पॅाटर फॅनफिक्शन संग्रह, Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वर आयात केला जात आहे. या पोस्ट मध्ये: पार्श्वभुमीबद्दल थोडे स्पष्टीकरण हॅरी पॅाटर फॅनफिक्शन.कॅाम वर कार्य असलेल्या निर्मात्यांसाठी याचा अर्थ काय आपल्याला अजूनही शंका असतील तर काय करावे

आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस २०२१ साजरा करणे

२००९ मध्ये आमच्या स्थापने पासून, OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) हे रसिकांनी घडविले व चालविले आहे. आज पर्यंत, हे खरे राहिले आहे: OTW संघटना हि रसिकांतर्फे रसिकांसाठी आहे, आणि तेच रसिक OTW ला प्रत्येक स्तरावर ताकदवान बनवितात. आमच्या प्रत्येक समितीमध्ये, स्वयंसेवक हे आमचे प्रकल्प नीट चालावेत व पुढे जावेत या साठी आवश्यक कार्य पार पाडतात. त्यांच्याशिवाय OTW अस्तित्वात नसली असती, आणि आम्ही त्यांच्या अत्यावश्यक कार्यासाठी अत्यंत कृतज्ञ आहोत.