Posts by Alex
९ फोरमच्या रसिककला AO3 मध्ये स्थलांतरण करीत आहेत
द ९ फोरम, “९” ह्या चित्रपटाच्या रसिकांसाठी चा एक संदेश फळा, त्यांच्या रसिककृती Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वर स्थलांतरित करत आहेत. या पोस्ट मध्ये: पार्श्वभूमीबद्दल थोडे स्पष्टीकरण ज्या निर्मात्यांची कार्य या द ९ फोरम मध्ये आहेत त्यांच्या दृष्टीने याचा अर्थ काय आपल्याला अजूनही प्रश्न असतील तर आपण काय करावे पार्श्वभूमीसंदर्भात स्पष्टीकरण चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या काही महिन्यांपूर्वी, सप्टेंबर २००९ मध्ये, “९” चा एकजूट छोटा रसिकगटाने त्या चित्रपटावर आधारित रसिककलांना बनवणे आणि संकलित करणे सुरु केले. ह्या चित्रपटाच्या आवडीमुळे आता द ९ फोरम वर एका दशकाहून जास्त कालावधीचे रसिककथा आणि रसिककला पोस्ट केलेले आहेत. आम्हाला ह्या रसिककृती जोपासण्यासाठी आत्ताच पावले उचलायची आहेत, अशी… Read more
आंतरराष्ट्रीय रसिक-कार्य दिवस २०२२ लवकरच येत आहे
तयार व्हा: आंतरराष्ट्रीय रसिक-कार्य दिवस फक्त एका महिन्यावर आला आहे! आंतरराष्ट्रीय रसिक-कार्य दिवस (किंवा थोडक्यात “IFD”, त्याचे लघुनाम) हा OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) द्वारा २०१४ मध्ये स्थापित झाला. सर्व प्रकारची रसिक-कार्य साजरे करण्याची ही एक संधी आहे, व दरवर्षी १५ फेब्रुवारी ला हा दिवस साजरा होतो. या वर्षी आपण ८वा वार्षिक IFD साजरा करीत आहोत!