AO3 वर ४०,००० रसिकगट साजरे करणे

टाचणखूण समितीला घोषित करताना आनंद होत आहे की आम्ही Archive of our own- AO3(आमचा स्वत:चा संग्रह) वर ४०,००० रसिकगटांचा टप्पा गाठला आहे!

गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही असे अनेक रसिकगट टप्पे गाठले आहेत:

  • ५००० रसिकगट नवीन वर्षाच्या आदल्या दिवशी, २०१०
  • १०,००० रसिकगट सप्टेंबर २०१२ मध्ये
  • १५,००० रसिकगट एप्रिल २०१४ मध्ये
  • २०,००० रसिकगट डिसेंबर २०१५ मध्ये
  • २५,००० रसिकगट जून २०१७ मध्ये
  • ३०,००० रसिकगट ऑक्टोबर २०१८ मध्ये
  • ३५,००० रसिकगट डिसेंबर २०१९ मध्ये
  • या वेळेस, आम्ही या पोस्ट ने साजरे करायचे ठरविले आहे, जी अधिक समजावेल की टाचणखूण समिती टाचणखूणा कशा पद्धतीने व्यवस्थापित करते ज्यामुळे AO3 वर मार्ग दाखविणे सोपे होते, त्याची वाढ होत असताना सुद्धा. आम्ही काही टिप्पण्या सुद्धा सामिल केल्या आहेत ज्या आपल्याला आपले कार्य अशा पद्धतीने टाचणखूण करण्यास मदत करतील ज्याने आपल्याला व AO3 फिल्टर वापरणाऱ्या इतर लोकांना फायदा होईल.

    तसेही, रसिकगट म्हणजे काय?

    आपण हे विचारल्याचा आम्हाला आनंद आहे! AO3 वर टाचणखूणांच्या संदर्भात, रसिकगटाची व्याख्या आपली पात्रे, नाती व इतर संकल्पनांच्या अस्तित्वाचे स्त्रोत माध्यम अशी आहे. उदाहरणार्थ, आपण रसिकगटामध्ये Hán Xìn/Lǐ Bái (King of Glory), या जोडीसाठी असाल पण टाचणखूण समिती ह्याला 王者荣耀 | King of Glory (Video Game) या रसिकगटाचा भाग समजतील, कारण ती दोन पात्रे या रसिकगटातून अस्तित्वात आली आहेत.

    AO3 वरच्या रसिकगटांमध्ये आपल्याला अपेक्षित असलेल्या गोष्टी जसेकी टिव्हीवरील मालिका, पुस्तके, पाॅडकास्टस, व्हिडिओ गेमस, मूव्हीज आणि बॅंड्स, पण आमच्या अप्रतिम सर्जनशील वापरकर्त्यांमुळे आमच्याकडे जाहिराती, मानववंशशास्त्र, टेबलावरचे खेळ, अत्तरांचे संग्रह व इतर अनेक रसिकगट आहेत.

    ४०,००० रसिकगट २५ लाख लोकांबरोबर समायिक करणे

    जरी AO3 वर रसिकगटांच्या प्रकारांमध्ये प्रचंड विविधता असली, तरी या सर्व रसिकप्रकारांमध्ये पात्रांची नावे, घटना व संकल्पनांसारख्या आश्चर्यकारक गोष्टी समान आहेत. AO3 वर पात्रे, घटना व संकल्पना या सर्वांचे प्रतिनिधित्व टाचणखूणा करतात! रसिकांचा एवढा मोठा समुदाय व रोज अनेक आपल्याशी जुडत असताना, वापरकर्त्यांना ह्या सर्व रसिकगटांमध्ये मार्ग शोधणे सोपे करण्याचे कार्य आम्ही करत असताना, ही वाढ काय दर्शवते हे समजावण्याची ही चांगली वेळ आहे असे आम्हाला वाटले.

    AO3 वरील टाचणखूणा सामायिक असतात. त्यांना एकट्यांना इतर कुठल्या टाचणखूणेशी कुठलाही संदर्भ किंवा नाते नसते. उदाहरणार्थ, जर आपण चेस्टर ही टाचणखूण पात्र फील्ड मध्ये घातलीत, तर टाचणखूण समिती कदाचित ती Chester the Dog (Stranger Things) (चेस्टर नावाचा कुत्रा(स्ट्रेंजर थिंग्स)) किंवा चेस्टर कॅंम्पबेल या फिल्टरस् मध्ये घालू शकणार नाहीत, जरी त्यांनी आपल्याला काय म्हणायचे आहे ते निश्चित केले असेल तरी. तिथे फक्त एक “चेस्टर” टाचणखूण असेल, ती कितीही वेळा कितीही कार्यांसाठी वापरली गेली असेल तरीही. कुठलाही वापरकर्ता आपले कार्य चेस्टर हे वापरून आपले कार्य टाचणखूण करू शकतो जेव्हा त्यांना चेस्टर नावाचा कुत्रा म्हणायचे आहे, पण त्यांना कदाचित ही टाचणखूण इतर वापरकर्त्यांबरोबर वापरावी लागेल ज्यांनी चेस्टर ही टाचणखूण चेस्टर कॅंम्पबेल चा संदर्भ घेऊन वापरली आहे.

    टाचणखूण समिती तीच अचूक टाचणखूण वापरून कार्य वेगळी करू शकत नाही- ह्याच मुख्य करणामूळे टाचणखुण समिती शक्य तेवढ्या विशिष्ट, फिल्टर करण्याजोग्या (किंवा मुख्यगोष्ट-निगडित) टाचणखुणा बनविण्याचा प्रयत्न करते. स्पष्ट, रसिकगट-विशिष्ट मुळगोष्ट-निगडित टाचणखुणा सर्वांना फिल्टर्स मध्ये हव्या त्या ठिकाणी दिसणारी रसिकगट, पात्र, नाती आणि अतिरिक्त संकल्पनांशी संबंधित कार्य शोधण्यास मदत करतात.

    जर आपले कार्य आपल्याला अपेक्षित असलेल्याहून वेगळ्या फिल्टर मध्ये नोंद केलेले आढळले, तर आपण कार्याच्या टाचनखुणेमध्ये स्पष्टतेसाठी सुधारणा करू शकता. उदाहरणार्थ, पेनी पार्करहे मॅकगाइव्हर या टीव्ही मालिकेतील पात्र आहे, आणि स्त्री-रूपातील पीटर पार्कर (स्पायडर मॅन म्हणून जास्त चांगला ज्ञात) सामान्य रसिक नावही आहे. आपले कार्य स्त्री-रुपी पीटर पार्कर बद्दल फक्त “पेनी पार्कर” असे टाचणखुण केल्याने ते मॅकगाइव्हर मधील पात्रांच्या फिल्टर्स मध्ये समाविष्ट होईल, कारण टाचणखुण समिती फक्त “पेनी पार्कर” वापरून मॅकगाइव्हर पात्रे व स्त्री पीटर पार्कर वेगळे करू शकत नाही. असे असणे मॅकगाइव्हर किंवा स्त्री पीटर पार्कर रसिकांसाठी परिपूर्ण नाही!

    आपले स्त्री पीटर पार्कर बद्दलचे कार्य पीटर पार्कर च्या फिल्टर्स मध्ये जिथे इतर स्पायडर मॅन रसिक त्याचा आनंद घेऊ शकतील, तिथे समाविष्ट व्हावे या खात्रीसाठी, सुधारित पात्र टाचणखुण जसे “पेनी पार्कर (स्त्री!पीटर)” वापरण्याचा विचार करा. आपण, Female Peter Parker (स्त्री पीटर पार्कर) हि टाचणखुण सुद्धा आपल्या कार्याच्या अतिरिक्त टाचांखुणांमध्ये घालू शकता ज्यामुळे इतर वापरकर्त्यांना ते शोधण्यास मदत होईल.

    जर आपण पहिल्यांदीच हि टाचणखुण वापरत असाल, तर त्या फिल्टर मध्ये अजून कुठली कार्य आहेत हे का नाही बघत? असे आढळू शकते कि दुसऱ्या रसिकगटात आपल्याला माहित असणाऱ्या व आवडण्याऱ्या, रासिकगटातील टाचणखुणेचा वेगळा अर्थ आहे.

    टाचणखुणेचा पुरेपूर वापर कसा करता येईल

    २०१९ मध्ये, टाचणखुण समिती ने एकत्र साधारण २.७ मिलियन टाचणखुणा. टाचणखुण समिती खूप मेहनतीने आपल्या टाचणखुणा जोडतात व आपले कार्य शोधण्यास सोपे करतात ज्याने इतर वापरकर्ते त्याचा तेवढाच आनंद घेऊ शकतील जेवढा आपण ते निर्मित करताना घेता.

    शेवटी, आमच्याकडे काही टिपा व युक्त्या आहेत ज्या समितीला आपली कार्य व टाचणखुणा फिल्टर्स मध्ये योग्य तिथे दर्शवण्यास मदत करतील. (कृपया कार्यांवर टिप्पणी करून हे इतर वापरकर्त्यांना करण्यास विचारू नका – हे फक्त आपल्या कार्यांसाठी आहे!)

    आपले कार्य पोस्ट करताना योग्य विभागात आपल्या टाचणखुणा घाला. म्हणजे, रसिकगट नाव Fandoms(रसिकगट) फील्ड मध्ये जाईल, नाती Relationships (नाते) फील्ड मध्ये सूचिबद्ध होईल, पात्रांची नावे Characters (पात्रे) फील्ड मध्ये. जे त्या विभागांमध्ये बसत नाही त्यांच्यासाठी, Additional Tags (अतिरिक्त टाचणखुणा) वापरा.

    अतिरिक्त टाचणखुणांच्या फील्ड मध्ये छोट्या भूमिका घाला. जर आपल्या कार्यामध्ये एखादा रसिकगट, पात्र, किंवा नाते फक्त ओझरत्या संदर्भात असेल, आपण ते “अतिरिक्त टाचणखुणा”येथे घालू शकता. या मध्ये या सारख्या टाचणखुणा समाविष्ट आहेत Ru Pauls drag race references (रु पॉल चे ड्रॅग रेस संदर्भ), Yagi Toshinori Is Mentioned (यागी तोशिनोरी चा उल्लेख), and Small Mention of Flynn/Yuri (फ्लिन/युरी चा छोटा उल्लेख). अशा प्रकारे, इतर वापरकर्त्यांना कळते कि आपले कार्य मुख्यत्वे रु पॉलच्या ड्रॅग रेस, यागी तोशिनोरी किंवा युरी लॉवेल/फ्लिन स्किफो बद्दल नाही (त्यांना तसे वाटू शकते जर आपण या टाचणखुणा रसिकगट, पात्र, किंवा नाते फिल्ड मध्ये घातले).

    आपल्या टाचणखुणा योग्य पद्धतीने वेगळ्या झाल्या आहेत याची खात्री करा. जेव्हा आपण अनेक टाचणखुणा घालता तेव्हा त्या स्वल्पविराम वापरून वेगळ्या केल्या जाऊ शकतात किंवा आपण आपल्या कीबोर्ड वरचे एंटर वापरू शकता. डेटाबेस मध्ये स्वल्पविरामाने टाचणखुणा वेगळ्या केल्या जात असल्यामुळे, आपण स्वल्पविराम असलेली टाचणखुण निर्मित करू शकणार नाही (स्वल्पविरामाच्या जागी दोन टाचणखुणा तयार होतील) (कृपया नोंद असुद्या: चिनी आणि जपानी स्वल्पविराम कदाचित विभाजक म्हणून काम करणार नाहीत.)

    एका टाचणखुणेमध्ये एकच संकल्पना आहे याची खात्री असू द्या (एक रसिकगट, एक पात्र, एक नाते, एक रूपक-अलंकार)

    टाचणखुणा स्वयंसिद्ध आहेत याची खात्री असू द्या (म्हणजे, टाचणखुणेचा अर्थ समजण्यासाठी अतिरिक्त संदर्भाची गरज नाही). आपल्या कार्यामध्ये पात्राचे संपूर्ण नाव वापरण्याचा प्रयत्न करा, आणि त्यांचे आडनाव नसेल तर सारख्या नावाच्या इतर पात्रांपासून भेद करण्यासाठी रसिकगटाचे नाव घालायचा विचार करा, जसेकी: Undyne (Undertale).

    अतिरिक्त टाचणखुणांचा वापर कुठलेही विषय, शैली, रचना-अलंकार, स्क्वीक्स, ट्रिगर्स इत्यादी साठी करा. जे आपले कार्य निवडावे कि नाही असे ठरवत असताना वापरकर्त्यांना माहित असावे असे आपल्याला वाटते.

    शब्दलेखन तपासा आणि पोस्ट करण्या आधी आपल्या टाचणखुणा दुसऱ्यांदा तपासा.

    सत्य व्यक्ती कल्पनारम्य (सव्यक) आणि वासनारहित किंवा प्रेम-एतर नाती या टाचणखुणांवरील टिपांसाठी, आमच्या जुनी साजरे-करणे पोस्ट वरील सूचना बघा किंवा टाचणखुणा वाविप्र याचा सल्ला घ्या.

    कृपया याची नोंद असू द्या कि टाचणखुणांविषयीचे हे सल्ले आपल्याला विविध विशयांवर सर्जनशीलतेने टाचणखुण करण्यापासून प्रवृत्त करण्यासाठी नाहीत! टाचणखुणा समितीला बुद्धिमान टाचणखुणांवर प्रेम आहे, आणि कधीकधी आपण संकलपना मुळ-गोष्टी सामानही करू शकतो. Erik Lehnsherr’s Terrible Fashion Sense (एरिक लेहनशेर ची पोशाखांमधील भयानक जाण) ही एक खूप आस्वादात्मक टाचणखुण आहे जी आम्हाला हसवते.

    जर आपल्याला टाचणखुण समितीविषयी काही प्रश्न असतील तर कृपया याचा संदर्भ घ्या टाचणखुणा वाविप्र. जर तिथे आपले शंका निरसन झाले नाही तर वाविप्र टाचणखुण समितीस कसा संपर्क साधावा हे हि समजावते.

    कृपया या पोस्ट वर विशिष्ट टाचणखुणांविषयी प्रश्न व विनंत्यांच्या टिप्पण्या करू नका. त्यांना उत्तर मिळणार नाही कारण टाचणखुणा समिती सहजरित्या इकडून विनंत्यांवर लक्ष ठेऊ शकत नाही. त्याऐवजी, कृपया वर सूचित केलेल्या पर्यायांचा वापर करून आम्हाला संपर्क करा. धन्यवाद!

Announcement, Archive of Our Own

Comments are closed.