स्वयंसेवा

Volunteering

मी एकापेक्षा जास्त भूमिकांसाठी स्वयंसेवा करू शकते का?

होय; अनेक OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) कर्मचारी त्यांचा वेळ अनेक भूमिकांसाठी समर्पित करतात. तरी, आम्‍ही विचारतो की, तुम्‍हाला स्वारस्य असलेल्‍या भूमिकांमध्‍ये गुंतलेली वेळ आणि तुम्‍हाला संस्‍थेला द्यावा लागणारा वेळ यांचा गांभीर्याने विचार करा. जेव्हा लोक अनेक भूमिकांमध्ये काम करतात तेव्हा ते आमचे स्वयंसेवक आणि OTW दोघांसाठीही मौल्यवान असू शकते, परंतु आम्ही हे देखील सुनिश्चित करू इच्छितो की आम्ही लोकांवर जास्त जबाबदारी टाकू नये. आमची सर्व नवीन स्थिती वर्णने अपेक्षा व्यवस्थापित करण्यात मदत करण्यासाठी भूमिकेसाठी अंदाजे वेळेची आवश्यकता देतात. स्वयंसेवकांनी त्यांच्या समितीच्या अध्यक्षासोबत अतिरिक्त भूमिका घेण्याबाबत चर्चा करावी असेही सुचवले जाते.

स्वयंसेवक होण्यासाठी किमान वयाची अट आहे का?

OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) केवळ १६ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांकडून स्वयंसेवा अर्ज स्वीकारू शकते. विशिष्ट भूमिका आणि समित्यांमध्ये पात्रता आवश्यक असू शकते जी १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना सहभाग मर्यादित करते.

मला स्वयंसेवक म्हणून निश्चित ठिकाणी राहावे लागेल का?

OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) चे सर्व स्वयंसेवक ऑनलाइन काम करतात, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही निश्चित ठिकाणी असण्याची गरज नाही. जोपर्यंत तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन आहे तोपर्यंत तुम्ही योग्य ठिकाणी आहात (आणि तुम्हाला जगभरातील लोकांसोबत काम करायला मिळेल).

तुमच्या वेबसाइटवरील सर्वाधिक माहिती इंग्रजीत आहे. इंग्रजी माझी पहिली भाषा नसल्यास मी अजूनही स्वयंसेवा करू शकते का?

एकदम! आम्ही जगभरातील आणि सर्व पार्श्वभूमीतील स्वयंसेवकांचे मनापासून स्वागत करतो. आंतरराष्ट्रीय समुदायाला सेवा देणारी संस्था म्हणून, आमच्याकडे वापरकर्ते आणि सदस्य आहेत ज्यांची पहिली भाषा इंग्रजी नाही आणि आमच्या अनेक समित्या आणि प्रकल्पांना एकापेक्षा जास्त भाषांची पार्श्वभूमी असलेल्या स्वयंसेवकांचा फायदा होतो. इंग्रजी ही संपूर्ण संस्थेसाठी ‘सामाईक भाषा’ आहे, म्हणून तुम्हाला इंग्रजीमध्ये काम करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे (परंतु ते परिपूर्ण असणे आवश्यक नाही!). तुम्हाला मोकळ्या भूमिकेसाठी अर्ज करण्याबद्दल काही विशिष्ट चिंता असल्यास, स्वयंसेवक पदभरती समिती यांना कळवा आणि ते तुम्हाला समितीच्या अध्यक्षांच्या संपर्कात आणतील.

मला स्वयंसेवक म्हणून काही विशेष सॉफ्टवेअर किंवा उपकरणांची आवश्यकता आहे का?

आपल्याला इंटरनेटची स्थिर प्रवेशाची आवश्यकता असेल, कारण आम्ही संवाद साधण्यासाठी वेब-आधारित सॉफ्टवेअर आणि ईमेल वापरतो. काही भूमिकांसाठी भिन्न वेबसाइट किंवा सॉफ्टवेअरमध्ये प्रवेश आवश्यक असू शकतो. या साधनांमध्ये प्रवेश विनामूल्य आहे किंवा OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) द्वारे पैसे भरलेले आहेत.

स्वयंसेवा संबंधित सहजता बद्दल चिंता आहेत का?

OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) अनेक तृतीय-पक्ष ऑनलाइन साधने वापरते, जसे की बेसकॅम्प आणि कॅम्पफायर, जे होऊ शकतं की काही सहाय्यक तंत्रज्ञानासह चांगले कार्य करू शकणार नाहीत. आमचे कार्य मुख्यत्वे लिखित संदेश-आधारित आहे, आणि काही भूमिका अत्यंत वेगवान आहेत, आणि लिखित संदेश-आधारित चॅटच्या स्वरूपात त्वरित ऑनलाइन सामाजिक संवाद आवश्यक आहे.

तुम्हाला एखाद्या विशिष्ट क्षेत्राबद्दल प्रश्न असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा आणि आम्ही मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.

मला सध्या सूचीबद्ध नसलेल्या भूमिकेत कुतूहल आहे. तरीही मी अर्ज करू शकते का?

आम्ही सध्या फक्त सूचीबद्ध भूमिकांसाठी अर्ज स्वीकारत आहोत. आमच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणजे केवळ अशा भूमिकांसाठी भरती करणे जे नवीन स्वयंसेवक स्वीकारत आहेत आणि त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि बोर्डवर आणण्यासाठी तयार आहेत. तथापि, आम्ही तुम्हाला स्वयंसेवक पृष्ठावर आणि OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) बातम्यांवर लक्ष ठेवण्यासाठी तुम्हाला स्वारस्य असलेल्या भूमिकेसाठी उपलब्ध होण्यासाठी प्रोत्साहित करतो. तुमच्याकडे भूमिकांबाबत अधिक विशिष्ट प्रश्न असल्यास, तुम्ही स्वयंसेवक पदभरती समिती शी संपर्क साधू शकता.

माझ्याकडे उपलब्ध भूमिकांसाठी मागितलेली कौशल्ये किंवा अनुभव नाही. तरीही मी अर्ज करू शकते का?

नवीन अनुभव मिळवू पाहणाऱ्या स्वयंसेवकांचे आम्ही स्वागत करत असताना, आमच्या काही भूमिकांना विशिष्ट कौशल्ये आणि अनुभव आवश्यक असतात. नवशिक्यांना विशिष्ट भूमिकेसाठी घेण्याची आमची क्षमता देखील त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी किती अनुभवी स्वयंसेवक उपलब्ध आहेत यावर अवलंबून बदलू शकते. प्रत्येक पदासाठी अनुभव आणि वेळेची आवश्यकता भूमिकेच्या वर्णनात नमूद केली आहे.

आम्ही तुम्हाला तुमच्या पात्रतेशी जुळणार्‍या मोकळ्या भूमिकांसाठी स्वयंसेवक पृष्ठ तपासणे सुरू ठेवण्यास प्रोत्साहित करतो. एखाद्या भूमिकेसाठी लागणाऱ्या आवश्यकतांबद्दल तुम्हाला प्रश्न असल्यास, स्वयंसेवक पदभरती समितीशी संपर्क साधा.

मला स्वयंसेवा करायचे असल्यास मी सध्या फॅन्डममध्ये किंवा AO3 वर वापरत असलेले नाव वापरावे लागेल का? टाचणखूण संपादक म्हणून स्वयंसेवक होण्यासाठी मला माझे विद्यमान AO3 नाव वापरावे लागेल का?

तुम्ही स्वेच्छेने काम करता तेव्हा तुम्हाला आवडेल ते नाव वापरण्यास तुमचे स्वागत आहे. काही स्वयंसेवकांना त्यांचे कार्य त्यांच्या फॅन्डम ओळखीशी जोडणे आवडते आणि इतर त्यांचे कायदेशीर नाव वापरण्यास प्राधान्य देतात, विशेषत: जर त्यांनी त्यांच्या resume (रेसुमे) किंवा CV (सिवी) वर त्यांची स्वयंसेवक सेवा वापरण्याची योजना आखली असेल. तुम्ही काही एक करू शकता किंवा वापरण्यासाठी पूर्णपणे नवीन नाव निवडु शकता.

तुम्‍हाला टाचणखूण संपादक म्‍हणून स्‍वयंसेवक होण्‍यासाठी स्‍वीकारले जात असल्‍यास, परंतु तुमच्‍या विद्यमान खात्‍याशी तुमचे हे संबंध जोडायचे नसल्‍यास, तुमचे समिति-अध्यक्ष तुम्‍हाला टाचणखूण संपादक च्या उद्देशांसाठी वेगळे खाते बनवण्याचे आमंत्रण देऊ शकतात. तुम्हाला तुमचे विद्यमान खाते वापरायचे असल्यास, ते तुमच्या OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) नावाशी जुळणे आवश्यक नाही, परंतु कृपया लक्षात ठेवा की तुमचे OTW नाव तुमच्या Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) नावाशी संपादक च्या कामा वेळेस जोडले जाऊ शकते.

कृपया लक्षात ठेवा: मर्यादित संख्येच्या भूमिकांसाठी तुम्हाला तुमचे कायदेशीर नाव वापरणे आवश्यक आहे, कारण त्यामध्ये बाहेरील संस्थांसह कार्य समाविष्ट आहे. हे नेहमी भूमिकेच्या वर्णन किंवा अनुप्रयोगात नोंदवले जाईल.

मी अर्ज सबमिट केल्यानंतर काय होते?

हे तुम्हाला स्वारस्य असलेल्या भूमिकेच्या प्रकारावर अवलंबून आहे. तुम्ही सबमिट दाबल्यानंतर, पृष्ठ पुढे काय होते याबद्दल माहिती प्रदर्शित करेल आणि तुम्हाला एक स्वयंचलित पुष्टीकरण संदेश पाठवला जाईल.

ज्या भूमिकांसाठी भरपूर पदे उपलब्ध आहेत (उदा. स्वयंसेवक पूल, जसे की भाषांतर किंवा टाचणखूण समिती): स्वयंसेवक पदभरती ह्या समितीच्या अध्यक्षांकडे आणि/किंवा स्वयंसेवक पुलाच्या प्रमुखांना हे अर्ज पाठवतील. त्यानंतर अध्यक्ष संभाव्य अर्जदारांची मुलाखत घेतील हे बघायला की ते योग्य आहेत की नाही. आम्ही शक्य तितक्या लवकर प्रत्येकाला त्यांच्या अर्जाचे निकाल कळवू.

ज्या भूमिकांसाठी केवळ विशिष्ट लोकांची संख्या शोधत आहे (उदा. कर्मचार्‍यांची भूमिका): स्वयंसेवक पदभरती समिती प्रत्येकाचे अर्ज जतन करतील आणि भरती कालावधीच्या शेवटी ते संबंधित अध्यक्षाकडे पाठवतील. मग समिति-अध्यक्ष संभाव्य अर्जदारांची मुलाखत घेईल ती व्यक्ति शोधण्यासाठी जी मोकळ्या भूमिकेसाठी सर्वात योग्य असेल. आम्ही शक्य तितक्या लवकर प्रत्येकाला त्यांच्या अर्जाचे निकाल कळवू.

मी अर्ज केला पण मी काही ऐकले नाही. मी काय करू?

सर्व अनुप्रयोगांना एक स्वयं-उत्तर प्राप्त झाले पाहिजे जे प्रक्रियेतील पुढील पाऊलांचे स्पष्टीकरण देते. ते वितरित केले आहे याची खात्री करण्यासाठी, आम्ही तुम्हाला *@transformativeworks.org वरून ईमेल विश्वासार्ह मानणे करण्यास विनंती करतो.

जर तुम्हाला ४८ तासांच्या आत स्वयं-उत्तर प्राप्त झाले नसेल, तर तुमचे कचरा फिल्टर तपासा आणि नंतर कृपया तुम्ही अर्ज केलेल्या पदासाठी आणि अर्जावर वापरलेले नाव [email protected] वर ईमेल करा.

मला स्वयंसेवा करण्यासाठी पैसे दिले जातील का?

नाही, OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) मधील कोणालाही त्यांच्या कामासाठी आर्थिक भरपाई मिळत नाही.

मला स्वयंसेवा करण्याबद्दलचे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे येथे नाहीत.

संपर्क फॉर्म द्वारे स्वयंसेवक पदभरती समितीशी तुम्ही संपर्क साधु शकता आणि साधारणपणे १ आठवड्याच्या आत, उत्तर देण्यात आम्हाला आनंद होईल. (इंग्रजी व्यतिरिक्त इतर भाषेत प्रश्न पाठवत असल्यास, प्रतिसादास एक अतिरिक्त आठवडा लागू शकतो.)