
तयार व्हा: आंतरराष्ट्रीय रसिक-कार्य दिवस फक्त एका महिन्यावर आला आहे! आंतरराष्ट्रीय रसिक-कार्य दिवस (किंवा थोडक्यात “IFD”, त्याचे लघुनाम) हा OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) द्वारा २०१४ मध्ये स्थापित झाला. सर्व प्रकारची रसिक-कार्य साजरे करण्याची ही एक संधी आहे, व दरवर्षी १५ फेब्रुवारी ला हा दिवस साजरा होतो. या वर्षी आपण ८वा वार्षिक IFD साजरा करीत आहोत!
OTW वर, यावर्षीचा आमचा प्रमुख विषय श्रेष्ठ रसिक-कार्य असा असून आम्ही “श्रेष्ठ” काय आहे ह्याची परिभाषा आपल्यावर सोपविली आहे. त्यामध्ये, आपल्या रसिकगटाचा कणा बनलेली रसिक-कार्य सामिल असू शकतील, किंवा अशी कार्य ज्यांचा आपण वारंवार आस्वाद घेतो – अशी कार्य जी आपण “अत्वावश्यक वाचन” म्हणून संबोधतो. आपण आपल्याला योग्य वाटेल त्या पद्धतीने सहभागी होऊ शकता, पण आमच्याकडे तीन प्रस्ताव आहेतः
- कार्यांची शिफारस यादी करा आणि ती अभिप्राय उत्सव, जो १३ फेब्रुवारी ला चालू होतो, ह्या अंतर्गत शेयर करा
- आपण वारंवार आस्वाद घेत असलेली कार्य आपल्यासाठी किती महत्वाची आहेत हे, एकतर वर निबंध स्वरूपात किंवा सोशल मिडिया पोस्ट म्हणून लिहा
- आमच्या लघु-रूप रसिक-कार्य IFD आव्हानामध्ये सहभागी व्हा आणि त्यांची रिमिक्स बनवा
कार्य श्राव्य, दृश्य वा लिखित असोत, चित्रफितींपासून पॅाडफिक्स पर्यंत किंवा मेटा पासून रसिक-कार्यांपर्यंत, आपल्यासाठी काय श्रेष्ठ वा अत्यावश्यक आहे ह्याचा विचार करा!
आपण काय निर्मित करता आणि आम्हाला पाठविता हे बघण्यासाठी आम्ही आतूर आहोत! आपण सोशल मीडियावर पोस्ट करीत असताना आम्ही आपल्याला #IFD2022 किंवा #IFDChallenge2022 हे हॅशटॅग वापरण्याचे आणि कार्य Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वर पोस्ट करताना ‘International Fanworks Day 2022’ ही टाचणखूण वापरण्याचे आमंत्रण देतो. जर आपण किंवा आपला रसिक-गट आपले वेगळे उपक्रम होस्ट करीत असाल तर आम्हाला कळवा व आम्ही ते सिग्नल बूस्ट करू!
त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय रसिक-कार्य दिनाच्या उपक्रमांबद्दल माहितीसाठी आमच्या बातमी पत्रकांवर लक्ष ठेवा, कारण आम्ही आमच्या योजनांबद्दल IFD च्या एक आठवडा आधी पोस्ट करू!
OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.