
OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) ची कल्पना, जडण-घडण व रचना लोंकांतर्फे अशा लोकांसाठी झाली जे आमच्या सेवेचा वापर करतात. हे आम्हाला विलक्षण बनवते! आमचे वकील, व्यवस्था प्रशासक व प्रकल्प चालवणारे इतर स्वयंसेवक असोत; दाते ज्यांचे औदार्य आमचे आर्थिक स्वास्थ्य पक्के करते; किंवा लेखक, कलाकार आणि इतर योगदान-कर्ते ज्यांच्या मेहनतीच्या कार्यांचे वास्तव्य फॅनलोर, Transformative Works and Cultures – TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह) इथे आहे, पण, प्रत्येक रसिकाच्या वेळ, प्रेम व निष्ठे शिवाय, आम्ही करतो ते काहीही करणे शक्य झाले नसते.
आपण वेगळे असण्यापेक्षा एक-साथ जास्त सामर्थ्यवान आहोत. म्हणूनच, आज आम्ही आपल्याला OTW चे सदस्य होण्याचे आवाहन करीत आहोत, किंवा जर आपण सदस्य असाल तर ते नूतनीकरण करण्याचे आवाहन करीत आहोत. सदस्यतेसाठी फक्त US$१० देणगी आवश्यक आहे व सदस्यता पूर्ण वर्षासाठी राहते.
आपण सदस्य झाल्यावर, आपण OTW संचालकांच्या बोर्ड निवडणूकांमध्ये मतदान करण्यास पात्र ठरता, जी दर वर्षी ॲागस्ट मध्ये घेतली जाते. आपल्याला सोशल मिडिया चिन्ह ही मिळते जे आपण आपल्या AO3 रेखा-चित्रामध्ये किंवा इतर सोशल मिडिया मंचांवर वापरून, आपण OTW चा भाग आहात हे इतरांपर्यंत पोहचवू शकता!
यावर्षी, आवर्ती सदस्यांसाठी आम्ही एक लाभ-योजनेची सुरुवात केली आहे. जर आपण मागील तीन, पाच, किंवा दहा वर्षांसाठी सभासदत्व देणगी दिली असेल तर आपण निवडक कृतज्ञता भेटी प्राप्त होण्यास पात्र आहात! तीन-वर्ष सदस्य एक वाचनखूण प्रतिपादित करू शकतात (अर्थात, आपण ॲाफलाईन आनंद घेण्यासाठी छापलेल्या कथेबरोबर वापरण्यासाठी). पाच-वर्षाचे सदस्य लॅपटाॅपवर, लाॅकरस वर, किंवा त्यांच्या आवडीच्या इतर ठिकाणी प्रदर्शित करण्यासाठी एक स्टिकर प्राप्त होण्यास पात्र असतात. आणि आमच्या मूल्यवान दहा-वर्षांच्या सदस्यांना एक OTW फ्रिज लोहचुंबक उपलब्ध असेल. या सर्व बक्षिसांची डिजाईन्स वर्षाच्या अंतापर्यंत जाहिर होतील व फक्त OTW च्या दीर्घकालीन सदस्यांसाठी ती असतील.
OTW ला आपला कुठल्याही प्रकारचा आधार असोत, आपल्यामुळेच् गेली तेरा वर्ष आमचा विकास व भरभराट झाला आहे. आमच्या वापरकर्तांच्या प्रत्येक योगदानासाठी आम्ही कृतज्ञ आहोत; व आम्ही अशी आशा करतो की यावर्षी सदस्य म्हणून सामील व्हा, हे करून, आमच्या कामाशी असलेले आपले नाते आपण सुद्धृड करू शकाल.
OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.