२०२४ OTW निवडणुकीचे वेळापत्रक आणि सदस्यता अंतिम मुदत

संचालक मंडळाच्या नवीन सदस्यांसाठी २०२४ च्या निवडणुकांचे वेळापत्रक प्रदर्शित केल्याची घोषणा करताना OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी)च्या निवडणूक समितीला आनंद होत आहे!

या वर्षाची निवडणूक ऑगस्ट १६-१९ ला होणार आहे. याचा अर्थ असा की कर्मचार्‍यांना आपली उमेदवारी जाहीर करण्याची अंतिम मुदत जून २१ आहे.

नेहमीप्रमाणे, निवडणूक सदस्यतेची अंतिम मुदत जून ३० आहे. आपल्याला मतदान करण्याची इच्छा असल्यास, कृपया आपली सदस्यता त्या तारखेस कार्यरत असल्याचे सुनिश्चित करा. कृपया नोंद असुद्या की आपल्या देणगी पावती वर US पूर्व वेळेप्रमाणे तारीख असेल, व जर आपली देणगी पावती ३० जून २०२४ १९.५९ नंतर नोंद झाली असेल, तर आपण मतदान करण्यास पात्र नसाल. जर आपल्याला खात्री नसेल की आपण देणगी अंतिम मुदतीच्या आधी दिली आहे वा नाही, तर कृपया आमच्या वेबसाईट वरच्या संपर्क फॉर्म हे वापरून व “माझी सदस्यता वर्तमान/मी मतदान करण्यास पात्र आहे का?” हे निवडून आमच्या अर्थपुरवठा व सदस्यता समितीशी संपर्क करा.

निवडणुका वेबसाइटवर सदस्य कसे बनायचे ते आपण शोधू शकता, किंवा जर आपण प्रक्रियेस परिचित असल्यास, आपण येथे देणगी देऊ शकता!

जर आपल्याला निवडणूकीच्या ढोबळ प्रक्रियेबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही निवडणूक धोरण तपासू शकता.

आम्ही उमेदवार आणि मतदार यांच्यातील पुरेशा संप्रेषणा सह, सक्रिय निवडणूक हंगामाची अपेक्षा करीत आहोत, आणि आम्ही आशा करतो की आपण त्याचा एक भाग व्हाल. ताज्या बातम्यांसह अद्ययावत रहाण्यासाठी Twitter/X वर निवडणूक समितीचे अनुसरण करण्यास विसरू नका!

आपल्याकडे काही प्रश्न किंवा टिप्पण्या असल्यास
निवडणूक समितीशी संपर्क साधण्यास संकोच करू नका.


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या

Announcement, Event

Comments are closed.