२०२४ OTWच्या (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळाच्या) निवडणुकीचा निकाल

यावर्षीच्या निवडणुकीत आमच्या सर्व उमेदवारांनी केलेल्या मेहनतीसाठी, निवडणूक समिती आपले आभार मानू इच्छित आहे. त्यासह, आम्ही २०२४ च्या निवडणुकीचा निकाल सादर करण्यास आनंदित आहोत.

खालील उमेदवार (वर्णक्रमानुसार) अधिकृतपणे संचालक मंडळावर निवडले गेले आहेत:

  • Erica Frank
  • Rachel Linton

औपचारिक-रित्या, बोर्डाची उलाढाल १ ऑक्टोबर पासून सुरू होणार. आम्ही मंडळाच्या नवीन सदस्यांना त्यांच्या सत्राबद्दल शुभेच्छा देतो.

अशा पद्धतीने, निवडणुकीचा हंगाम संपुष्टात आला आहे. बातम्यांचा प्रसार करून, उमेदवारांना प्रश्न विचारून आणि मतदान करून सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आम्ही आभार मानतो! आम्ही पुढच्या वर्षी पुन्हा आपण सर्वांना भेटण्यास उत्सुक आहोत.


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.

Announcement

Comments are closed.