२०२१ OTW निवडणुकांचे उमेदवार घोषणा

उमेदवार घोषणा

OTW(परिवर्तनात्मक रसिककला मंडळी) आनंदाने आमच्या उमेदवारांची घोषणा खालील प्रमाणे करू इच्छितो (पहिल्या नावाच्या अक्षर क्रमानुसार):

  • अँटोनियस मेलिसे
  • इ. ॲना सेगेडी
  • केरी डेटन
  • लॉर दुबन

कारण आम्हाला २ जागा भरायच्या आहेत आणि ४ उमेदवार आहेत, २०२१ वर्षाची निवडणूकस्पर्धेची असेल– म्हणजे, OTW चे सदस्य, कुठले उमेदवार जागा भरतील, या साठी मतदान करतील.

निवडणूक समिती OTW च्या सर्व सदस्यांना उमेदवारांची ओळख करून देण्यास उत्सुक आहे! या पोस्ट मध्ये उमेदवारांनी लिहिलेल्या संक्षिप्त जीवनचरित्रांची आणि व्यासपीठांची दुवा समाविष्ट आहे. मतदान करण्याचा काळ व मतदान कसे करता येईल या बद्दल माहिती लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.

तोवर, तुमच्या संदर्भासाठी निवडणुकीच्या कार्यक्रमांची कालरेषा इथे उपलब्ध आहे. उमेदवारांबद्दल अजून जाणून घेण्यासाठी व तुमचे प्रश्न प्रस्तुत कसे करावे या साठी पुढे वाचा!

व्यासपीठ आणि जीवनचरित्र

आम्ही प्रत्येक उमेदवाराला त्यांचे संक्षिप्त जीवनचरित्र, ज्यात त्यांचा व्यावसायीक व रसिक म्हणून अनुभव असेल, आम्हाला प्रदान करण्यास सांगितले, व त्याच बरोबर त्यांच्या कालावधीतील त्यांचे ध्येय यांवर व्यासपीठ लिहावयास सांगितले. खालील प्रश्नांची उत्तरे देवून सामिल व्हा:

  • तुम्ही मंडळाच्या निवडणुकीत भाग घ्यायचे का ठरवले?
  • तुम्ही कुठली कौशल्ये आणि/किंवा अनुभव मंडळास प्रदान करू शकता?
  • OTW साठी एक किंवा दोन ध्येय निवडा जी तुम्हाला महत्वाची वाटतात व ज्यासाठी तुम्ही तुमच्या कालावधीत काम करण्यास इच्छुक असाल. तुम्हाला ही ध्येय मौल्यवान का वाटतात? तुम्ही बाकीच्यांबरोबर काम करताना ती ध्येय कशी पूर्ण कराल?
  • OTW च्या प्रकल्पांसदर्भात तुम्हाला काय अनुभव आहे आणि संबंधित समितींना समर्थन देण्यासाठी व अधिक बळकट करण्यासाठी तुम्ही कसा सहयोग द्याल? विविध श्रेणीतील प्रकल्पांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा, पण मुक्तपणे अशांवर भर द्या ज्यांचा तुम्हाला अनुभव आहे.
  • तुम्ही तुमच्या मंडळाचे काम व OTW मधल्या तुमच्या इतर भुमिकांमधे कसा समतोल साधाल, किंवा मंडळाच्या कामावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी तुमच्या सद्ध्याच्या भूमिकेचे हस्तांतरण कसे कराल?

तुम्ही दोन्ही उमेदवारांची या प्रश्नांवरची उत्तरे व त्यांचे जीवनचरित्र खालील दुवेला अनुसरून वाचू शकता.


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.

Announcement

Comments are closed.