हॅरी पॅाटर फॅनफिक संग्रह AO3 मध्ये सामिल होत आहे

हॅरी पॅाटर रसिक-कथा संग्रह, एक हॅरी पॅाटर रसिककथा संग्रह जो चॅड (कॅझबॅंडिट) चालवतो, तो Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वर आयात होत आहे.

या पोस्ट मध्येः

पार्श्वभूमी स्पष्टीकरण

HPFanFicArchive.com चे मालक व निर्माते चॅड (कॅझबॅंडिट) यांचे मार्च २०२० मध्ये अचानक निधन झाले, पण नवीन संरक्षकाच्या मदतीने HPFanFicArchive.com हे AO3 च्या माध्यमाने पुढे जाईल.

Open Doors’ (रसिक मुक्तद्वाराच्या) Online Archive Rescue Project (ॲानलाईन संग्रह बचाव प्रकल्प) यांचे ध्येय हे संग्रहांच्या नियंत्रकांना त्यांच्या संग्रहातील रसिक-कार्य AO3 मध्ये सामिल करण्यास सहाय्य करणे असे आहे. रसिक-मुक्तद्वार नियेत्रकांसोबत त्यांचा संग्रह आयात करण्याचे काम करते जर नियंत्रकांकडे त्यांचा संग्रह स्वतंत्रपणे चालवण्यासाठी पुरेसा निधी, वेळ वा इतर संसाधने नसतील. ज्या नियंत्रकांना त्यांचा संग्रह आयात करावयाचा आहे त्यांना सहकार्य करणे आणि निर्मात्यांना संपूर्ण प्रतिष्ठा देऊन त्यांना त्यांच्या रसिक-कार्यांवर शक्य तेवढे नियंत्रण देणे हे रसिक मुक्तद्वारासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. हॅरी पॅाटर रसिक-कथा संग्रहाच्या संरक्षकासेबत तो संग्रह AO3 वर एका भिन्न व शोधण्यास सोप्या संकलनामध्ये आयात करणे हे रसिक मुक्तद्वार करणार आहेत. संपूर्ण संग्रह जतन करण्याच्या उद्देशाने, हॅरी पॅाटर रसिक-कथा संग्रहातील सर्व कार्य सध्या OTW (परिवर्तनीत्मक रसिक-कला मंडळी) च्या मुख्य-संगणकांवर होस्ट केली जातील आणि AO3 च्या कार्यपृष्ठांवर अंतर्भूत केली जातील. पुढे जाऊन जुन्या साईट च्या दूवा AO3 च्या संकलनाकडे दिशादर्शित होतील, जे व्यक्तिगत कार्य सापडवण्यासाठी शोधले व चाळले जाऊ शकेल.

कृपया याची नोंद असू द्या की हॅरी पॅाटर रसिक-कथा संग्रह नवीन आणि अद्यतनीत कार्यांसाठी १२ डिसेंबर २०२१ पासून बंद असेल, व त्याचवेळी आम्ही पूर्ण बॅंक-अप घेऊ. ३१ डिंसेबर २०२१ ला साईट कायमसाठी बंद होईल.

डिसेंबर २०२१ नंतर आम्ही कार्य हॅरी पॅाटर रसिक-कथा संग्रहावरून AO3 वर आयात करणार आहोत.

ज्या निर्मात्यांचे कार्य हॅरी पॅाटर रसिक-कथा संग्रहामध्ये आहे त्यांच्यासाठी हे होण्याचा काय परिणाम असेल?

प्रत्येक निर्मात्याच्या आमच्या माहितीतल्या इमेल पत्त्यावर आम्ही आयात सूचना पाठवू. आयात करण्या आधी आम्ही आमच्या परीने कोणत्याही कार्याची सद्य प्रत शोधण्याचा प्रयत्न करू. जर AO3 वर आम्हाला रिक्त सापडली, तर आम्ही ती आयात करण्या ऐवजी संकलनामध्ये आमंत्रित करू. निर्मात्याच्या वतीने संकलित केलेल्या कार्यांच्या उपरेघेवर किंवा कार्याच्या सांरांशामध्ये त्यांचे नाव असेल.

सर्व आयात केलेली कार्य फक्त लॅाग-इन केलेल्या AO3 वाररकर्त्यांना दृश्य असतील. आपण आपली कार्य प्रतिपादित केल्यानंतर आपण तसे निवडल्यास ती कार्य सार्वजनिक पणे दृश्य करू शकता. ३० दिवसांनंतर, सर्व अप्रतिपादित कार्य सर्व पाहुण्यांसाठी दृश्य केली जातील.

कृपया आपल्या हॅरी पॅाटर रसिक-कथा संग्रहाच्या स्युडोआयडी व इमेल पत्त्यासह रसिक मुक्तद्वारास संपर्क करा जर:

  1. आपल्याला कार्य आयात करावयाची असतील पण आपल्याला सूचना आपण संग्रहात मूलतः वापरलेला पत्ता सोडून दूसऱ्या इमेल पत्त्यावर पाठवून हवी असेल
  2. आपले आधीच AO3 खाते असेल व आपण आपली कार्य आगोदरच आयात केली असतील.
  3. आपल्याला स्वतःच आपली कार्य आयात करावयाची असतील(आपले अजून AO3 खाते नसेल तर).
  4. आपल्याला आपली कार्य AO3 वर आयात करणे अमान्य असेल तर
  5. आपल्याला आपली कार्य AO3 वर जतन करणे मान्य असेल पण आपल्याला आपले नाव बेदखल करावयाचे असेल
  6. आपल्याला आणखी काही शंका असतील ज्यांचे निरसन आम्ही करू शकू

आपल्या इमेल च्या विषय शीर्षकामध्ये कृपया संग्रहाचे नाव सामिल करा. आपल्या हॅरी पॅाटर रसिक-कथा संग्रहाच्या खात्याशी जुडलेल्या इमेल खात्यावर आपल्याला आता जाता येत नसेल, तर कृपया रसिक मुक्तद्वारास संपर्क करा व आम्ही आपल्याला मदत करू. (जर आपण कार्य इतर कुठे प्रकाशित केली असतील व सोप्या मार्गाने ती आपली आहेत हे तपासणे शक्य असेल तर चांगलेच आहे; जर तसे नसेल तर आम्ही हॅरी पॅाटर रसिक-कथा संग्रहाच्या संरक्षकासोबत संपर्क करून आपले प्रतिपादन तपासू.)

कृपया रसिक मुक्तद्वार वेबसाईट बघा पुढील सूचनांसाठी:

अजूनही आपल्याला शंका असतील…

अजूनही आपल्याला शंका असतील, तर रसिक मुक्तद्वार वाविप्र बघा, किंवा रसिक मुक्तद्वार समितीस संपर्क करा.

आम्हाला आणखी आनंद होईल, जर रसिकांनी आम्हाला हॅरी पॅाटर रसिक-कथा संग्रहाची गोष्ट फॅनलोर वर जतन करण्यास मदत केली. जर आपण विकी बदल करण्यात नवीन असाल, तर काळजी नको! ननवीन पाहुणा पोर्टल बघा, किंवा टीपांसाठी फॅनलोर माळ्यांना शंका विचारा.

हॅरी पॅाटर रसिक-कथा संग्रहावरची कार्य आम्हाला संग्रहित करता येत आहेत हे आमच्यासाठी खूप सन्मानाचे आहे, आणि कॅझबॅंडिट ला गमविण्याचे दूखः व्यक्त करताना आम्हाला हे सुद्धा लक्षात आले की आपण भाग्यशाली आहोत की कॅझबॅंडिट कडे असा मित्र होता ज्याला AO3 वर कार्य जतन करण्याची परवानगी दिली गेली होती ज्यामुळे आता ती कार्य गमावली जाणार नाहीत. रसिकगटातील मित्राच्या निधनाचा विचारही खूप अवघड आहे, पण आपल्या व आपल्या मित्रांच्या मृत्यू नंतर आपली रसिककार्य व खात्यांचे काय होईल याचा विचार करण्याची ही एक संधी आहे. AO3 वर रसिक-निकटवर्ती नातेवाईक नेमण्याचा पर्याय उपलब्ध आहे, अशी व्यक्ती ज्याला आपल्या मृत्यू किंवा अक्षमते नंतर आपली खाती बघणे उपलब्ध होईल. आपल्या वतीने कार्य करू शकणारी व्यक्ती नेमून आपण वेळेआधीच ठरवू शकता की भविष्यात आपली AO3 खाती कशा प्रकारे हाताळली जातील.

हॅरी पॅाटर रसिक-कथा संग्रह जतन करण्यासाठी आम्ही खूप उत्साही आहोत!

– रसिक मुक्तद्वार संघ व HPFFA संरक्षक


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ.

Open Doors

Comments are closed.