
स्नो लँड्स, एक लायन किंग (१९९४ ऍनिमेटेड चित्रपट) च्या रसिककथा आणि रसिक कॉमिक चा संग्रह, Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) मध्ये स्थलांतरित केला जात आहे.
या पोस्ट मध्ये:
- पार्श्वभूमीबद्दल थोडे स्पष्टीकरण
- ज्या निर्मात्यांची कार्य या स्नो लँड्स मध्ये आहेत त्यांच्या दृष्टीने याचा अर्थ काय
- आपल्याला अजूनही प्रश्न असतील तर आपण काय करावे
पार्श्वभूमीसंदर्भात स्पष्टीकरण
एका नीट आयोजित केलेल्या लोकप्रिय संग्रहामधल्या द लायन किंग रसिककथांच्या रत्नांना जातं करण्यासाठी स्नो लँड्स च्या रसिक-कला AO3 वर स्थलांतरित केल्या जात आहेत.
Open Doors’ (रसिक-मुक्तद्वार) च्या ऑनलाईन संग्रह बचाव प्रकल्पाचा उद्देश संग्रहाच्या व्यवस्थापकांना रसिक-कार्य त्यांच्या संग्रहातून AO3 मध्ये अंतर्भूत करण्यास साहाय्य करणे हा आहे. रसिक-मुक्तद्वार व्यवस्थापकांबरोबर त्यांचे संग्रह स्थलांतरित करण्याचे काम करते जेव्हा त्या व्यवस्थापकांकडे त्यांचे संग्रह स्वतंत्रपणे व्यवस्थापित करण्यासाठी पैसे, वेळ, किंवा इतर संसाधनांची कमतरता असते. व्यवस्थापक ज्यांना त्यांचे संग्रह स्थलांतरित करावयाचे आहेत त्यांच्याबरोबर काम करणे आणि कार्याच्या निर्मात्यांना कार्याचे संपूर्ण श्रेय देणे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या रसिक-कार्यांवर शक्य तेवढे जास्तीत जास्त नियंत्रण मिळू शकेल हे रसिक-मुक्तद्वारासाठी अत्यंत महत्वाचे आहे. रसिक-मुक्तद्वार AO3 वर स्नो लँड्स वेगळे, शोध घेता येण्याजोगे संकलन यांच्यामध्ये स्थलांतरित करण्यासाठी अथारी बरोबर काम करेल. संग्रह पूर्णपणे जतन करण्यासाठी, सर्व चित्रे सध्यस्थितीत OTW’s (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळीच्या) मुख्य संगणकावर होस्ट केल्या जातील, व त्यांच्या स्वतःच्या AO3 कार्य पृष्ठांवर अंतर्भूत केल्या जातील.
आम्ही स्नो लँड्स मधून कार्य AO3 वर स्थलांतरित करणे ऑगस्ट नंतर चालू करणार आहोत. पण, संग्रहाचे माप आणि गुंतागुंती प्रमाणे स्थलांतरण कदाचित काही महिन्यांसाठी, किंवा वर्षांसाठी, होणार नाही. त्या दरम्यान, निर्मात्यांना त्यांची स्वतःची कार्ये स्थलांतरित करून संकलनांमध्ये सामील करायची असतील तर त्यांचे नेहमीच स्वागत आहे.
ज्या निर्मात्यांची कार्य या स्नो लँड्स मध्ये आहेत त्यांच्या दृष्टीने ह्याचे महत्व काय?
प्रत्येक निर्मात्याचा आमच्याकडे जो ई-मेल पत्ता आहे त्यावर आम्ही स्थलांतरण सूचना पाठवू. स्थलांतरण करण्याआधी कुठल्याही कार्यांच्या सध्य-स्थित प्रति शोधण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू. जर आम्हाला AO3 वरती आधीच एखादी प्रत सापडली तर आम्ही ती स्थलांतरित करण्याऐवजी संकलनामध्ये निमंत्रित करू. सर्व कार्य जी निर्मात्याच्या वतीने संग्रहित केली जातील त्यांच्यामध्ये त्यांची नावे उपशीर्षकामध्ये किंवा कार्याच्या सारांशामध्ये सामील केलेली असतील.
सर्व स्थलांतरित कार्य लॉग-इन केलेल्या वापरकर्त्यांनाच फक्त दृश्य असतील. एकदा आपण आपली कार्य प्रतिपादित केलीत, की आपल्याला हवे असल्यास आपण त्यांना सार्वजनिकपणे दृश्य करू शकाल. ३० दिवसांनंतर, सर्व अप्रतिपादित कार्य सर्व पाहुण्यांना दृश्य होतील.कृपया, रसिक-मुक्तद्वारास संपर्क करा आपल्या स्नो लँड्स स्यूडोआयडी आणि ई-मेल पत्त्या सह, जर:
- आपली कार्य आम्ही स्थलांतरित करावयाची असतील, पण आपल्याला सूचना मूळ संग्रहाच्या सोबत असलेला ई-मेल पत्ता सोडून इतर कुठल्या पत्त्यावर पाठवून हव्या असतील
- जर आपल्याकडे आधीच AO3 खाते असेल व आपण आपली कार्य स्वतःच स्थलांतरित केली असतील.
- आपल्याला आपली कार्य स्वतः स्थलांतरित करावयाची असतील (जर अजून आपले AO3 खाते नसेल तर तेही सामील करून).
- आपल्याला आपली कार्य AO3 वर स्थलांतरित करावयाची नसतील.
- जर आपण आम्ही आपली कार्य AO3 वर करणे पसंत असेल पण आपले नाव आपल्याला काढायचे असेल.
- जर आम्ही मदत करू शकू अशी आपल्याला इतर काही शंका असेल.
आपल्या ई-मेल च्या विषयामध्ये कृपया आपल्या संग्रहाचे नाव घाला. जर आपल्या स्नो लँड्स खात्याशी जुडलेल्या ई-मेल खात्यावर आपल्या जाता येत नसेल, तर कृपया रसिक-मुक्तद्वारास संपर्क करा आणि आम्ही आपल्याला सहाय्य करू. (जर आपण कार्य इतर कोठे पोस्ट केली असतील, किंवा सोप्या मार्गाने ती आपलीच आहेत याची खात्री करू शकत असाल, तर उत्तम; जर तसे नसल्यास, आम्ही स्नो लँड्स व्यवस्थापकांसोबत काम करून आपल्या प्रतिपादनाची खात्री करू.)
- AO3 वर आपली कार्य स्थलांतरित करणे
- आपली कार्य सामील करा नवीन संकलनामध्ये स्नो लँड्स
यावरील सूचनांसाठी, कृपया रसिक-मुक्तद्वार वेबसाईट बघा.
अजूनही आपल्या काही शंका असतील…
आपल्याला अजूनही काही शंका असतील, तर रसिक-मुक्तद्वार वाविप्र, किंवा रसिक-मुक्तद्वार समितीस संपर्क करा यांना भेट द्या.
आम्हाला आवडेल जर रसिकांनी आम्हाला स्नो लँड्स फॅनलोर ची गोष्ट जतन करावयासही मदत केली तर. जर आपण विकी संपादनामध्ये नवीन असाल, तर काळजी करू नका! टिपांसाठी, नवीन दर्शक प्रवेशद्वार हे बघा किंवा फॅनलोर गार्डनर्स यांना विचारा.
आम्ही स्नो लँड्स जतन करण्यासाठी खूप उत्साहित आहोत!
– रसिक-मुक्तद्वार संघ आणि अथारी
ह्या पोस्ट वर टिप्पण्या देणे १४ दिवसात बंद केले जाईल. जर आपल्याला कोणतेही प्रश्न, व्याप किंवा टिप्पण्या असतील तर कृपया रसिक-मुक्तद्वारास संपर्क करा.
OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठपहा.