समित्या

OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) समित्यांमध्ये संघटित केलेले आहे, ज्या स्वयंसेवकांच्या बनलेल्या आहेत. प्रत्येक समितीचे स्वतःचे एक विशिष्ठ केंद्र आहे, जरी बहुतेक समित्या OTW च्या प्रकल्पांना आधार देण्यासाठी एकत्र काम करतात आणि मंडळाच्या यशात भागीदारी देतात. जर आपल्याला OTW ला आधार देण्यात स्वारस्य असेल, तर स्वयंसेवक यादी ला भेट द्या आणि पहा कि आपल्या कौशल्याला आणि रुची ला साजेशी कोणती खुली पदे आहेत. OTW च्या समित्या पुढील प्रमाणे आहेत:

उपलब्धता, आखणी आणि तंत्रज्ञान समिती
सहअध्यक्ष: म्म्ब्ल आणि सरकेन
OTW च्या वतिने, सॉफ्टवेअर आखणी आणि प्रगती चे समन्वय करते. ह्या समितीचा सध्याचा प्रमुख प्रकल्प आहे एका खुल्या-स्त्रोतीत सॉफ्टवेअर चा, OTW-आर्काइव्ह चा, निर्माण करणे जे Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) ला आकार आणि आधार देऊ शकेल.

AO3 दस्तऐवज समिती
सहअध्यक्ष: क्लेअर पी. बेकर, मिशेल श्रोडर, आणि सॅमी लुइस
AO3 दस्तऐवज समिती अस्तित्वात आहे AO3 साठी पूर्ण आणि अद्ययावत वापरकर्त्यांची आणि अंतर्गत दस्तऐवज निर्माण करण्यासाठी आणि ते सुस्थितीत सांभाळण्यासाठी. ह्या सामील आहेत, पण मर्यादित नाहीत, वाविप्र, शिकवण्या, स्क्रिनकॅस्ट आणि इतर AO3-संबंधित दस्तऐवज.

जनसंपर्क समिती
सहअध्यक्ष: क्लॉडिया रेबाझा
आमच्या विविध प्रकल्पांना बढती देण्यासाठीचे प्रेस रिलिसिस, बातमीपत्रे, ब्लॉग पोस्ट्स, प्रसारमाध्यमांचे संपर्क, आणि इतर कार्य हि समिती हाताळते. त्यावर, अंतर्गत संपर्क बढतीस आणते, ज्यामुळे सर्व समित्यांमध्ये माहिती वाहत राहते.

अर्थपुरवठा आणि सदस्यता समिती
सहअध्यक्ष: एमी२, एमी लॉवेल आणि नरँडम
मंडळासाठी निधी संकलन आणि साड्यासात वाढवणे हाताळते. आमचा सुरक्षित सदस्य आणि देणगीदारांची डाटाबेस सुद्धा सुस्थितीत ठेवते आणि ह्याची खात्री करून घेते कि प्रत्येक सदस्य OTW निवडणुकांमध्ये मत नोंदवू शकतात.

निवडणूक समिती
सहअध्यक्ष: दिसजोइन्टेड, एम्मा लॉईड, जेनी मेकडेवीट, आणि मॅरियन मेकगोवन
निवडणूक समिती OTW च्या संचालक समितीच्या सदस्यांसाठी वार्षिक निवडणूक चालवते. हि निवडणूक दार वर्षी ऑगस्ट मध्ये होते आणि त्यात OTW चे पगारी सदस्य भाग घेतात. निवडणूक समिती निवडणुकीच्या पूर्ण प्रक्रियेसाठी जबाबदार असतात, सुरवातीपासून शेवटपर्यंत. ह्यात सामील आहे उमेदवारांची तयारी, निवडणूक चालवण्याचे तांत्रिक पैलू, ह्याची खात्री करणे कि निवडणुकीची प्रक्रिया मंडळाचे बे-लॉस पळत आहे, आणि उमेदवार कालावधी चालवणे (जेव्हा उमेदवारांना सदसयांसमोर प्रस्तुत केले जाते आणि त्यांना प्रश्न विचारले जातात).

फॅनलोर
सहअध्यक्ष: जोआना पर्निक आणि नोआ ए
फॅनलोरविकी ला सुस्थतीत ठेवते. ह्या मध्ये समाविष्ट आहे विकी संपादकांना आधार देणे, आणि विकी च्या मजकुराला व्याख्या द्यायला व लावायला लवचिक आधारभूत संरचना स्थापित करणे.

अर्थसमिती
अध्यक्ष: येओचान्ग लुओ
अर्थसमिती
OTW ची पुस्तके अचूक ठेवणे, मोबदला देणे आणि त्याचा सुगावा ठेवणे, बोर्ड बरोबर अर्थसंकल्प बनवणे आणि त्याचे अद्यतन करणे, अचूक आणि माहितीपूर्ण आर्थिक कागदपत्रे बनवणे आणि प्रकाशित करणे, आणि ह्याची खात्री करणे कि OTW त्यांचे सर्व कर भरऱ्यांच्या गरज पार पाडत आहे ह्या अर्थसमिती च्या जबाबदाऱ्या आहेत

कायदेविषयक समिती
अध्यक्ष: बेटसी रोसेनब्लात
OTW ची Legal Advocacy (कायदेविषयक मदत) क्रियाकलाप
पार पाडते, बोर्ड आणि इतर समित्यांना कायदेविषयक प्रश्नांवर सल्ला देते, आणि इतर वकिली करणाऱ्या गटांबरोअबर आणि बाहेरच्या कायदेविषयक सल्लागारांबरोबर काम करते. बहुतेक वकिलांनी समाविष्ट आहे.

रसिकमुक्तद्वार प्रकल्प
सह-अध्यक्ष: ऍलिसन वॉटसन आणि एस्कीची
Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प) सर्व प्रकारच्या जोखिमीतल्या रसिककाऱ्यांना जातं करण्याचे काम करते

नियम आणि तक्रारनिवारण समिती
सह-अध्यक्ष: एनया
AO3 साठी गैरवर्तनाचे व्यवहार सांभाळते, जसे कि तक्रारी आणि नियम आणि ध्येयधोरणे ह्यांचे उल्लंघन

धोरणात्मक आराखडा समिती
सह-अध्यक्ष: आरली ग्युवेरा आणि केट सँडर्स
दर १-३ वर्षांनी OTW च्या धोरणात्मक योजनेचे समालोचन आणि सुधारण करते

समिती-संवाद समिती
अध्यक्ष: नेरी
वापरकर्ते आणि AO3 बरोबरच्या वेगवेगळ्या समित्यांमधला संपर्क सांभाळते. वापरकर्त्यांनी अनुभवलेल्या तांत्रिक समस्यांना सोडवायला आणि त्यांचा अभिप्राय कळवायला समिती-संवाद समिती मदत करते.

तांत्रिक व्यवस्था समिती
अध्यक्ष: फ्रॉस्ट द फॉक्स
आणि त्याच्या प्रकल्पांचे सर्वर आणि पायाभूत सुविधा सांभाळते.

टाचणखूण समिती
सह-अध्यक्ष: ब्रही, ड्रे व कवेम
AO3 वरच्या टाचांखुणांना AO3 च्या टाचणंखूप संपादन नियमांनुसार क्रमवार लावते आणि आयोजित करते, संबंधित टाचांखुणांना एकत्र दुवित करते ज्यामुळे शोधणे आणि गाळणे अधिक चांगले होऊ शकते आणि त्याच वेळी वापरकर्त्यांना त्यांना हव्या त्या टाचणखुणा त्यांच्या कार्यांवर वापरता येऊ शकतात.

भाषांतर समिती
सह-अध्यक्ष: ईओना आणि नटालिया गृबर आणि प्रिसीला
स्वयंसेवक अनुवादकांमध्ये समन्वय आणते आणि सर्व समित्यांबरोबर काम करून त्यांच्या प्रकल्पांचे आणि कागदपत्रांचे शक्य होतील तितक्या भाषांमध्ये भाषांतर करते.

TWC
अध्यक्ष: कारेन हेलेकसन आणि क्रिस्टीना बुसे
Transformative Works and Cultures – TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती), एक आंतरराष्ट्रीय, समवयस्क पुनर्वलोकनीत मीडिया स्टडीस जर्नल जे वर्षातून दोनदा प्रकाशित होते, ह्याचा कारभार सांभाळते. ह्यात सामील आहे TWC चे ओपन सोर्स जर्नल सॉफ्टवेयर (OJS) चा कार्यभार सांभाळणे, सादर केलेल्या पेपर्स चा विचार करणे, आणि लेखकांबरोबार आणि मजकूराबरोबर हवे तितके काम करणे. ते कागदपत्रे OJS मधून पाठवतात समवयस्क पुनरावलोकनासाठी, सुधारणेसाठी, संपादनासाठी आणि रेखांकनासाठी.

स्वयंसेवक पदभरती समिती
सह-अध्यक्ष: ऍलिसन वॉटसन आणि सिन
सर्व समित्यांची स्वयंसेवक भरती करते आणि सांभाळते, त्यांना अनेक साधने देते, आणि त्यांच्या सेवेचा सुगावा घेते. स्वयंसेवक समिती स्वयंसेवकांच्या माहितीचा एक मोठा डाटाबेस सुद्धा सांभाळते, भरती मोहीमा चालवते, OTW च्या प्रकल्पांसाठी आणि समित्यांसाठी अंतर्गत रेफेरेंस साहित्ये आणि कागदपत्रे बनवते. ह्यामुळे अंतर्गत पारदर्शकतेसाठी आणि अखंडतेला मदत होते कारण ह्यामुळे एक जोमदार ज्ञानाचा पाया बांधता येतो आणि सांभाळता येतो.
जालविषयक धोरण समिती
अध्यक्ष: रिडिक्युली
जालविषयक धोरण समितीवेबसाईट्स च्या आखणीचे आणि त्यांना सुस्थितीत ठेवण्याचे काम करते. आमचा निवडीचा CMS वर्डप्रेस आहे,आणि आम्ही कायमच उत्तीर्ण विकासकांच्या शोधात असतो.

सध्या आम्ही ह्या साठी जबाबदार आहोत:

जालविषयक धोरण समितीला संपर्क करा जर आपल्याला स्वयंसेवक बनण्याची इचछा असेल किंवा जर वरील कोणत्या साईट्स मध्ये आपल्याला कोणता तांत्रिक अडथळा असेल.