आम्ही काय करतो
संचालक मंडळ सहाय्यक समिती ही OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) संचालक मंडळाला त्याच्या कारभारी कामात व व्यवस्थापनात मदत करते. याच्या व्यतिरिक्त आम्ही इतर समितींबरोबर सहकारी म्हणून खास प्रकल्प, ज्यांना जास्त मदतीची गरज असते, यांच्या निर्देशनात व कामात भर घालतो.
आमच्या नेहमीच्या कामांची उदाहरणे म्हणजे संचालक मंडळांच्या प्रकाशनांचे उपसंपादन करणे, OTW मंडळाचा डिस्कोऱ्ड सर्व्हरचे संपादन करणे, प्रकल्पांचे निर्देशन करणे आणि मंडळाच्या दस्तऐवजांचे समीक्षण करणे. संचालक मंडळ सहाय्यकांचे बरेचसे काम OTWच्या अंतर्गत प्रकल्पांवर असते त्यामुळे आमची खूप कमी ठिकाणी उपस्थिती दिसून येईल (डिस्कोऱ्डवर मंडळाच्या बैठकींचे संपादन करायचे सोडल्यास) – आपल्याला खूपच क्वचित या समितीने प्रदर्शित केलेल्या बातम्या किंवा सादर केलेले सार्वजनिक कार्यक्रम दिसतील.
जरी संचालक मंडळ सहाय्यक संचालक मंडळाबरोबर खूप जवळून काम करत असले तरी सहाय्यक स्वयंसेवक संचालक मंडळाचे सदस्य नाहीयेत आणि त्यांना संचालकांचे हक्क नाही मिळत. उदराहणार्थ, संचालक मंडळ सहाय्यक संचालक मंडळाच्या निर्णयावर मतं नाही देऊ शकत, किंवा OTW नियमांची अंमलबजावणी करू शकत ना समितींमधल्या वादांसाठी मध्यस्थाची भूमिका नाही घेऊ शकत.
संचालक मंडळ कामाच्या व्यतिरिक्त संचालक मंडळ सहाय्यक समिती इतर समितींबरोबर सुद्धा काम करते, सामूहिक उद्दिष्ट आणि प्रकल्प साधण्यासाठी. संचालक मंडळाचे उद्दिष्ट हे OTWला पाठिंबा देणे हे आहे आणि आम्ही संचालक मंडळ सहाय्यक म्हणून हा उद्दिष्ट पूर्ण करायला पुरेपूर मदत करतो.
अंतर्गत रचना
आमची समिती बहुधा ५ ते १५ स्वयंसेवकांची असते जे चार तुकड्यांमद्धे भागले जातात: उपसंपादक/लेखक, दस्तऐवज तज्ञ, संपादक आणि प्रकल्प विशेषज्ञ.
संचालक मंडळ सहाय्यक उपसंपादक/लेखक OTW संचालक मंडळाला बातम्या, घोषणा, नियम आणि इतर कागदपत्र लिहिण्यात आणि त्यांचे संपादन करण्यात मदत करते. संचालक मंडळ सहाय्यक दस्तऐवज तज्ञ अंतर्गत OTW दस्तऐवज तयार करतात व त्यांचे समीक्षण करतात, ज्यानेकरून संस्थिक ज्ञान गायब होणार नाही आणि पारदर्शकता वाढेल. संचालक मंडळ सहाय्यक संपादक हे OTW संचालक डिस्कोऱ्ड आणि AO3 व OTW बातम्या ब्लॉग वरच्या टिप्पण्यांचे संपादन करतात. संचालक मंडळ प्रकल्प तज्ञ संचालक मंडळ किंवा इतर समितींसाठी खास संशोधन किंवा नियम प्रकल्प पूर्ण कारतात.
प्रत्येक तुकडी वरील दिलेल्या कामांवर केंद्रित आहे पण आम्ही सहयोगाने आणि इतर तुकड्यांकडून व इतर संडस्यांकडून सुद्धा मदत घेऊन काम करतो. इतर समितींना अधिक मदत हवी असल्यास त्यांच्याबरोबर काम करण्यावर आम्ही खास भर देतो.
अधूनमधून, संचालक मंडळ सहाय्यक समिती निश्चित अल्पमुदित प्रकल्प किंवा उद्दिष्ट पूर्ण करायला बाहेरच्या तज्ञांचा वापर करतो. हे समीतीवर सध्या नसलेल्या खास ज्ञान किंवा अनुभव लागणाऱ्या कामांना पूर्ण करायला उपयोगी ठरते.
आमच्याशी संपर्क साधा
जर आपल्याला संचालक मंडळ सहाय्यक समितीबद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा इतर प्रश्न असतील, तर कृपया आमच्याशी संपर्क साधा – आम्ही आपल्या संदेशाची वाट बघतो.