
आमच्या समिती-संवाद आणि नियम आणि तक्रारनिवारण समित्यांचा कार्यभार आणखी नीट सांभाळण्यासाठी आम्ही कुठली समिती कुठल्या विनंत्यांची जबाबदारी घेईल ह्यात थोडे बदल करत आहोत.
नेहमीप्रमाणे, नियम आणि द्येयधोरणे समिती ह्यांना नियम आणि तक्रारनिवारण समिती संबोधित करत राहील आणि समिती-संवाद साईट कशी वापरावी ह्यावरचे प्रश्न व दोष संबोधित करीत राहील. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या नियम आणि तक्रारनिवारण समिती आधी हाताळत होते व ज्या आता समिती-सन्वाद समिती हाताळणार आहे. ह्या पुढीलप्रमाणे आहेत:
- जर एका खात्याची सुलभता गेली असेल (उदाहरणार्थ, जर तुम्ही खाते उघडण्यासाठी वापरलेला ई-मेल, ज्यावरून तुम्ही पासवर्ड रीसेट करू शकता, विसरला असाल किंवा त्या ई-मेल ची सुलभता हरवली असेल)
- मुक्त कलाकृतींबद्दल प्रश्न आणि समस्या
- चुकीच्या भाषेच्या वर्गात घातलेली कलाकृती
ह्यातल्या कोणत्याही मुद्द्याबद्दल जर तुम्हाला नोंद करायची असेल तर कृपया समिती-संवाद समिती ला संपर्क करा . जर तुमचा अहवाल चुकीच्या विभागाला पोहोचला तरीही काही हरकत नाही! आम्ही तोच अहवाल थेट बरोबर विभागात स्थानांतर करू किंवा तुम्हाला पुन्हा तो प्रस्तुत करायला सांगू.
आम्हाला आशा आहे कि हे बदल आमच्या नियम आणि तक्रारनिवारण समितीच्या सदस्यांना मदत करतील कारण ते त्यांना इतर मुद्द्यांना त्यांचा वेळ आणि शक्ती देण्याची मुभा देतील!